पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर होते. यावेळी अजित पवारांच्या हस्ते सावित्री हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी ‘मला ३५ वर्षे बारामतीकरांनी सेवा करण्याची संधी दिली, चांगली आरोग्य सेवा देण्याचा माझा प्रयत्न आहे’, असे म्हणत अजित पवारांनी बारामतीकरांशी संवाद साधला. तसेच बेशिस्त वागणाऱ्यांना टायरात घालून मारा, असे निर्देशही आज त्यांनी बारामती पोलिसांना दिले आहेत.
सुरुवातीलाच सावित्री हॉस्पिटलचे उद्घाटन झाले जाहीर करतो, हॉस्पिटलच्या माध्यमातून चांगली वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली आहे. बारामती शहराची ओळख मेडिकल हब म्हणून होत आहे. पुण्यश्लोक होळकरांच्या नावाने आपण बारामती मेडिकल कॉलेज सुरू केलं. आता, आयुर्वेदिक महाविद्यालयाचे काम सुरू आहे. कॅन्सर हॉस्पिटल देखील आपण बारामतीत करत आहोत. महाराष्ट्रामध्ये बारामतीचे बस स्थानक उत्तम झालं आहे, तसेच वर्कशॉप देखील करत आहोत. बारामती हॉस्पिटलमध्ये कॅन्सर विभाग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच त्याला निधी देण्याचं काम होईल, आरोग्य खातं आपल्याकडेच आहे, असेही अजित पवार म्हणाले आहेत.
गेल्या ३५ वर्षांपासून बारामतीकरांनी दिलेल्या संधीबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना, चांगल्या आरोग्य सुविधा देण्याचा आपला प्रयत्न सुरु आहेत. बारामती, इंदापूरसाठी तसेच महाराष्ट्राकरिता ज्या ज्या गोष्टी करता येतील त्या गोष्टी महायुती सरकार करत आहे. मात्र, कोणाचाही बेशिस्तपणा खपवून घेतला जाणार नाही. बेशिस्त व्यक्तींवर कठोर कारवाई करा, असे निर्देश अजित पवारांनी पोलिसांना दिले आहेत.
काही जण चुका करत आहेत, रस्त्यावर कचरा टाकत आहेत. जनावरे चरायला सोडत आहेत मी त्यांना कृपा करून सांगतो आता ती जनावर कोंडवड्यात घातली तर ठीक, नाही ऐकलं तर त्यांना बाजार दाखवतो. आता जे मालक लोक आहेत त्यांना निर्वाणीचा इशारा देतो, ऐकलं तर ठीक नाही ऐकलं तर मालकांवर केसेस होतील, असं म्हणत अजित पवार यांनी बेशिस्तपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
ज्यांची गाढव आहेत, जनावर आहेत, ज्यांच्या गाई इकडे-तिकडे फिरत असतात. तुम्ही तुमच्या दारात बांधायचे ते बांधा, काय खायला प्यायला घालायचं ते घाला, बारामती जी चांगली करतो ती काय सगळ्यांना मोकळी फिरण्याकरता नाही. बारामतीला स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी नागरिकांनी जबाबदारीने वागावे. नागरिकांनी नियम पाळले नाहीत, तर कठोर पावले उचलली जातील, त्यामुळे बारामतीच्या विकासासाठी सर्वांनी सहभागी व्हा, असे आवाहनही अजित पवारांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या
-काँग्रेसला मोठा धक्का: संजय जगताप भाजपच्या वाटेवर, पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरला!
-ढोल-ताशा पथकांसाठी आनंदाची बातमी; पुणे पोलिसांनी जाहीर केला ‘हा’ मोठा निर्णय
-धक्कादायक! नवऱ्याला त्रिशूळ मारला पण लागला ११ महिन्यांच्या चिमुकल्याला, पोलिसांना वेगळाच संशय
-हिंजवडी आयटी पार्कच्या पायाभूत सुविधांसाठी सरकारचा ॲक्शन प्लॅन, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत काय ठरलं?