पुणे : गेल्या काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा देशासह जगभरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. पहलगाममध्ये झालेल्या या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशभरामध्ये विविध सुरक्षा विषयक उपाययोजना करण्यात येत आहेत. अशातच आता पुण्यातील पिरंगुट ग्रामपंचायतीने स्थानिक मुस्लिम बांधवांना सोडून इतर मुस्लिमांना मस्जिदीमध्ये प्रवेश बंदी घातली आहे.
केंद्र सरकारने देखील प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांना त्या-त्या राज्यातील पाकिस्तानी नागरिकांना हाकलून देण्याचे आदेश दिले आहेत. अशातच आता पिरंंगुट ग्रामपंचातीने स्थानिक मुस्लिम बांधवांना सोडून इतरांना मशिदीमध्ये प्रवेश बंदी घातली आहे. याबाबतचा ठराव पिरंगुटच्या विशेष ग्रामसभेसमोर मांडण्यात आला. त्यानंतर याला मंजूरी देखील देण्यात आली आहे. हा ठराव संमत करताना स्थानिक मुस्लिम बांधवांना विश्वासात घेण्यात आले असल्याचे आणि या ठरावाला त्यांचा पाठिंबा असल्याचे देखील सांगितले जात आहे.
पिरंगुट ग्रामपंचायतीने घेतलेल्या निर्णयाचा बोर्ड गावामध्ये लावण्यात आला आहे. या बोर्डवर ‘गावातील मस्जिदीमध्ये फक्त स्थानिक मुस्लिम बांधवच प्रार्थना करतील’, असं लिहिण्यात आला आहे. पिरंगुटचे ग्रामस्थ व स्थानिक मुस्लिम बांधव यांच्या विशेष सभेमध्ये झालेल्या ठरावामध्ये गावामधील मशिदीमध्ये स्थानिक मुस्लिम वगळता परप्रांतीय मुस्लिम बांधव, व्यवसायानिमित्त पंचक्रोशीमध्ये असलेले मुस्लिम व अन्य आजूबाजूच्या गावातील मुस्लिम बांधवांना सुरक्षिततेच्या दृष्टीने मशिदीमध्ये येण्यास व प्रार्थनेसाठी प्रतिबंध करण्यात आल्याचे या बोर्डवर नमूद करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या
-उन्हाच्या कडाक्याने पुणेकरांच्या अंगाची लाहीलाही; तापमानाचा पारा पुन्हा चाळीशी पार
-आता गुपचूप लॉजवर जाणं झालं अवघड; पोलिसांच्या लॉज मालकांना ‘या’ महत्वाच्या सूचना
-वेळेच्या आधीच अजित दादांनी केलं उद्घाटन, मेधा कुलकर्णींची नाराजी
-PMRDA: हजारो शेतकऱ्यांची फसवणूक अन् ३ हजार कोटींचा घोटाळा? विकास आराखड्याचे गौडबंगाल काय?
-पुण्यातील नामांकित महाविद्यालयात रॅगिंग; थेट मंत्रालयातून चक्रे फिरली अन्…