पुणे : सिंहगड रोडवरील उड्डाणपूलाचे १ मे महाराष्ट्र दिनाच्या उद्घाटन झाले असून हा रस्ता आता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. (नरवीर तानाजी मालुसरे रस्ता) विठ्ठलवाडी ते फन टाइम थिएटर या दरम्यानचा उड्डाणपूल खुला करण्यास गुरुवारी मुहूर्त मिळाला. या पूलाचे काम पूर्ण होऊन दीड महिना झाला. तरीही हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला नव्हता.
गेल्या २-३ दिवसांपूर्वी सोशल मीडियावर वाहतूक कोंडीचा व्हिडीओ व्हायरल झाला. या वाहतूक कोंडीमध्ये तब्बल २ ते ३ तास अडकून होते. त्यामुळे नागरिकांनी संतप्त नागरिकांनी प्रशासनावर ताशेरे ओढले. त्यानंतर या उड्डाणपूलावर या एकेरी उड्डाणपुलाचे उद्घाटन महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सकाळी सात वाजता उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. हा पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पडला आहे.
दरम्यान, सिंहगड रोडवरील उड्डाणपुलाचे उद्घाटन झाले. ज्यांनी या पुलाचा पाठपुरावा केला त्यांचेसुद्धा अभिनंदन. सिंहगड रोड पुलामुळे नागरिकांचा अर्धा तास कमी होईल. या उड्डाणपुलाचे काम २१ सप्टेंबर २०२१ मध्ये सुरू करण्यात आले. ७१ पिलर्स आणि १०६ गर्डर उभारले आहेत. विठ्ठलवाडीकडून स्वारगेटकडे येण्यासाठी राजाराम पूल चौकात उभारलेला उड्डाणपूल यापूर्वीच वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
महत्वाच्या बातम्या
-लाडकी बहिण योजनेचा एप्रिल महिन्याचा हफ्ता कधी जमा होणार? अदिती तटकरेंनी सांगितली तारीख
-पंकजा मुंडेंना अश्लिल मेसेज, कॉल करणं तरुणाला पडलं महागात
-मस्जिदीत बाहेरच्या मुस्लिमांना नो एन्ट्री; पुण्यातील ‘त्या’ आवाहनाची चर्चा
-उन्हाच्या कडाक्याने पुणेकरांच्या अंगाची लाहीलाही; तापमानाचा पारा पुन्हा चाळीशी पार
-आता गुपचूप लॉजवर जाणं झालं अवघड; पोलिसांच्या लॉज मालकांना ‘या’ महत्वाच्या सूचना