पुणे : नुकतेच विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन संपले. या अधिवेशनामध्ये सत्ताधारी विरोधकांमध्ये अनेक आरोप-प्रत्यारोप झाल्याचे पहायला मिळाले. यानंतर आता येऊ घातलेल्या सर्वच राजकीय पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे दिसत आहे. अशातच पुणे जिल्ह्याच्या राजकारणात सध्या नाट्यमय घडामोडी घडत आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सलग दोन मोठे धक्के बसण्याची शक्यता आहे. भोर, पुरंदर आणि इंदापूर या विधानसभा मतदारसंघांतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भाजपमध्ये जात आहेत.
शरद पवारांचे जुने सहकारी रमेश थोरात यांना आपल्या गटात सामील करून घेण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संकेत दिले आहेत. यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. दौंड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार रमेश थोरात, जे शरद पवारांचे निष्ठावान समजले जात होते, ते लवकरच अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. थोरात यांनी आपल्या कार्यकर्त्यांशी खाजगी बैठका घेतल्या असून, दौंडमध्ये लवकरच मोठा मेळावा घेऊन हा प्रवेश अधिकृत केला जाण्याची शक्यता आहे.
दौंड तालुक्यावर थोरात कुटुंबाचा मोठा प्रभाव आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत रमेश थोरात शरद पवारांच्या गटाकडून लढले, परंतु राहुल कुल यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. आता जिल्हा परिषद आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांना अजित पवारांचा पाठिंबा हवा आहे. त्यामुळे येथील राजकीय समिकरणं बदलण्याची शक्यता आहे.
इंदापूर तालुक्यातही राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. अलीकडेच प्रवीण माने यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, आणि आता माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना जोर येत आहे. सध्या ते शरद पवार यांच्या गटात असले, तरी पुन्हा भाजपमध्ये येण्यासाठी त्यांनी जोरदार प्रयत्न सुरू केल्याचे सांगितले जाते.
गेल्या विधानसभा निवडणुकीत माने आणि पाटील दोघेही भाजपच्या तिकिटासाठी इच्छुक होते. तिकीट न मिळाल्याने माने अपक्ष लढले, तर पाटील यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली आणि पराभूत झाले. राज्याच्या राजकारणात इंदापूर आणि दौंड या दोन महत्वाच्या तालुक्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली तर आगामी जिल्हा परिषद व सहकारी संस्था निवडणुकांमध्ये राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या
-बुधवार पेठेत आणखी एक धक्कादायक घटना; इंजिनिअर टॉपरला अटक, नेमकं काय प्रकरण?
-महापालिका मैदानांवर ढोल-ताशा सरावाला मनाई; पालिका आयुक्तांनी घेतला महत्त्वाचा निर्णय
-गे डेटींग ॲपवर ओळख, पहिल्याच भेटीत शरीरसंबध अन्…पुण्यात घडला धक्कादायक प्रकार
-१७ दिवसांनी मिळणार सोन्याचा हंडा, पण निघाली…; सुसंस्कृत पुण्यात आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा
-बुधवार पेठेत जाणाऱ्यांचा पाठलाग, घरापर्यंत जायचे अन् उकळायचे पैसे; पोलिसांनी आवळल्या मुसक्या