पुणे : वैष्णवी हगवणे प्रकरणामुळे संपूर्ण राज्यातील तराजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे. २३ वर्षीय वैष्णवी शशांक हगवणे हिने सासरच्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी वैष्णवीचा पती शशांक राजेंद्र हगवणे, सासू लता राजेंद्र हगवणे, नणंद करिश्मा आणि सासरा राजेंद्र हगवणे यांना मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
राजेंद्र हगवणे हे अजित पवार गटाचे सदस्य असल्याने हे प्रकरण आता राजकीयदृष्ट्याही संवेदनशील बनले आहे. याशिवाय, हगवणे कुटुंबाकडून त्यांची मोठी सून मयुरी जगताप हिलाही मारहाण केली जात होती, असे समोर आले आहे. या संपूर्ण प्रकरणावरुन आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांना धारेवर धरलं आहे. “राज्याला पार्ट टाईम नव्हे तर फुलटाईम महिला आयोग अध्यक्षा हव्या”, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहले आहे.
या प्रकरणात मयुरी जगताप यांच्या आई आणि भावाने सहा महिन्यांपूर्वीच राज्य महिला आयोगाला पत्र लिहून तक्रार केली होती, परंतु या पत्राची कोणतीही दखल घेण्यात आली नाही. यामुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर राजकीय वर्तुळात जोरदार टीका होत आहे. रोहिणी खडसे यांनी या प्रकरणावरून रुपाली चाकणकर यांच्यावर निशाणा साधला आहे. चाकणकर या आपल्या राजकीय जबाबदाऱ्यांमुळे महिला आयोगाच्या कामाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप खडसे यांनी केला आहे. तसेच, राष्ट्रवादीशी संबंधित प्रकरणांमध्ये चाकणकर जाणीवपूर्वक कारवाई टाळत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
राज्याला पार्ट टाईम नव्हे तर फुलटाईम महिला आयोग अध्यक्षा हव्या
सध्याच्या @Maha_MahilaAyog च्या अध्यक्षा ह्या त्यांच्या पक्षात एका प्रमुख पदावरही आहेत. त्यामुळे ही दुहेरी भूमिका बजावत असताना त्यांना महिला अत्याचारांच्या प्रकरणात वेळ मिळत नसावा पण पक्षाच्या कामामुळे महिला… pic.twitter.com/mzePOEm09E
— Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) May 24, 2025
रोहिणी खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. खडसे यांनी यापूर्वीही चाकणकर यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. त्या म्हणाल्या होत्या की, महिला आयोगाचा कारभार म्हणजे “वरातीमागून घोडं” आणि वैष्णवीच्या जावेच्या तक्रारीवर वेळीच कारवाई झाली असती तर हे प्रकरण टाळता आले असते. त्यांनी चाकणकर यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल का होऊ नये, असा सवालही उपस्थित केला होता. यावर चाकणकर यांनी प्रत्युत्तर देताना म्हटले होते की, काही विरोधक केवळ घटना घडल्यानंतरच जागे होतात आणि आपले नाव घेतल्याने त्यांच्या बातम्या होतात. तसेच, या प्रकरणाची संपूर्ण माहिती सोशल मीडियावर पहिल्या दिवसापासून उपलब्ध असल्याचे त्यांनी नमूद केले होते.
महत्वाच्या बातम्या
-फसवणुकीचा ‘गुजरात पॅटर्न’, पुणे पोलिसांनी केला पर्दाफाश; अमेरिकन नागरिकांना घातला जात होता गंडा
-खासदार मुरलीधर मोहोळ घेणार कसब्यात जनता दरबार, नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन
-वैष्णवीला दिलेले 51 तोळे स्त्री धन कुठे गेलं? धक्कादायक माहिती समोर
-वैष्णवीच्या मृत्यूस कारणीभूत नणंदबाई ‘पिंकी ताई‘ची हवा; बड्या नेत्यांसोबत कनेक्शन आले पुढे
-वैष्णवी हगवणे: हगवणेंचं कोणीही वकिलपत्र घेऊ नका; रोहिणी खडसेंचं आवाहन