पुणे : पुणे शहर हे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. याच शहरात विद्यार्थ्यांना शाळेत शिक्षण क शाळेबाहेर ड्रग्ज मिळत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील हडपसर येथील एका शाळेत सहाव्या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला अमली पदार्थांचे व्यसन लागले. तो शाळेला दांडी मारून नशा करायचा आणि त्यासाठी घरातील भांडी विकली. आईने पैसे देण्यास नकार दिल्याने त्याने रात्री तिचा गळा दाबला. जेव्हा त्याला याबद्दल विचारले, तेव्हा त्याला काहीच आठवत नव्हते. हे उदाहरण अमली पदार्थांच्या विळख्यात अडकलेल्या शालेय विद्यार्थ्यांच्या समस्येचे गंभीर स्वरूप दर्शवते.
पुणे, जे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते, तिथे केवळ तरुणांनाच नव्हे तर शालेय विद्यार्थ्यांनाही ड्रग्जच्या जाळ्यात अडकण्याचे प्रमाण वाढत आहे. नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांबरोबरच आता चौथी ते सातवी इयत्तेतील मुलांमध्येही अमली पदार्थांचे सेवन वाढत आहे. विशेषत: ‘चॉकलेट’च्या माध्यमातून अमली पदार्थ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
शालेय विद्यार्थ्यांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण २० टक्क्यांपर्यंत वाढले आहे, जे समाज आणि पालकांसाठी धोक्याची घंटा आहे. अमली पदार्थविरोधी अभियानाचे समुपदेशक डॉ. मिलिंद भोई यांनी सांगितले की, मुलांना नशेकडे आकर्षित करण्यासाठी अनोळखी ‘चॉकलेट’ बनवले जात आहे. हे चॉकलेट शाळांभोवतीच्या खाऊच्या दुकानांमध्ये सहज उपलब्ध आहे. मात्र, दुकानदारांना यामध्ये कोकीन आणि ब्राउन शुगरसारखे अमली पदार्थ असल्याची माहितीच नसते. एखाद्या मुलाने असे चॉकलेट खाल्ले, तर त्याला त्याची सवय लागते, ज्यामुळे ही समस्या आणखी गंभीर होत आहे.
ड्रग्जच्या व्यसनात अडकलेल्या मुलांमध्ये एकलकोंडेपणा, हिंसकपणा (कुणाच्या डोक्यात दगड घाल, मारहाण कर वगैरे), तसेच एखादी वस्तू मागितल्यावर पालकांनी लगेच द्यायलाच पाहिजे, अन्यथा मुले आत्महत्येची धमकी देणे, अशी लक्षणे दिसून येतात.
महत्वाच्या बातम्या
-पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?
-पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
-पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
-रेव्ह पार्टी प्रकरण: कोणी कोणी ड्रग्स घेतलं? ससूनच्या वैद्यकीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर