पुणे : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रातील १२ गड किल्ल्यांना युनेस्कोकडून “मराठा लष्करी प्रदेश” म्हणून मानांकन मिळाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे नेते दीपक मानकर यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांना निवेदन देत त्यांचे आणि भारत सरकार आणि महायुती सरकारचे आभार मानले आहेत.
‘महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या,शौर्यगाथेची साक्ष देणारे महाराष्ट्रातील किल्ले साल्हेर, शिवनेरी, लोहगड, खांदेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग आणि तामिळनाडूतील जिंजी किल्ला असे १२ किल्ले युनेस्को जागतिक वारसा नामांकन यादीत समाविष्ट झाल्याबद्दल तमाम शिवप्रेमी आणि महाराष्ट्रवासीयांकडून भारत सरकार, महायुती सरकार सर्वांचे मन:पूर्वक आभार’, असे दीपक मानकर यांनी आपल्या निवेदनामध्ये म्हटले आहे.
दरम्यान, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रम आणि शौर्याचे प्रतीक असणाऱ्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाला आहे. त्यानंतर अखंड महाराष्ट्रात आनंदाचं वातावरण आहे. सर्व स्तरातून या निर्णयाचं स्वागत केलं जात आहे.
महत्वाच्या बातम्या
-अजित पवारांनी बारामतीकरांना भरला दम; ‘त्यांना टायरात घालून मारा, तो माझा नातेवाईक का असेना?’
-काँग्रेसला मोठा धक्का: संजय जगताप भाजपच्या वाटेवर, पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरला!
-ढोल-ताशा पथकांसाठी आनंदाची बातमी; पुणे पोलिसांनी जाहीर केला ‘हा’ मोठा निर्णय
-धक्कादायक! नवऱ्याला त्रिशूळ मारला पण लागला ११ महिन्यांच्या चिमुकल्याला, पोलिसांना वेगळाच संशय