पुणे : ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’तील एप्रिल महिन्याचा हप्ता राज्यातील महिलांच्या बँक खात्यात अद्यापही जमा झालेला नाही. नुकत्याच झालेल्या अक्षय तृतीयेच्या दिवशी राज्यातील महिलांच्या बँक खात्यात एप्रिल महिन्याचा हप्ता जमा होणार, असं महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले होते. मात्र ३० एप्रिल म्हणजेच अक्षय तृतीयेच्या दिवशी हा हप्ता जमा झाला नाही. त्यामुळे राज्यातील महिलांनी पैसे कधी जमा होणार, असा सवाल उपस्थित केला होता. यावरच आज एप्रिल महिन्यातील ‘लाडकी बहीण योजने’च्या हप्त्याबाबत महत्वाची माहिती देण्यात आली आहे.
अदिती तटकरे यांनी सोशल मीडिया पोस्ट करत याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थी महिलांना एप्रिल महिन्याचा सन्माननिधी वितरणाची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येत आहेत. तसेच पुढील दोन ते तीन दिवसात सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात एप्रिल महिन्याचा सन्मान निधी जमा होईल’, असे अदिती तटकरे यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील लाभार्थी महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातात. तसेच महायुतीच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना १५०० ऐवजी दरमहा २१०० रुपये देण्याचंही आश्वासन दिलं होतं. मात्र, २१०० रुपये देणं दूर पण इथे १५०० रुपये देखील वेळेत मिळत नसल्याची भावना राज्यातील गरजू महिलांनी व्यक्त केली आहे.
महत्वाच्या बातम्या
-पंकजा मुंडेंना अश्लिल मेसेज, कॉल करणं तरुणाला पडलं महागात
-मस्जिदीत बाहेरच्या मुस्लिमांना नो एन्ट्री; पुण्यातील ‘त्या’ आवाहनाची चर्चा
-उन्हाच्या कडाक्याने पुणेकरांच्या अंगाची लाहीलाही; तापमानाचा पारा पुन्हा चाळीशी पार
-आता गुपचूप लॉजवर जाणं झालं अवघड; पोलिसांच्या लॉज मालकांना ‘या’ महत्वाच्या सूचना
-वेळेच्या आधीच अजित दादांनी केलं उद्घाटन, मेधा कुलकर्णींची नाराजी