पुणे : शिवसेना शिंदे गटाने आदित्य ठाकरे यांना बॅनरच्या माध्यमातून डिवचलेलं पुण्यात पाहायला मिळत आहेत. शिंदे आणि ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्यातील राजकीय संघर्ष सातत्याने सुरू आहे. नुकत्याच मुंबईत झालेल्या पावसाळी अधिवेशनातही याचे पडसाद उमटले. विधिमंडळातील भाषणांपासून ते पत्रकार परिषदांपर्यंत दोन्ही बाजूंनी टीकेची झोड उठली. त्यानंतर आता या राजकीय कलहाच्या पार्श्वभूमीवर, पुणे शहरातील प्रमुख नाना भानगिरे यांनी आदित्य ठाकरे यांच्याविरोधात शहरातील विविध चौकांमध्ये फलक लावून टीकेचा नवा अध्याय सुरू केला आहे.
“ही बॅटरी लवकरच संपणार, कारण ही ‘घराणेशाही’वर चालते”, “मिठी वाजवणार शिटी, मिठी मारणार मगर मिठी”, “कॉन्ट्रॅक्ट घेणारा ‘दिनो’”, “आता फक्त ‘गिनो’” अशा मजकुराच्या फलकांनी पुण्यातील राजकीय वातावरणात खळबळ उडवली आहे. पुण्यातील संभाजी महाराज चौकात हे बॅनर लावण्यात आलेले आहेत. आदित्य ठाकरे यांचं कार्टून चार पेंग्विन त्यांच्या बाजूला दाखवण्यात आलेत. डेक्कन अलका चौकात बॅनर लावले आहेत. आता या बॅनरमुळे शहरात नव्या राजकीय संघर्षाची चर्चा सुरू झाली आहे. ठाकरे गट या फलकबाजीला कसे प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नाना भानगिरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, गेल्या तीन वर्षांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील शिवसैनिक आणि जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे काम केले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला मोठे यश मिळाले. या यशामुळे ठाकरे गट अस्वस्थ झाला असून, त्यांच्याकडून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. मात्र, एकनाथ शिंदे हे जनतेच्या कामात व्यग्र असल्याने अशा टीकेकडे लक्ष देत नाहीत, असे भानगिरे यांनी नमूद केले.
महत्वाच्या बातम्या
-शरद पवारांना मोठा धक्का; जुना सहकरी अजितदादांच्या संपर्कात?
-बुधवार पेठेत आणखी एक धक्कादायक घटना; इंजिनिअर टॉपरला अटक, नेमकं काय प्रकरण?
-महापालिका मैदानांवर ढोल-ताशा सरावाला मनाई; पालिका आयुक्तांनी घेतला महत्त्वाचा निर्णय
-गे डेटींग ॲपवर ओळख, पहिल्याच भेटीत शरीरसंबध अन्…पुण्यात घडला धक्कादायक प्रकार
-१७ दिवसांनी मिळणार सोन्याचा हंडा, पण निघाली…; सुसंस्कृत पुण्यात आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा