पुणे : पुण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या खासदार जनसंपर्क सेवा अभियानाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. येत्या रविवारी, २५ मे २०२५ रोजी सकाळी १० वाजता कसबा विधानसभा मतदारसंघात, शुक्रवार पेठेतील साठे कॉलनी येथील श्री शिवाजी मराठा सोसायटीमध्ये हे अभियान राबवले जाणार आहे. या अभियानात नागरिकांना आपल्या समस्या, प्रश्न आणि नव्या कल्पना मांडण्याची संधी मिळणार आहे. मोहोळ यांनी सर्व नागरिकांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
खासदार म्हणून निवडून आल्यानंतर मोहोळ यांनी विधानसभा निहाय जनता दरबार सुरू केला आहे. या अभियानाद्वारे नागरिकांचे प्रश्न, स्थानिक समस्या, प्रलंबित विषय आणि नव्या सूचना समजून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. पहिला टप्पा यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात कसबा मतदारसंघातील नागरिकांना आपल्या अडचणी मांडता येणार आहेत. सकाळी १० वाजता प्रत्यक्ष नोंदणी सुरू होईल, त्यानंतर टोकन क्रमांकानुसार मोहोळ नागरिकांशी थेट संवाद साधतील. यावेळी केंद्र आणि राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजनांची माहितीही उपलब्ध करून देण्यात येणार आहे, तसेच महापालिका, पोलिस आणि शासकीय विभागांचे स्टॉल्सही उभारले जाणार आहेत.
मोहोळ यांनी सांगितले की, केंद्रीय मंत्रिपदाची जबाबदारी असली तरी पुणेकरांचे प्रश्न समजून घेणे आणि त्यांचे निराकरण करणे हे त्यांचे प्राथमिक कर्तव्य आहे. आतापर्यंत सात अभियानांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. या अभियानांद्वारे आलेल्या समस्यांचे निराकरण करण्यात चांगले यश मिळाले असून नागरिकांच्या प्रतिक्रियाही समाधानकारक आहेत. कसबा मतदारसंघातील नागरिकांनीही या अभियानात सहभागी होऊन आपल्या समस्या आणि सूचना मांडाव्यात, असे आवाहन त्यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या
-वैष्णवीला दिलेले 51 तोळे स्त्री धन कुठे गेलं? धक्कादायक माहिती समोर
-वैष्णवीच्या मृत्यूस कारणीभूत नणंदबाई ‘पिंकी ताई‘ची हवा; बड्या नेत्यांसोबत कनेक्शन आले पुढे
-वैष्णवी हगवणे: हगवणेंचं कोणीही वकिलपत्र घेऊ नका; रोहिणी खडसेंचं आवाहन
-हगवणे कुटुंबात ढवळाढवळ करणारा, प्रत्येक वादात नाव असणारा निलेश चव्हाण नेमका कोण?