पुणे : संपूर्ण राज्याला हादरुन सोडणाऱ्या वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात आता धक्कादायक माहित समोर आली आहे. वैष्णवी हगवणेच्या मृत्यू प्रकरणात विधीमंडळाच्या महिला व बालहक्क समितीने चौकशी केली असून अहवाल सादर केली आहे. या अहवालामध्ये वैष्णवीचा मृत्यू हा कौंटुबिक हिंसाचार आणि हुंड्यासाठीचा अत्याचार कशामुळे झाला? हे नमूद करण्यात आलं आहे. वैष्णवीचा मृत्यू हा नैसर्गिक मृत्यू नाही, किंवा ती फक्त आत्महत्येची घटना नाही तर तो हुंडाबळीचा प्रकार आहे. पोलिसांनी त्याच दिशेने तपास करण्याची गरज असल्याच अहवालात सांगण्यात आलं आहे.
या समितीने आयपीएस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्याबाबत महत्वाची शिफारस अहवालात केली आहे. सुपेकर यांचा सहभाग या प्रकरणात आढळून आला आहे. सुपेकरांची ध्वनिफीत देखील समोर आली. त्यामुळे सुपेकरांना निलंबित करून त्यांना सहआरोपी करण्याची शिफारस या समितीने केली आहे. या समितीचे तिसरा महत्वाचा निष्कर्ष पुणे ग्रामीण पोलिसांच्या निष्काळपणामुळे वैष्णवीचा मृत्यू झाला असल्याचं आहे.
पोलिसांच्या दुर्लक्षामुळे वैष्णवीची आत्महत्या घडल्याचं समितीने हगवणेंची मोठी सून मयुरीने मारहाण, छळ, विनयभंग, मारून टाकण्याची धमकी अशा अनेक प्रकारच्या तक्रारी केल्या होत्या. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याने वैष्णवीची आत्महत्या झाली, असंही अहवालामध्ये स्पष्ट म्हटलं आहे.
वैष्णवी यांचे वडील आनंद कस्पटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, वैष्णवीच्या लग्नात 51 तोळे सोने, फॉर्च्यूनर गाडी, चांदीची भांडी देण्यात आली. त्यानंतर लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून शशांक व तिचे सासू-सासरे यांनी घरातील किरकोळ कामाच्या वादातून तिच्याबरोबर भांडण सुरू केले. तिच्या चारित्र्यावरून बोलणं वैष्णवीला सासऱ्याच्या लोकांनी शारीरिक व मानसिक त्रास देणं चालू केलं होतं. पती, सासू-सासरे, नणंद, दीर यांनी हुंड्यासाठी मानसिक छळ करून कुर वागणूक दिली. पोस्ट मार्टममध्ये वैष्णवीच्या अंगावर मारहाणीचे व्रण आढळले होते.
महत्वाच्या बातम्या
-‘ही बॅटरी लवकरच संपणार’, शिंदेसेनेनं आदित्य ठाकरेंना डिवचलं
-शरद पवारांना मोठा धक्का; जुना सहकरी अजितदादांच्या संपर्कात?
-बुधवार पेठेत आणखी एक धक्कादायक घटना; इंजिनिअर टॉपरला अटक, नेमकं काय प्रकरण?
-महापालिका मैदानांवर ढोल-ताशा सरावाला मनाई; पालिका आयुक्तांनी घेतला महत्त्वाचा निर्णय
-गे डेटींग ॲपवर ओळख, पहिल्याच भेटीत शरीरसंबध अन्…पुण्यात घडला धक्कादायक प्रकार