Saturday, August 2, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

‘…अन्यथा भारतातील सर्वात मोठी बंडखोरी होणार’; हर्षवर्धन पाटलांच्या पक्षप्रवेशावरुन राष्ट्रवादीत गृहकलह

"ते तंबूच घेऊन गेले, पण इथे बांबू आहेत ना"- दशरथ माने

by News Desk
October 11, 2024
in Pune, पुणे शहर, राजकारण
Dashrath Mane and Sharad Pawar
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

इंदापूर | पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे लोकसभा निवडणुकीतील यश पाहता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार इनकमिंग सुरु आहे. जेष्ठ नेते शरद पवारांनी महायुतीला धक्का देत अनेक बडे नेते आपल्या गळाला लावले. त्यातच इंदापूरचे नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना पक्षात घेत भाजपला धक्का दिला मात्र, त्यांच्या राष्ट्रवादीत मोठा पेच निर्माण झाला आहे.

हर्षवर्धन पाटील यांना भाजपकडून इंदापुरातून उमेदवारी मिळणार नसल्याचं दिसताच हाती तुतारी घेतली. त्यांच्या राष्ट्रवादीत येण्याला अनेक स्थानिक नेत्यांनी विरोध केला. पक्षात घेऊन पाटलांना थेट उमेदवारी देखील देण्यात आली त्यामुळे स्थानिक नेत्यांची नाराजी आणखी वाढली आहे. या नाराज नेत्यांनी आज इंदापुरात भव्य मेळावा घेत प्रचंड शक्तिप्रदर्शन केलं. यावेळी शरद पवार गटाचे नेते आणि सोनई ग्रुप संस्थापक दशरथ माने यांनी पक्षप्रमुख शरद पवार यांना मोठा इशारा दिला.

You might also like

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

“माझ्या राजकीय ३५ वर्षाच्या कारकिर्दीत एवढी मोठी सभा पहिल्यांदाचं बघितली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला देखील एवढे नागरिक जमत नाहीत. खासदार सुप्रिया ताई म्हणाल्या होत्या, इंदापूरला महिला जमत नाहीत. जरा हे महिलांचं मोहोळ बघा. हे (हर्षवर्धन पाटील) पक्षात शिरले. आमच्या शरद पवारांचा तंबूच घेऊन गेले, पण इथे बांबू आहेत ना. अजूनही विनंती आहे. ही गर्दी पाहा आणि हर्षवर्धन पाटीलांना इंदापुरातून उमेदवारीचा निर्णय बदला. निर्णय बदलला नाही तर भारतातली सगळ्यात मोठी बंडखोरी या इंदापुरात झाल्याशिवाय राहणार नाही. सांगली पेक्षा मोठा पॅटर्न इंदापूरमध्ये दिसणार. आम्ही एकत्र बसू आणि अपक्ष उमेदवार देऊ”, असा मोठा इशारा दशरथ माने यांनी दिला आहे.

“सुप्रिया ताई अजूनही ऐका निर्णय बदला. तो चांगला दिसतो, उंच दिसतो. पण मग त्याला आमच्या बोकांडी का बसवता? त्याला त्या पंतप्रधानच्या मोदीच्या ठिकाणी नेवून बसवा की. हा आमच्या तंबूत का घुसतोय? सगळ्या पक्षाचं थोडंथोडं खातोय, अशी टीका देखील दशरथ माने यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर केली आहे.

दरम्यान, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हर्षवर्धन पाटलांचा प्रवेश होणार असल्याच्या चर्चेपासून मान, अप्पासाहेब जगदाळे आणि प्रविण माने हे नेते नाराज होते. त्यांनी या पक्षप्रवेशावर आक्षेप घेऊनही हर्षवर्धन पाटलांचा पक्षप्रवेश झाला त्यानंतर त्यांना उमेदवारी देखील दिली. त्यावरुन नाराज नेत्यांनी आता आक्रमक भूमिका घेत अपक्ष उमेदवार देण्याचा इशारा दिला आहे. आता शरद पवार यावर काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

-बोपदेव घाट प्रकरणी तिन्ही नराधमांना पोलिसांनी घेतलं ताब्यात; अद्याप अटक नाही

-ठाकरेंचा ‘हा’ शिलेदार हाती घड्याळ घेणार! शरद पवारांच्या आमदाराला देणार टक्कर

-डेक्कनमधील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत महापालिकेचा ‘हा’ मोठा निर्णय

-बोपदेव घाट प्रकरणातील एक नराधम पोलिसांच्या ताब्यात; आणखी दोघांचा शोध सुरु

-बोपदेव घाट प्रकरण: ९ दिवस उलटले, आरोपींचे स्केचही केलं व्हायरल मात्र तरीही पोलिसांच्या हाती काहीच नाही

Tags: Assembly ElectionbjpDashrath ManeHarshvardhan PatilIndapurncpPravin Manesharad pawarSonaiSonai Group founder Dashrath ManeSupriya Suleइंदापूरदशरथ मानेप्रवीण मानेभाजपराष्ट्रवादीराष्ट्रवादी काँग्रेसविधानसभा निवडणूकशरद पवारसुप्रिया सुळेसोनई ग्रुपचे संस्थापक दशरथ मानेसोनाईहर्षवर्धन पाटील
Previous Post

बोपदेव घाट प्रकरणी तिन्ही नराधमांना पोलिसांनी घेतलं ताब्यात; अद्याप अटक नाही

Next Post

शरद पवारांच्या राष्ट्रवादीत कलह; हर्षवर्धन पाटलांवर टीकेची झोड, अन् बंडखोरीचा इशारा

News Desk

Related Posts

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक
Pune

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

by News Desk
August 2, 2025
ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?
Pune

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

by News Desk
August 2, 2025
विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

by News Desk
August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
Next Post
Appasaheb Jagdale and Harshavardhan Patil

शरद पवारांच्या राष्ट्रवादीत कलह; हर्षवर्धन पाटलांवर टीकेची झोड, अन् बंडखोरीचा इशारा

Recommended

Ravindra Dhangekar

३ महिन्यांपूर्वी दारुन पराभव, शिंदेसेनेत जाताच लागले आमदारकीचे डोहाळे, उत्साही कार्यकर्त्यांची बॅनरबाजी

March 13, 2025
‘१ ते ७ मे हा कालावधी केवळ ‘बारामती’साठी राखीव ठेवा; अजित पवारांच्या महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना सूचना

महायुतीत तिढा; पुण्यातील ‘या’ २ जागांवर अजित पवार गटाचा दावा, भाजपची काय भूमिका असणार?

June 12, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक
Pune

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

August 2, 2025
ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?
Pune

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

August 2, 2025
विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved