Friday, August 1, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

पुणे शहर राजस्थानी समाजाचा भाजपाला पाठिंबा; सुनील गहलोत म्हणाले, ‘आम्ही व्यापारी ग्राहकांनाही..’

by News Desk
November 8, 2024
in Pune, पुणे शहर, राजकारण, विधानसभा
Chandraknat Patil
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुणे शहर राजस्थानी समाजाने भाजपला आपला जाहीर पाठिंबा दिला आहे. दिवाळीनिमित्त समस्त राजस्थानी समाज पुणे शहराच्या वतीने बाणेरमध्ये दिवाळी सस्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात संघटनेच्या वतीने एकमताने भाजपा आणि कोथरुड विधानसभेचे महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

राजस्थानी समाज संघटनेचे अध्यक्ष सुनील गहलोत म्हणाले की, “राजस्थानी समाज भाजपवर प्रेम करणारा आहे. आम्ही व्यापारी आहोत, त्यामुळे आम्ही तर मतदान करणारच आहोत, पण आम्ही आमच्या ग्राहकांनाही भाजप आणि कोथरूडचे महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनाच मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करणार आहोत.”

You might also like

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

समाजाच्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, “स्वातंत्र्य काळापासून राजस्थानी बांधवांचं भाजपावर प्रेम राहिलेलं आहे. भैरवसिंह शेखावत हे तीनदा राजस्थानचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर ते उपराष्ट्रपती झाले. त्यानंतरही वसुंधरा राजेजी, राजस्थानचे विद्यमान मुख्यमंत्री भजनलालजी शर्माजी यांच्या पाठिशी राजस्थानी समाज उभा राहिला आहे.”

“राजस्थानी समाज हा व्यापारी समाज आहे. व्यापाराच्या निमित्ताने तो जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात जातो, तिथे आपलं स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण करतो. नरेंद्र मोदीजी यांच्यावरही समाजाने भरभरून प्रेम केले आहे. समाजाच्या मागणीनुसार माननीय मोदीजींनी एलबीटीतून व्यापाऱ्यांची सुटका केली. त्यामुळे भविष्यात ही समाजाचे प्रेम भाजपावर कायम राहो”, अशी भावना यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

यावेळी अध्यक्ष सुनिल गहलोत, महाराष्ट्र प्रदेश निमंत्रित उमेश चौधरी, रामलाल चौधरी, चंदुलालजी भायल, जयप्रकाश पुरोहित, दिनेश चौधरी (सिवासी), लक्ष्मणराव परिहार, भाजपा नेते प्रल्हाद सायकर, गणेश कळमकर, प्रकाश तात्या बालवडकर, लहुजी बालवडकर यांच्या सह भाजपचे इतर पदाधिकारी आणि राजस्थानी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या-

-महाविकास आघाडीच्या ‘त्या’ जाहिरातीतून अजितदादांची बदनामी; राष्ट्रवादीची पोलीस आयुक्तांकडे तक्रार

-काँग्रेसच्या कारवाईनंतर कमल व्यवहारे आक्रमक; म्हणाल्या, ‘राजीनामा दिला तरीही…’

-“कसब्याच्या जनतेने नेहमीच भाजपला साथ दिली, यंदाही जनता आमच्यासोबत”, सी. टी. रविंचा विश्वास

-एकीकडे मुख्यमंत्री शिंदे, अजितदादा, तर दुसरीकडे सुप्रिया सुळे, पुण्यात प्रचारसभांचा धुराळा

-कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटलांना वाढते समर्थन, रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Tags: Assembly ElectionbjpChandrakant PatilpuneSunil Gahlotचंद्रकांत पाटीलपुणेभाजपविधानसभा निवडणूकसुनील गहलोत
Previous Post

महाविकास आघाडीच्या ‘त्या’ जाहिरातीतून अजितदादांची बदनामी; राष्ट्रवादीची पोलीस आयुक्तांकडे तक्रार

Next Post

Kasba Election: गिरीशभाऊंची विकासाची स्वप्ने, पूर्ण करण्याचे वचन हेमंतभाऊंचे!

News Desk

Related Posts

Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

by News Desk
July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

by News Desk
July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

by News Desk
July 28, 2025
Next Post
Hemant Rasane

Kasba Election: गिरीशभाऊंची विकासाची स्वप्ने, पूर्ण करण्याचे वचन हेमंतभाऊंचे!

Recommended

‘राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू नसतो’; विजय शिवतारेंचा बारामती लोकसभेतून माघार?

‘राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू नसतो’; विजय शिवतारेंचा बारामती लोकसभेतून माघार?

March 29, 2024
‘रामकृष्ण हरी, ताईपेक्षा आमची वहिनीच भारी’; सुनेत्रा पवारांना शिवसेना महिला आघाडीचा पाठिंबा

‘रामकृष्ण हरी, ताईपेक्षा आमची वहिनीच भारी’; सुनेत्रा पवारांना शिवसेना महिला आघाडीचा पाठिंबा

April 23, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

July 28, 2025
Pranjal Khewalkar
Pune

रेव्ह पार्टी प्रकरण: कोणी कोणी ड्रग्स घेतलं? ससूनच्या वैद्यकीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर

July 28, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved