Saturday, August 2, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

शिवाजीनगर बसस्थानकाच्या कामाला मिळणार गती, अजित पवारांनी घेतली आढावा बैठक

by News Desk
February 12, 2025
in Pune, पुणे शहर, राजकारण
Ajit Pawar
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या आढावा बैठक झाली. या बैठकीमध्ये शिवाजीनगर बसस्थानकाच्या पुर्नबांधणीसाठी ‘सार्वजनिक खासगी भागीदारी’ तत्वावर प्रकल्प राबवला जाणार असल्याचे अजित पवारांनी सांगितले. त्यांनी या प्रकल्पाचा आढावा घेतला असून महामेट्रो आणि राज्य मार्ग परिवहन महामंडळाने समन्वय साधत काम करण्याचे निर्देश दिले आहेत. ‘पुणे शहराच्या वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेल्या शिवाजीनगर बसस्थानकाच्या पुनर्बांधणीसाठी ‘सार्वजनिक खासगी भागीदारी’ तत्त्वावर प्रकल्प राबविण्यात येणार आहे. हा प्रकल्प दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी ‘महामेट्रो’ आणि राज्य मार्ग परिवहन महामंडळाने समन्वयाने काम करावे’, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.

“शिवाजीनगर बसस्थानकाची पुनर्बांधणी पुणे शहराच्या सार्वजनिक वाहतुकीसाठी मैलाचा दगड ठरेल. प्रकल्पाच्या भूमिपूजनासाठी येत्या 1 मे 2025 रोजी महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त साधण्यात यावा. यासाठी ‘महामेट्रो’ आणि राज्य मार्ग परिवहन महामंडळाने आवश्यक ते सर्व सांमजस्य करार वेळेत पूर्ण करावेत. हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करावा”, असे निर्देश अजित पवारांनी दिले आहेत.

You might also like

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

शिवाजीनगर येथील राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसस्थानकाच्या पुनर्बांधणीबाबत आज आढावा बैठक पार पडली. शिवाजीनगर बसस्थानकाची पुनर्बांधणी पुणे शहराच्या वाहतुकीच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची असून, ती वेळेत आणि दर्जेदार पध्दतीनं पूर्ण करणं आवश्यक आहे. ‘सार्वजनिक खासगी भागीदारी’… pic.twitter.com/VOeQ5H5v9U

— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) February 12, 2025

या प्रकल्पामध्ये ‘महामेट्रो’ कार्यान्वयन यंत्रणा म्हणून काम करणार असून, त्यासाठी दोन्ही संस्थांमध्ये नवीन सामंजस्य करार केला जाणार आहे. शिवाजीनगर बसस्थानकाच्या जागेवरील चटई क्षेत्राचा उपयोग करून प्रकल्पाची आर्थिक गुंतवणूक सुलभ करण्यासाठी ‘सार्वजनिक खासगी भागीदारी’ तत्त्वाचा अवलंब करण्यात येणार आहे. तसेच स्वारगेट येथेही अत्याधुनिक बसस्थानक उभारण्याची कार्यवाही गतीने पूर्ण करण्याचे निर्देश अजित पवारांनी दिले आहेत.

स्वारगेट बस आणि मेट्रो स्थानकाचा शिवाजीनगर बसस्थानकाच्या धर्तीवर होणार विकास…

पुणे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या शिवाजीनगर बस स्थानकाच्या बांधकामाच्या कामाचा आढावा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील उपमुख्यमंत्री दालनात घेण्यात आला. यावेळी शिवाजीनगर… pic.twitter.com/sFOI3H9BHH

— Madhuri Misal (@madhurimisal) February 12, 2025

या प्रकल्पांतर्गत आधुनिक बसस्थानकासोबत व्यावसायिक संकुलाची उभारणी करण्यात येणार आहे. वाहनतळासाठी दोन तळघर, किरकोळ विक्रीसाठी सेमी-बेसमेंट, तर तळमजल्यावर बसस्थानक, पहिल्या मजल्यावर बसआगार आणि दुसऱ्या मजल्यावर बसवाहनतळ असणार आहे. याशिवाय शासकीय व खाजगी कार्यालयांसाठी १६ मजली इमारत उभारली जाणार आहे. शिवाजीनगर आणि स्वारगेट बसस्थानकांच्या विकासामुळे पुणेकरांना जलद, सुयोग्य आणि आधुनिक प्रवासी सुविधा मिळतील, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-रुपाली चाकणकरांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणं पडलं महागात; पोलिसांनी ठोकल्या बेड्या, नेमकं प्रकरण काय?

-उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी “सुपर सनी विक” क्रीडा महोत्सव, सनी निम्हण यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन

-अजित पवारांच्या सूचनेनंतर पुणे पोलीस अ‌ॅक्शनमोडवर; स्वयंघोषित भाई, गुंडांची काढली धिंड अन्…

-तानाजी सावंतांच्या चिरंजीवांचे अपहरण, प्रायव्हेट चार्टर्डने बँकॉकवारी, पण ‘ते’ खासगी चार्टर्ड कोणाच्या मालकीचं?

-आपल्याकडील लोक बँकॉकला का जातात? ‘ही’ आहेत पाच प्रमुख कारणे

Tags: ajit pawarMadhuri MisalncppuneShivajinagarअजित पवारपुणेमाधुरी मिसाळराष्ट्रवादीशिवाजीनगर
Previous Post

रुपाली चाकणकरांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणं पडलं महागात; पोलिसांनी ठोकल्या बेड्या, नेमकं प्रकरण काय?

Next Post

परिक्षेला गेला इंग्रजीचा पेपर पाहिला, अन् विद्यार्थ्यानं उचललं टोकाचं पाऊल

News Desk

Related Posts

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक
Pune

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

by News Desk
August 2, 2025
ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?
Pune

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

by News Desk
August 2, 2025
विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

by News Desk
August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
Next Post
12th Exam

परिक्षेला गेला इंग्रजीचा पेपर पाहिला, अन् विद्यार्थ्यानं उचललं टोकाचं पाऊल

Recommended

Voting Day | मतदानाच्या दिवशी पुणे जिल्ह्यातील बाजार बंद; पहा काय काय मिळणार?

Voting Day | मतदानाच्या दिवशी पुणे जिल्ह्यातील बाजार बंद; पहा काय काय मिळणार?

May 6, 2024
Pune Police

रक्षकच निघाले भक्षक! वाघोलीत पोलिस अधिकाऱ्यानेच केला जमीन घोटाळा, चौघांवर गुन्हा दाखल

May 16, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक
Pune

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

August 2, 2025
ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?
Pune

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

August 2, 2025
विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved