Saturday, August 2, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

पठारेंच्या हाती तुतारी मात्र उमेदवारीची वाट खडतर, वडगाव शेरीवर ठाकरेसेनेचा दावा कायम

by News Desk
September 18, 2024
in Pune, पुणे शहर, राजकारण
Bapusaheb Pathare sharad Pawar and Uddhav Thackeray
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. जास्तीत जास्त मतदारसंघ आपल्या वाट्याला यावेत यासाठी महायुती-महाविकास आघाडीतील पक्ष करत आहेत. यामुळेच पुणे शहरातील अनेक मतदारसंघात देखील अशीच लगबग सुरु असल्याचे चित्र आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी पुणे शहराचा विचार केला तर महायुतीला काहीसे प्रतिकूल वातावरण असल्याचे चित्र आहे. नुकत्याच समोर आलेल्या काही सर्वेमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस (SP) आणि शिवसेना (UBT) पक्षाला परिस्थिती अनुकूल असल्याचे दिसत आहे तर कॉंग्रेसच्या ताब्यात असणाऱ्या कसबा मतदारसंघात काट्याची टक्कर पुन्हा एकदा पाहायला मिळू शकते असे सांगितले जात आहे.

You might also like

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

दरम्यान, ठाकरे गटाने आता आपले लक्ष खडकवासला आणि वडगावशेरी या मतदारसंघांवर केंद्रित केले असून अनुकूल परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी कंबर कसली आहे. या दोन मतदारसंघातही सेना नेते वडगाव शेरी या मतदारसंघावर भर देत असल्याचे गेल्या काही दिवसातील घडामोडींवरून दिसत आहे.यामुळेच वडगाव शेरी मतदारसंघ सेनेच्या वाट्याला जाईल असे बोलले जात आहे.

या मतदारसंघातून शिवसेनेच्या फायरब्रांड नेत्या सुषमा अंधारे तसेच समाजकार्याच्या माध्यमातून आपली आगळीवेगळी ओळख निर्माण केलेले नितीन भुजबळ यांच्या नावाची चर्चा आहे. लोकांमध्ये देखील गेल्या काही दिवसातील राजकारण पाहून नवा चेहरा या मतदारसंघाला हवा अशी कुजबुज सुरु आहे. यामुळेच ठाकरे गटातील अनेक नेते या मतदारसंघात दौरे करत असून बैठकांचा आणि गाठीभेटींचा धडाका लावला आहे.

दुसरीकडे पवार गटाकडे सध्या स्वतःचा असा कुणीही पावरफुल नेता नसल्याने माजी आमदार बापूसाहेब पठारे, त्यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे व तीन माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश घडवून आणला मात्र त्याचा फारसा फायदा होईल की नाही हे आताच सांगणे कठीण आहे.जरी बापूसाहेब पठारे यांनी तुतारी हातात घेतली असली तरी अद्याप शिवसेनेने या मतदारसंघावरचा दावा सोडलेला नाही. जिल्ह्यामध्ये शिवसेनेला कमीत कमी तीन तेचार मतदार संघ द्यावे लागणार असून त्यामध्ये वडगाव शेरी चे नाव आघाडीवर आहे यामुळेच शिवसेनेमध्ये इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरूच आहे.

दरम्यान, शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या कुटुंबावर आणि त्यांच्या विचारांवर प्रेम करणारा मोठा मतदारांचा बर्ग इथे आहे. सोबतच आदित्य शिरोडकर, सचिन अहिर, आदित्य ठाकरे, सुषमा अंधारे यांच्यासह पक्षातील अनेक दिग्गज नेते मंडळी या मतदारसंघात वारंवार दौरे करत असल्याने हा मतदारसंघ ठाकरे गटाला सुटणार असे मानले जात आहे. शेवटी आता हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला जातो की सेनेच्या वाट्याला जातो आणि या मतदारसंघाला नवा फ्रेश चेहरा असलेला आमदार मिळणार का हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.

महत्वाच्या बातम्या-

-जेष्ठ नेताच फडकवणार बंडाचं निशाण?; पुण्यात भाजपमध्ये धूसफूस वाढली

-श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचा ‘मयूरपंखी रथ’ ठरला भाविकांचे आकर्षण; बाप्पाला दिमाखदार मिरवणुकीने निरोप

-‘या दादासाठी जशी लाडकी बहिण तसाच….’; आमच्यासाठी काय म्हणणाऱ्या तरुणांना अजित पवारांचं उत्तर

-बाप्पा निघाले गावाला! दुपारचे २ वाजले तरी मिरवणूक काही संपेना

-पठारेंच्या हाती तुतारी; वडगाव शेरीत राजकीय समीकरण बदललं

Tags: AssemblyElectionBapusaheb PatharebjpncppuneshivsenaVadgaon Sheriबापूसाहेब पठारेभाजपराष्ट्रवादी काँग्रेसवडगाव शेरीशिवसेना
Previous Post

जेष्ठ नेताच फडकवणार बंडाचं निशाण?; पुण्यात भाजपमध्ये धूसफूस वाढली

Next Post

शरद पवारांचा आणखी एक मास्टरस्ट्रोक; भाजपचा विद्यमान आमदार लागणार गळाला?

News Desk

Related Posts

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक
Pune

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

by News Desk
August 2, 2025
ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?
Pune

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

by News Desk
August 2, 2025
विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

by News Desk
August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
Next Post
शरद पवारांचा आणखी एक मास्टरस्ट्रोक; भाजपचा विद्यमान आमदार लागणार गळाला?

शरद पवारांचा आणखी एक मास्टरस्ट्रोक; भाजपचा विद्यमान आमदार लागणार गळाला?

Recommended

शिरुरमध्ये महायुती, महाविकास आघाडीविरोधात वंचितचा उमेदवार; आढळराव पाटील, कोल्हे आणि बांदल यांच्यात तिहेरी लढत

शिरुरमध्ये महायुती, महाविकास आघाडीविरोधात वंचितचा उमेदवार; आढळराव पाटील, कोल्हे आणि बांदल यांच्यात तिहेरी लढत

April 3, 2024
पुण्यात मोदींच्या सभा अन् शिरुरमध्ये आढळराव-अमोल कोल्हे एका मंचावर; दोघे एकमेकांच्या पाया पडले

पुण्यात मोदींच्या सभा अन् शिरुरमध्ये आढळराव-अमोल कोल्हे एका मंचावर; दोघे एकमेकांच्या पाया पडले

April 29, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक
Pune

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

August 2, 2025
ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?
Pune

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

August 2, 2025
विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved