पुणे : एकीकडे भारत-पाकिस्तान युद्ध सुरु असून पाकने केलेल्या हल्ल्यांना भारताकडून चोख प्रत्युत्तर देत आहे. त्यामुळे भारतात पाकिस्तानवर संताप व्यक्त केला जात असून भारताबद्दल अभिमानाची भावना आहे. अशातच पुण्यात राहणाऱ्या एका तरुणीने पाकिस्तानच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट केली. ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्याचा आरोप ठेवत तिच्याविरुद्ध पुणे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती.
पुणे पोलिसांनी त्या तरुणीला अटक केली आहे. याशिवाय, ही तरुणी ज्या पुण्यातील कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती, त्या कॉलेजनेही तिच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. या प्रकरणाने शहरात खळबळ उडाली आहे. सोशल मीडिया ट्विटर ‘X’वर सकल हिंदू समाज या पेजने या घटनेची माहिती प्रसिद्ध केली.
पोलिसांनी माहितीनुसार, पुण्यात शिकणाऱ्या या तरुणीने तिच्या सोशल मीडिया हँडलवर पाकिस्तानच्या समर्थनार्थ पोस्ट लिहिली होती आणि ‘पाकिस्तान जिंदाबाद’ अशा घोषणा दिल्या होत्या. या पोस्ट व्हायरल झाल्यानंतर सकल हिंदू समाजाने कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर पोलिसांनी तक्रार दाखल करून तरुणीला ताब्यात घेतले आहे.
तक्रार दाखल झाल्यावर तरुणीने तिचे इन्स्टाग्राम अकाउंट डिलीट केले. या प्रकरणी पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, पोलिस निरीक्षक विनायक पाटणकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. सकल हिंदू समाजाने या घटनेचा निषेध व्यक्त करत कठोर कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणामुळे सोशल मीडियावरील पोस्ट आणि त्यांचे परिणाम यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
-मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत महत्वाचे निर्णय; राज्यात बड्या अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या कॅन्सल
-भारत-पाक युद्ध झालं तर पुणे टार्गेटवर; नेमकं काय कारण?
-भारत-पाकिस्तान युद्ध: पुण्यावर काय परिणाम? शहराबाहेर जाण्याचा प्लान करण्याआधी हे वाचाच…
-‘यापुढे कोणत्याही प्रकारचा हल्ला खपवून घेतला जाणार नाही’; भारताचा पाकला इशारा
-‘आमचा तणाव वाढवण्याचा कोणताही हेतू नाही, पण पाकने तणाव वाढवला तर…’; अजित डोवालांचा इशारा