पुणे : राज्यात सध्या स्थानिक संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरु आहे. अशातच महायुतीतील मित्रपक्ष स्वबळावर लढण्याच्या तयारीत असल्याचे चित्र दिसत आहे. भाजपने ठाण्यात झालेल्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन असून दोन्ही राष्ट्रवादीकडून तयारी सुरु आहे. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीची वर्धापन दिनाच्या तयारीसाठी आजोजित बैठकीत अजित पवारांनी स्वबळाचे संकेत दिले आहे.
‘युतीची वाट न पाहता कामाला लागा. पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मी तुम्हाला जागा करायला आलो आहे. पुणेकरांना चेहरा हवा असतो अन् माझा चेहरा बरा आहे. म्हणून माझ्या चेहऱ्यावर पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक आपण लढविणार आहोत. माझा चेहरा घेऊन जा’, असे अजित पवार म्हणाले आहेत.
स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढायच्या की स्वबळावर याचा निर्णय राज्य पातळीवर होईल. पण तुम्ही वाट न पाहता कामाला लागा. प्रत्येक वॉर्डात राष्ट्रवादी काँग्रेस दिसली पाहिजे,” अशा सूचना अजित पवारांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. तसेच ‘पुणे महापालिकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने मंत्र्यांवर जबाबदारी दिली आहे. पुणे शहरातील आठ मतदारसंघानिहाय प्रत्येक मतदारसंघाची जबाबदारी एका एका मंत्र्यावर देण्यात आली आहे. प्रत्येक मतदारसंघात मेळावे घेतले जातील तसेच तरुण, महिलांना यावेळी संधी दिली जाईल, असेही अजित पवार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
-बुधवार पेठेत वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेने हातउसने पैसे परत केले नाहीत म्हणून त्याने थेट…
-चौकीदारही चोर है! बारामतीत पोलिसानेच मारला विद्यार्थ्यांच्या दप्तर अन् मोबाईलवर डल्ला
-पुण्यात पुन्हा ‘मुळशी पॅटर्न’चा थरार; वादातील जमिन पाहण्यासाठी गेले अन्…