पुणे : कोथरुड पोलीस ठाण्यात तीन दलित मुलींवर शारीरिक आणि मानसिक छळ झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणामुळे पुण्यातील राजकीय वातावरण तापले असून, विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. रविवारी रात्री या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात आंबेडकर, अंजली आंबेडकर, आमदार रोहित पवार आणि अनेक सामाजिक कार्यकर्ते पुणे पोलीस आयुक्तालयात उपस्थित होते.
मुलींनी केलेल्या आरोपांवरुन गुन्हा दाखल करण्यासाठी या सर्वांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. मात्र, पुणे पोलिसांनी रात्री साडेतीन वाजता फक्त चार ओळींचे पत्र देऊन गुन्हा दाखल करण्यास असमर्थता दर्शवली. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या आणि वकील परिक्रमा खोत यांनी मुलींची बाजू पोलिसांसमोर मांडली.
“या मुली खोटं बोलत नाहीत, त्या वेड्या नाहीत. कोणतीही मुलगी अशा प्रकरणात खोटं बोलणार नाही,” असे परिक्रमा खोत यांनी पोलिसांना ठामपणे सांगितले. तरीही, पोलिसांनी या प्रकरणाची दखल न घेता गुन्हा नोंदवण्यास स्पष्ट नकार दिला. मुलींना न्याय मिळावा यासाठी राजकीय नेते आणि सामाजिक कार्यकर्ते रविवारी रात्री उशिरापर्यंत पुणे पोलीस आयुक्तालयात ठाण मांडून बसले होते.
महत्वाच्या बातम्या
-फडणवीसांचा ताफा मॉडेल कॉलनीकडे वळला अन् कार्यकर्ते थेट आयुक्तांच्या दारात उभे राहिले; पण अखेर…
-पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक
-ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?