पुणे : पुणे शहरात गेल्या अनेक दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. विशेष म्हणजे, केवळ सराईत गुन्हेगारच नव्हे, तर आर्थिक अडचणींमुळे शिक्षित तरुणही अशा गुन्ह्यांकडे वळताना दिसत आहेत. यापूर्वीही आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी किंवा जोडीदाराच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी चोरीच्या घटना समोर आल्या आहेत. अशातच बुधवार पेठ परिसरातील एका सोन्याच्या दुकानातून दागिने चोरीची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी कर्नाटकातील कोलार जिल्ह्यातून आरोपीला अटक केली आहे. विशेष म्हणजे, हा आरोपी सराईत गुन्हेगार नसून अभियांत्रिकीचा टॉपर आहे, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही संपूर्ण चोरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ जुलै २०२५ रोजी मध्यरात्री आरोपी लिखित जी. याने दुकानाच्या बाथरूमच्या खिडकीतून आत प्रवेश केला. त्याने सुमारे ४ लाख ७४ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरले. दुकानदाराला दुसऱ्या दिवशी चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांत तक्रार दाखल केली.
पोलिसांनी २५० सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीचा माग काढला आणि अखेर त्याला कर्नाटकातील कोलार जिल्ह्यातील जंगमगुर्जनहल्ली या गावातून अटक केली. चौकशीदरम्यान, आरोपीने आर्थिक अडचणी आणि बाईक खरेदी करण्यासाठी चोरी केल्याची कबुली दिली. अभियांत्रिकीचा टॉपर असलेल्या या तरुणाने चोरी केल्याने ही घटना चर्चेचा विषय ठरली आहे.
महत्वाच्या बातम्या
-महापालिका मैदानांवर ढोल-ताशा सरावाला मनाई; पालिका आयुक्तांनी घेतला महत्त्वाचा निर्णय
-गे डेटींग ॲपवर ओळख, पहिल्याच भेटीत शरीरसंबध अन्…पुण्यात घडला धक्कादायक प्रकार
-१७ दिवसांनी मिळणार सोन्याचा हंडा, पण निघाली…; सुसंस्कृत पुण्यात आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा
-बुधवार पेठेत जाणाऱ्यांचा पाठलाग, घरापर्यंत जायचे अन् उकळायचे पैसे; पोलिसांनी आवळल्या मुसक्या
-‘बावनकुळे काटेचे गॉडफादर’, प्रवीण गायकवाडांनी पत्रकार परिषदेत दाखवला ‘तो’ व्हिडीओ