Thursday, August 7, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

सोमेश्वर फाउंडेशन आयोजित ‘विनायकी विनायक निम्हण गौरव’ शिष्यवृत्ती प्रदान

by News Desk
August 6, 2025
in Pune, पुणे शहर, राजकारण
सोमेश्वर फाउंडेशन आयोजित ‘विनायकी विनायक निम्हण गौरव’ शिष्यवृत्ती प्रदान
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : स्वर्गीय आमदार कार्यसम्राट विनायक निम्हण यांच्या जयंतीनिमित्त सोमेश्वर फाऊंडेशन आयोजित ‘विनायकी विनायक निम्हण गौरव शिष्यवृत्ती’ प्रदान समारंभ आज बालगंधर्व रंगमदिर येथे संपन्न झाला यावेळी डॉ. मुजुमदार बोलत होते. शिक्षण केवळ परीक्षा, गुण, पदवी नव्हे तर शिक्षण म्हणजे एक नवी पिढी घडवणे आहे. या शिक्षण घेणाऱ्या पिढीला कळलं पाहिजे की तुम्ही कितीही शिकलात तरी माणूस व्हायला शिकलं पाहिजे. मात्र आजच दुर्दैव असं आहे की शिक्षण भरपूर मिळतं पण माणुसकी असलेला माणूस व्हायला आपण विसरतोय असे मत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, सिंबायोसिस संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष, डॉ. शां.ब. मुजुमदार यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य सहकारी बँकचे अध्यक्ष बाळासाहेब अनास्कर होते, यावेळी माजी मंत्री तथा राज्य अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर , माजी मंत्री प्रा. सुरेश नवले, आमदार सिद्धार्थ शिरोळे, डिजिटल टेक्नॉलॉजी विशेषतज्ञ डॉ. दीपक शिकारपूर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) विशेषतज्ञ अजित जगताप सुप्रसिद्ध जगद्गुरु कृपांकित डॉ.चेतनंद महाराज पुणेकर, आयोजक सनी निम्हण आदि मान्यवर उपस्थित होते.

You might also like

धक्कादायक: पुणे पालिका आयुक्तांचं घर कोणी लुटलं, सीआयडी चौकशीची मागणी

कोथरुड पोलिसांवर ३ तरुणींना मारल्याचा आरोप; ससून रुग्णालयाचा धक्कादायक रिपोर्ट

प्रांजल खेवलकरांच्या नावे तब्बल २८ वेळा रुम बुकींग, परप्रांतीय मुलींना बोलावून…; नव्या आरोपांमुळे खळबळ

पुढे बोलताना डॉ. मुजुमदार म्हणाले, व्यक्तीला आपल्या कुटुंबामध्ये, राज्यामध्ये, देशामध्ये उन्नत व्हायचे असेल तर दोनच गोष्टी लक्षात ठेवाव्यात एक म्हणजे गुणवत्ता पूर्ण शिक्षण आणि दुसरी गोष्ट म्हणजे उत्तम आरोग्य. सनी निम्हण यांनी या दोन्ही गोष्टींमध्ये लक्ष घालून त्या माध्यमातून समाजसेवा सुरू केली.

मोबाईल मिळाला नाही तर जगण्यात अर्थ नाही असे आजकालच्या मुलांना वाटू लागले आहे. त्यामुळे पालकांना माझा सल्ला आहे की, आपल्या मुलांकडे लक्ष द्या. त्यांना मोबाईलचे वेड तर लागलेले नाहीना, इतर कोणते व्यसन तर नाही ना, हे पहा. मोबाईलची सवय मोडण्यासाठी आपण आठवड्यातून एक दिवस मोबाईलचा उपवास करावा, असेही त्यांनी सांगितले.

अर्जुन खोतकर म्हणाले, वहिनी आणि सनी यांनी आबा गेल्या नंतरही त्यांच्याकडून मिळणारे ममत्व कायम ठेवले आहे. आबा आमच्यासाठी, समाजासाठी कस्तुरी समान होते, आबांचे कार्य राजकारणी आणि उद्योजक म्हणून आदर्श असे होते, त्यांचा वारसा सनी निम्हण यांनी चालवला आहे आणि भविष्यात अनेक विद्यार्थ्यांना ते विनायकी च्या माध्यमातून घडवतील असा विश्वास आहे.

आमदार सिद्धार्थ शिरोळे म्हणाले, विनायक निम्हण यांनी राजकारण करताना सामाजिक भान जपले आहे.एखादा सामजिक उपक्रम सुरू करून पुढे सातत्याने अनेक वर्षे सुरू ठेवणे हे सोपे नाही, मात्र आबांचा वारसा सनी निम्हण यांनी चालवला आहे, आयडॉल स्पर्धा असो की क्रीडा स्पर्धा यातून त्यांचे सामजिक योगदान महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

माजी मंत्री सुरेश नवले म्हणाले, आबा अजन्म कार्यकर्ते राहिले म्हणून ते कार्यसम्राट झाले. विनायकीच्या माध्यमातून आज गुणीजनांचा सन्मान करण्यात येत आहे. शिष्यवृत्ती देण्याची महान परंपरा आपल्या देशाला आहे, बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शिष्यवृत्ती दिली होती त्यातून देशाला एक महान व्यक्तिमत्व मिळाले. मनुष्य गुण आणि अवगुणाची खाण आहे, त्यातील गुणवंत शोधणे आवश्यक असते. पुण्यातील विद्यार्थ्यांना घडवणारा जोहरी सनी निम्हण यांच्या रूपाने उभा आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

प्रास्ताविक करताना सनी निम्हण म्हणाले, सामाजिक काम करणे म्हणजे केवळ पायाभूत सुविधा नव्हे, तर सामाजिक भान देणारे सांस्कृतिक, शैक्षणिक वातावरण आवश्यक असते हे आबांनी सांगितले . विनायकी म्हणजे काय हे आईने आम्हाला शिकवले, आम्ही जे काम सुरू केले आहे ते कायम सुरू ठेवण्यासाठी आम्हाला आबांची प्रेरणा आहे. हि शिष्यवृत्ती फक्त आर्थिक मदत नाही तर तुमची स्वप्न पूर्ण होतील ही आबांची ग्वाही आहे. तुमच्या पुढील वाटचाली साठी प्रेरणा आहे. एक चांगला समाज घडवण्याची माझी भावना आहे. एक सशक्त भारत यातूनच निर्माण होईल असा आमचा विश्वास आहे.

डॉ. शिकारपूर म्हणाले, 26 वर्षा पूर्वी मी आबांना भेटलो होतो, आपली वेबसाईट सुरू करणारे ते देशातील पहिले आमदार होते, आजच्या मुलांनी परदेशी भाषा शिकायला पाहिजे, विशेषतः आपण आज जपानी शिकण्याची गरज आहे कारण त्यात सर्वाधिक संधी भविष्यात उपलब्ध होणार आहेत. जपानचे आपले संबंध चांगले आहेत त्यामुळे त्यांची धोरणे भारतीयांना पूरक आहेत त्याचा फायदा युवा पिढीला होणार आहे.

चैतन्य महाराज पुणेकर म्हणाले, आपण जेव्हा मुलांना हे करा ते करू नका सांगतो तेव्हा आपण स्वतः ते करतो का याचे अवलोकन पालकांनी केले पाहिजे. मुलांनी कोणतेही शिक्षण घेऊ दे त्यांना पालकांनी अध्यात्माची शिकवण दिली पाहिजे. आध्यात्म मुलांना जीवन जगण्याची कला शिकवत. त्यामुळे मुलांवर एकच ध्येय, एकच आयुष्य याचे संस्कार होतात. अर्थात यासाठी मुलांना पोषक वातावरण मिळणे देखील गरजेचे आहे.

अनासकर म्हणाले, आज विद्यार्थ्यांची निवड ही गुणवत्तेच्या आधारावर झाली आहे. पण उच्च शिक्षण घेतल्यावर त्यांच्यात नैतिकतेचा आभाव राहू नये यासाठी याची काळजी घेणे गरजेचे आहे. कारण नैतिकता नसेल तर उच्च शिक्षणाला अर्थ नाही. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अजित जगताप यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे आभार उमेश वाघ आणि अनिकेत मुरकुटे यांनी मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले. आभार प्रदर्शन अमित मुरकुटे, उमेश वाघ यांनी केले.

महत्वाच्या बातम्या

-मोठी बातमी: नवीन प्रभाग रचना अन् ओबीसी आरक्षणासह सर्वोच्च न्यायालयाची निवडणुकांना मंजुरी

-कोथरूड पोलिसांवर गंभीर आरोप; तक्रार दाखल करण्यासाठी रात्री साडेतीन वाजेपर्यंत पोलीस आयुक्तालयात ठाण मांडलं, तरीही…

-‘तुम्ही रां**, तुमची जात….’, पुणे पोलिसांकडून तरुणींना मारहाण; ‘त्या’ व्हिडीओवर सुप्रिया सुळे आक्रमक

-रेड बर्ड ट्रेनिंग: बारामतीकरांच्या सुरक्षिततेला धोका; भाजप युवा मोर्चाची मंत्री मुरलीधर मोहोळांकडे तक्रार

-फडणवीसांचा ताफा मॉडेल कॉलनीकडे वळला अन् कार्यकर्ते थेट आयुक्तांच्या दारात उभे राहिले; पण अखेर…

Tags: Arjun KhotkarBalgandharvapuneSiddharth ShiroleSomeshwar FoundationSunny NimhanVinayak Nimhanअर्जुन खोतकरपुणेबालगंधर्वविनायक निम्हणसनी निम्हणसिद्धार्थ शिरोळेसोमेश्वर फाउंडेशन
Previous Post

डॉ. सतीश कांबळे यांची केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांच्या कार्यालयात “वैद्यकीय सहायता प्रमुख” म्हणून नियुक्ती

Next Post

प्रांजल खेवलकरांच्या नावे तब्बल २८ वेळा रुम बुकींग, परप्रांतीय मुलींना बोलावून…; नव्या आरोपांमुळे खळबळ

News Desk

Related Posts

Municipal Commissioner
Pune

धक्कादायक: पुणे पालिका आयुक्तांचं घर कोणी लुटलं, सीआयडी चौकशीची मागणी

by News Desk
August 6, 2025
कोथरुड पोलिसांवर ३ तरुणींना मारल्याचा आरोप; ससून रुग्णालयाचा धक्कादायक रिपोर्ट
Pune

कोथरुड पोलिसांवर ३ तरुणींना मारल्याचा आरोप; ससून रुग्णालयाचा धक्कादायक रिपोर्ट

by News Desk
August 6, 2025
Khadse

by Team Local Pune
August 5, 2025
Pune Palika
Pune

मोठी बातमी: नवीन प्रभाग रचना अन् ओबीसी आरक्षणासह सर्वोच्च न्यायालयाची निवडणुकांना मंजुरी

by News Desk
August 4, 2025
Next Post
Khadse

प्रांजल खेवलकरांच्या नावे तब्बल २८ वेळा रुम बुकींग, परप्रांतीय मुलींना बोलावून...; नव्या आरोपांमुळे खळबळ

Please login to join discussion

Recommended

राहुल गांधींच्या अडचणी वाढणार? पुणे न्यायालयाने धाडले समन्स; नेमकं प्रकरण काय

राहुल गांधींच्या अडचणी वाढणार? पुणे न्यायालयाने धाडले समन्स; नेमकं प्रकरण काय

October 5, 2024
Panjaka Munde And Ajit Pawar

‘मराठवाड्याचा विकास बारामतीसारखा करणार’; पंकजा मुंडेंनी केलं अजितदादांचं कौतुक

January 16, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

Municipal Commissioner
Pune

धक्कादायक: पुणे पालिका आयुक्तांचं घर कोणी लुटलं, सीआयडी चौकशीची मागणी

August 6, 2025
कोथरुड पोलिसांवर ३ तरुणींना मारल्याचा आरोप; ससून रुग्णालयाचा धक्कादायक रिपोर्ट
Pune

कोथरुड पोलिसांवर ३ तरुणींना मारल्याचा आरोप; ससून रुग्णालयाचा धक्कादायक रिपोर्ट

August 6, 2025
Khadse
Pune

प्रांजल खेवलकरांच्या नावे तब्बल २८ वेळा रुम बुकींग, परप्रांतीय मुलींना बोलावून…; नव्या आरोपांमुळे खळबळ

August 6, 2025
सोमेश्वर फाउंडेशन आयोजित ‘विनायकी विनायक निम्हण गौरव’ शिष्यवृत्ती प्रदान
Pune

सोमेश्वर फाउंडेशन आयोजित ‘विनायकी विनायक निम्हण गौरव’ शिष्यवृत्ती प्रदान

August 6, 2025
डॉ. सतीश कांबळे यांची केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांच्या कार्यालयात “वैद्यकीय सहायता प्रमुख” म्हणून नियुक्ती
Pune

डॉ. सतीश कांबळे यांची केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांच्या कार्यालयात “वैद्यकीय सहायता प्रमुख” म्हणून नियुक्ती

August 5, 2025
Pune Palika
Pune

मोठी बातमी: नवीन प्रभाग रचना अन् ओबीसी आरक्षणासह सर्वोच्च न्यायालयाची निवडणुकांना मंजुरी

August 4, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved