Sunday, July 13, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

आमदार रासनेंच्या मागणीला यश; गणेशोत्सवाला महाराष्ट्र राज्य उत्सवाचा दर्जा

by News Desk
July 10, 2025
in Pune, पुणे शहर, महाराष्ट्र, सांस्कृतिक
Ganesh Festival
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : भाजपचे आमदार हेमंत रासने यांनी आज विधानसभेत महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरेचा अविभाज्य भाग असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला ‘राज्य उत्सव’ म्हणून मान्यता देण्याची मागणी केली. या मागणीला तत्काळ प्रतिसाद देत सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी गणेशोत्सवाला महाराष्ट्र राज्य उत्सव म्हणून घोषित करण्यात येत असल्याचे सभागृहात सांगितले. यासोबतच उत्सव अधिक भव्य स्वरूपात साजरा होण्यासाठी शंभर कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी १८९३ साली सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाने धार्मिक, सांस्कृतिक परंपरा जपण्याबरोबरच समाज प्रबोधनाचीही मोठी भूमिका बजावली आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून दरवर्षी सादर होणारे मनोरंजनासोबतच सामाजिक आणि वैज्ञानिक देखावे हा उत्सवाचे खरे वैशिष्ट्य आहे. कार्यकर्ते रात्रंदिवस परिश्रम घेऊन देखावे साकारतात, मात्र वेळेच्या निर्बंधांमुळे त्यांच्या मेहनतीवर मर्यादा येतात. त्यामुळे पुण्यासारख्या शहरात हा उत्सव 24 तास सुरू राहण्यासाठी शासनाने विशेष मदत करावी, अशी मागणी यावेळी आमदार रासने यांनी केली. पुण्यातील रस्त्यांची दुरुस्ती, स्वच्छता, शौचालयांच्या सुविधा, आपत्ती व्यवस्थापनासाठी पथकांची नियुक्ती आणि शंभर कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी पुणेसह महाराष्ट्रातील सार्वजनिक गणेशोत्सवांसाठी मंजूर करण्याचीही त्यांनी मागणी केली.

You might also like

युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत शिवरायांचे किल्ले, पुण्यात पेढे वाटत जोरदार आनंदोत्सव साजरा

‘हा दिवस प्रत्येक शिवप्रेमींसाठी अभिमानाचा क्षण’; मानकरांनी मानले भारत सरकार आणि महायुती सरकारचे आभार

अजित पवारांनी बारामतीकरांना भरला दम; ‘त्यांना टायरात घालून मारा, तो माझा नातेवाईक का असेना?’

या मागणीला प्रतिसाद देताना सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले की, गणेशोत्सवाच्या आयोजनासाठी लागणाऱ्या निधीची मर्यादा ठेवली जाणार नाही. शासनाच्या वतीने गरजेनुसार शंभर कोटींपेक्षा अधिक निधी दिला जाईल. तसेच उत्सवाच्या प्रचार-प्रसारासाठीही सर्वतोपरी सहकार्य केले जाईल आणि मंडळांवर असलेले निर्बंध शिथिल करण्याचा प्रयत्न केला जाईल.

गणेशोत्सवाला महाराष्ट्र राज्य उत्सवाचा दर्जा देण्यात आल्याबद्दल आमदार हेमंत रासने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच महायुती सरकारमधील सर्व मंत्रिमंडळाचे आभार मानले. त्यांनी सांगितले की या ऐतिहासिक निर्णयामुळे सार्वजनिक मंडळांना अधिक शासकीय सहकार्य मिळेल तसेच पर्यटन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्थानिक उद्योगांना चालना मिळेल.

महत्वाच्या बातम्या

-प्रेमाचं सोंग, शारिरीक संबंध, प्रेयसीला रबडी खायला दिली अन्…; गर्भवती प्रेसयीसोबत इंजिनिअरचा भयंकर कारनामा

-पुण्यातील एफसी रोडवरील वाद: पडळकरांचे आरोप, व्यापाऱ्यांचे प्रत्युत्तर

-हिंजवडी आयटी पार्कमधील वीजपुरवठा पुन्हा सुरळीत

-राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा! राज्य सरकारचा मोठा निर्णय, आता तुकडेबंदी कायदा रद्द

-पुण्यात ‘त्या’ प्रसिद्ध स्पा सेंटरमध्ये सुरु होता भलताच कारभार; पोलिसांनी धाड टाकत १८ मुलींची केली सुटका

Tags: Ganesh Festivalhemant rasaneगणेशोत्सवहेमंत रासने
Previous Post

प्रेमाचं सोंग, शारिरीक संबंध, प्रेयसीला रबडी खायला दिली अन्…; गर्भवती प्रेसयीसोबत इंजिनिअरचा भयंकर कारनामा

