पुणे : पुण्यात गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढतच आहे. अशातच आता ‘ग्राइंडर’ या गे डेटिंग ॲपद्वारे झालेल्या ओळखीतून एका तरुणाची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नांदेड सिटी परिसरात घडलेल्या या घटनेत, आरोपीने पीडित तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात ओढून, त्याच्यावर दबाव आणून अश्लील व्हिडिओ शूट केला. त्या व्हिडीओच्या आधारे खंडणीसाठी धमकावल्या प्रकरणी नांदेड सिटी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे, तर दुसरा आरोपी अद्याप फरार आहे.
नांदेड सिटी परिसरातील या घटनेत, पीडित तरुणाची ‘ग्राइंडर’ ॲपवर आरोपीशी ओळख झाली. दोघांमध्ये चॅटिंगद्वारे संपर्क वाढला आणि आरोपीने पीडित तरुणाला विश्वासात घेऊन भेटण्यासाठी बोलावले. प्रत्यक्ष भेटीत, आरोपीने पीडिताला कारमध्ये बसवून एका वेगळ्या ठिकाणी नेले. तिथे त्याच्यावर दबाव टाकून अश्लील व्हिडिओ शूट केला. हा व्हिडिओ कुटुंबीयांना पाठवण्याची धमकी देऊन आरोपीने १० हजार रुपयांची खंडणी मागितली. पीडिताने पैसे देण्यास नकार दिल्यावर, आरोपीने त्याचा मोबाइल हिसकावून घेतला आणि गुगल पे व फोन पेद्वारे पैसे स्वतःच्या खात्यात ट्रान्सफर करून घेतले. यानंतर पीडित तरुणाने नांदेड सिटी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी तत्काळ कारवाई करत रॉबीन उर्फ शुभम कांबळे याला अटक केली, तर दुसरा आरोपी ओंकार मंडलिक सध्या फरार आहे. पोलिसांनी या गुन्ह्यात वापरलेली कार जप्त केली असून, फरार आरोपीचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत असून, डेटिंग ॲपद्वारे होणाऱ्या फसवणुकीच्या वाढत्या घटनांमुळे सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या
-१७ दिवसांनी मिळणार सोन्याचा हंडा, पण निघाली…; सुसंस्कृत पुण्यात आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा
-बुधवार पेठेत जाणाऱ्यांचा पाठलाग, घरापर्यंत जायचे अन् उकळायचे पैसे; पोलिसांनी आवळल्या मुसक्या
-‘बावनकुळे काटेचे गॉडफादर’, प्रवीण गायकवाडांनी पत्रकार परिषदेत दाखवला ‘तो’ व्हिडीओ
-लोकमान्य टिळकांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांचं निधन
-हनी ट्रॅप जाळ्यात आजी माजी मंत्री; महिलेनं व्हिडिओसकट दाखल केली तक्रार