पुणे : यंदा उन्हाच्या झळा चांगल्याच बसत असून राज्यभरात तापमानाने उच्चांक गाठला आहे. मे महिन्याला सुरूवात झाली आणि राज्यात हळूहळू उन्हाचे चटके बसायला सुरूवात झाली आहे. विशेष म्हणजे पुणे शहरात सध्या प्रचंड तापमान असून उन्हाचा कहर पहायला मिळत आहे. या उन्हामुळे पुणेकरांची अक्षरश: लाहीलाही झाली आहे.
यंदाच्या हंगामातील उच्चांकी तापमान ४३.६ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले आहे. तर, पुण्यातील लोहगावात सर्वाधिक ४२.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. पुणे वेधशाळेच्या अंदाजानुसार, पुढील २४ तासांत तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. शहरात उष्णतेसह दमट हवामान कायम राहणार आहे. काही भागात तापमानात १ ते १.५ अंश सेल्सिअस तापामानाची नोंद झाली आहे. ३ दिवसांनी हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. हवामान कोरडे आणि ढगाळ राहिल, तसेच हलक्या सरी पडू शकतात, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
शिवाजीनगर आणि पाषाण- ३९.७ अंश, मगरपट्टा- ३९.२ अंश, कोरेगाव पार्क- ३८.६ अंश, हडपसर- ३८.२ अंश, वडगावशेरी- ३८ अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे. शहरात उन्हाचा कडाका वाढत असून पुणेकरांनो काळजी घ्या, असे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या
-आता गुपचूप लॉजवर जाणं झालं अवघड; पोलिसांच्या लॉज मालकांना ‘या’ महत्वाच्या सूचना
-वेळेच्या आधीच अजित दादांनी केलं उद्घाटन, मेधा कुलकर्णींची नाराजी
-PMRDA: हजारो शेतकऱ्यांची फसवणूक अन् ३ हजार कोटींचा घोटाळा? विकास आराखड्याचे गौडबंगाल काय?
-पुण्यातील नामांकित महाविद्यालयात रॅगिंग; थेट मंत्रालयातून चक्रे फिरली अन्…
-सुरेश कलमाडींना क्लीन चीट मिळताच कार्यकर्त्यांचा पुण्यात जल्लोष; कॉमनवेल्थ घोटाळा नेमकं काय प्रकरण?