Next Post

पुणे महापालिकेतील कर्मचारी अधिकाऱ्यांना लागणार शिस्त; आयुक्तांनी जारी केलं नवं वेळापत्रक

News Desk

Related Posts

युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत शिवरायांचे किल्ले, पुण्यात पेढे वाटत जोरदार आनंदोत्सव साजरा
Pune

युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत शिवरायांचे किल्ले, पुण्यात पेढे वाटत जोरदार आनंदोत्सव साजरा

by News Desk
July 12, 2025
‘हा दिवस प्रत्येक शिवप्रेमींसाठी अभिमानाचा क्षण’; मानकरांनी मानले भारत सरकार आणि महायुती सरकारचे आभार
Pune

‘हा दिवस प्रत्येक शिवप्रेमींसाठी अभिमानाचा क्षण’; मानकरांनी मानले भारत सरकार आणि महायुती सरकारचे आभार

by News Desk
July 12, 2025
अजित पवारांनी बारामतीकरांना भरला दम; ‘त्यांना टायरात घालून मारा, तो माझा नातेवाईक का असेना?’
Pune

अजित पवारांनी बारामतीकरांना भरला दम; ‘त्यांना टायरात घालून मारा, तो माझा नातेवाईक का असेना?’

by News Desk
July 12, 2025
काँग्रेसला मोठा धक्का: संजय जगताप भाजपच्या वाटेवर, पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरला!
Pune

काँग्रेसला मोठा धक्का: संजय जगताप भाजपच्या वाटेवर, पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरला!

by News Desk
July 12, 2025
नवऱ्यापेक्षा मित्रच प्रिय; पतीला छळण्यासाठी मित्राची साथ, कंटाळलेल्या पतीने उचललं टोकाचं पाऊल
Pune

नवऱ्यापेक्षा मित्रच प्रिय; पतीला छळण्यासाठी मित्राची साथ, कंटाळलेल्या पतीने उचललं टोकाचं पाऊल

by News Desk
July 11, 2025
Next Post
Pune Corporation

पुणे महापालिकेतील कर्मचारी अधिकाऱ्यांना लागणार शिस्त; आयुक्तांनी जारी केलं नवं वेळापत्रक

Please login to join discussion

Recommended

हृदयद्रावक! ती ८ वर्षांनी पहिल्यांदाच आई होणार होती, पण दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने घातलं विरजण

दीनानाथ रुग्णालय: ‘रुग्णालयाने ते ३५ कोटी ४८ लाख रुपये वापरलेच नाहीत’; चौकशी समितीचा अहवालातून धक्कादायक माहिती

April 10, 2025
Baramati Lok Sabha | सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी शिवतारे मैदानात; महायुतीच्या समन्वय बैठकीचं आयोजन

Baramati Lok Sabha | सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी शिवतारे मैदानात; महायुतीच्या समन्वय बैठकीचं आयोजन

April 2, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत शिवरायांचे किल्ले, पुण्यात पेढे वाटत जोरदार आनंदोत्सव साजरा
Pune

युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत शिवरायांचे किल्ले, पुण्यात पेढे वाटत जोरदार आनंदोत्सव साजरा

July 12, 2025
‘हा दिवस प्रत्येक शिवप्रेमींसाठी अभिमानाचा क्षण’; मानकरांनी मानले भारत सरकार आणि महायुती सरकारचे आभार
Pune

‘हा दिवस प्रत्येक शिवप्रेमींसाठी अभिमानाचा क्षण’; मानकरांनी मानले भारत सरकार आणि महायुती सरकारचे आभार

July 12, 2025
अजित पवारांनी बारामतीकरांना भरला दम; ‘त्यांना टायरात घालून मारा, तो माझा नातेवाईक का असेना?’
Pune

अजित पवारांनी बारामतीकरांना भरला दम; ‘त्यांना टायरात घालून मारा, तो माझा नातेवाईक का असेना?’

July 12, 2025
काँग्रेसला मोठा धक्का: संजय जगताप भाजपच्या वाटेवर, पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरला!
Pune

काँग्रेसला मोठा धक्का: संजय जगताप भाजपच्या वाटेवर, पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरला!

July 12, 2025
नवऱ्यापेक्षा मित्रच प्रिय; पतीला छळण्यासाठी मित्राची साथ, कंटाळलेल्या पतीने उचललं टोकाचं पाऊल
Pune

नवऱ्यापेक्षा मित्रच प्रिय; पतीला छळण्यासाठी मित्राची साथ, कंटाळलेल्या पतीने उचललं टोकाचं पाऊल

July 11, 2025
ढोल-ताशा पथकांसाठी आनंदाची बातमी; पुणे पोलिसांनी जाहीर केला ‘हा’ मोठा निर्णय
Pune

ढोल-ताशा पथकांसाठी आनंदाची बातमी; पुणे पोलिसांनी जाहीर केला ‘हा’ मोठा निर्णय

July 11, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved