Saturday, August 2, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

पुणे ड्रग्ज रॅकेटचा मुख्य सूत्रधार संदीप धुनिया; एटीएस, एनआयए, सीबीआय, एनसीबीकडून देखील तपास

by News Desk
February 24, 2024
in Pune, पुणे शहर
पुणे ड्रग्ज रॅकेटचा मुख्य सूत्रधार संदीप धुनिया; एटीएस, एनआयए, सीबीआय, एनसीबीकडून देखील तपास
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुणे पोलिसांनी देशातील सर्वात मोठे ड्रग्ज रॅकेट उघडकीस आणले आहे. या ड्रग्ज प्रकरणातील मुख्य सूत्रधाराचे नाव आता समोर आले आहे. मुख्य सूत्रधाराच्या तपासासाठी आता थेट ‘इंटरपोल’ची मदत घेतली जाणार आहे. सीबीआयच्या मदतीने पुणे पोलिसांनी ‘रेड कॉर्नर’ नोटीस बजावण्याची तजवीज केली आहे.

संदीप धुनिया (रा. पाटणा, बिहार) असे मुख्य सूत्रधाराचे नाव आहे. सध्या हा मुख्य आरोपी आखाती देशातील कुवैतमध्ये असल्याची महत्वपूर्ण माहिती पोलिसांच्या हाती लागली असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. या खटल्यासाठी विशेष वकिलांची नेमणूक देखील केली गेली आहे. हा खटला जलदगती न्यायालयात (फास्ट ट्रॅक कोर्ट) चालवला जाणार आहे. दरम्यान, आजवर ३ हजार ५०० कोटींचे साधारण १७६० किलोच्या आसपास ‘एमडी’ ड्रग्जचा साठा पुणे पोलिसांनी जप्त केला आहे.

You might also like

फडणवीसांचा ताफा मॉडेल कॉलनीकडे वळला अन् कार्यकर्ते थेट आयुक्तांच्या दारात उभे राहिले; पण अखेर…

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

पुणे पोलिसांनी यापूर्वी वैभव ऊर्फ पिंट्या भारत माने (वय ४०, रा. सोमवार पेठ), अजय अमरनाथ करोसिया (वय ३५, रा. भवानी पेठ), हैदर नूर शेख (वय ४०, रा. विश्रांतवाडी), भिमाजी परशुराम साबळे (वय ४०), युवराज बब्रूवान भुजबळ (वय ४१, रा. डोंबिवली पश्चिम), दिवेश चिरंजीव भुटीया (वय नवी दिल्ली), संदीप राजपाल कुमार (रा. नवी दिल्ली) आणि संदीप हनुमानसिंग यादव (रा. नवी दिल्ली), आयुब अकबरशहा मकानदार (वय ४४, रा. कुपवाड, सांगली) यांना अटक केली आहे.

आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, धुनिया हा मूळचा भारतीय असला तरी त्याच्याकडे ब्रिटीश पासपोर्ट आहे. त्याला ‘डीआरआय’ने २०१६ साली कारवाई करीत १५० किलो ‘एमडी’ जप्त केले होते. त्यावेळी ‘डीआरआय’ने यातील आरोपी विपिन कुमार याला पुण्यामधून अटक केली होती. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीवरुन  संदीप धुनिया, सोनम ऊर्फ सीमा पंडीत हिला देखील अटक करण्यात आली होती.

या गुन्ह्यात विपिन कुमार हा येरवडा कारागृहात बंद आहे. तर, संदीप धुनिया हा जामिनावर बाहेर होता. त्यानेच कुरकुंभ येथे ‘अर्थकेम लॅबोरेटरी प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीमधील केमिकल तज्ज्ञ युवराज भुजबळ याला ‘एमडी’ बनवण्याचे काम दिले होते. ३० जानेवारी रोजी संदीप धुनिया हा नेपाळमधील काठमांडू येथे गेला. तेथून तो कुवैतमध्ये पळाला. दरम्यान, त्याने नेपाळमध्ये ‘एमडी’ ठेवण्यासाठी जागा शोधण्याचा प्रयत्न केला. दिल्लीमध्ये पुणे पोलिसांनी पकडलेले ‘एमडी’ नेपाळमध्ये लपवून ठेवले जाणार होते. तेथून ते लंडनमध्ये पाठवले जाणार होते.

दरम्यान, या ड्रग्ज प्रकरणाच्या तपासात राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए), सीबीआय, एनसीबी आदी राष्ट्रीय यंत्रणांसह राज्याच्या दहशतवाद विरोधी पथक देखील सहभागी झाले आहे. ‘टेरर फंडिंग’, ‘अंडरवर्ल्ड’ यासह हवाला रॅकेटचा देखील तपास केला जात असल्याची माहिती समोर आली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-घरबसल्या करता येणार मतदान; यंदाच्या लोकसभा निवडणुकीत देशभर सुविधा, वाचा..

-दिलासादायक! भर उन्हाळ्यात पुणेकरांची पाणी कपात टळली; कालवा समितीच्या बैठकीत निर्णय

-घड्याळात वेळ झाली तुतारी वाजवण्याची; शरद पवार गटाकडून अनावरण सोहळ्याचा व्हिडीओ रिलीज

-शिंदे-फडणवीस-पवार २ मार्चला बारामतीत प्रचाराचा नारळ फोडणार!; अनेक विकासकामांचं उद्घाटन

-कात्रजच्या ‘क्वालिटी बेकरीत’ एक्सपायर फुडची विक्री; हिंदुत्ववादी संघटनेकडून बेकरीची तोडफोड

Tags: Ajay KarosiaDivesh BhutiaHaider Sheikhpune policeSandeep DhuniaSandeep KumarSandeep YadavVaibhav ManeYuvraj Bhujbalअजय करोसियादिवेश भुटीयापुणे पोलीसयुवराज भुजबळवैभव मानेसंदीप कुमारसंदीप धुनियासंदीप यादवहैदर शेख
Previous Post

घरबसल्या करता येणार मतदान; यंदाच्या लोकसभा निवडणुकीत देशभर सुविधा, वाचा..

Next Post

बारामतीच्या राजकारणाला वेग; सुनेत्रा पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

News Desk

Related Posts

फडणवीस आज पुण्यातील मंत्री करणार फिक्स! कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ?
पुणे शहर

फडणवीसांचा ताफा मॉडेल कॉलनीकडे वळला अन् कार्यकर्ते थेट आयुक्तांच्या दारात उभे राहिले; पण अखेर…

by News Desk
August 2, 2025
पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक
Pune

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

by News Desk
August 2, 2025
ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?
Pune

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

by News Desk
August 2, 2025
विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

by News Desk
August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

by News Desk
July 31, 2025
Next Post
बारामतीच्या राजकारणाला वेग; सुनेत्रा पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

बारामतीच्या राजकारणाला वेग; सुनेत्रा पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Recommended

Amit Shah

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची चाहूल, विधानसभेनंतर अमित शहा पहिल्यांदाच पुणे दौऱ्यावर; नेमकं कारण काय?

February 15, 2025
Zika Virus

पुणेकरांनो सावधान! झिका वाढतोय, शहरात रुग्णांचा आकडा १९ वर; वाचा सर्वात जास्त धोका कोणत्या भागात?

July 13, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

फडणवीस आज पुण्यातील मंत्री करणार फिक्स! कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ?
पुणे शहर

फडणवीसांचा ताफा मॉडेल कॉलनीकडे वळला अन् कार्यकर्ते थेट आयुक्तांच्या दारात उभे राहिले; पण अखेर…

August 2, 2025
पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक
Pune

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

August 2, 2025
ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?
Pune

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

August 2, 2025
विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved