Saturday, August 2, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

पुणे शहराला हवा “व्हिजनरी” खासदार, कोणाचे पारडे जड जनताच ठरवणार; हे मुद्दे एकदा वाचाचं

by News Desk
February 27, 2024
in Pune, पुणे शहर, राजकारण
पुणे शहराला हवा “व्हिजनरी” खासदार, कोणाचे पारडे जड जनताच ठरवणार; हे मुद्दे एकदा वाचाचं
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्यासाठी काही दिवसांचा अवधि शिल्लक असताना पुण्यामध्ये भाजपचा आणि महाविकास आघाडीचा लोकसभेचा उमेदवार कोण असणार? याबाबत केवळ पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्येच नव्हे तर राजकीय वर्तुळात आणि सार्वजनिक ठिकाणीही चर्चांना उधाण आलेले दिसते आहे. या चर्चा होत असताना पक्षाचे कार्यकर्ते, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा अशा विविध क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते, नागरिक यांच्या मतांचा कानोसा घेतला असता इच्छुकांनी आजपर्यंत काय कामे केली? याचा लेखाजोगा, एकूणच पुणे शहर लोकसभेचे प्रतिनिधित्व करताना त्याची काम करण्याची पद्धत, राजकीय परिपक्वता, मतदार संघावर पकड असणारा नेता आणि शहरासाठी विकासाच्या दृष्टीने पुढील २५ वर्षांचे व्हीजन असलेला खासदार असावा असा सूर दिसून येत आहे.

पुणे लोकसभेसाठी माजी महापौर मुरलीधर मोहोळ, भाजपचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, फ्रेंड्स ऑफ बीजेपीचे शिवाजी मानकर, माजी खासदार संजय काकडे, हे चार मराठा चेहरे प्रामुख्याने उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. याशिवाय माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनीही जोरदार तयारी केली आहे. मात्र, आता राज्यसभेसाठी मेधा कुलकर्णी यांच्या निमित्ताने भाजपने ब्राह्मण उमेदवाराला संधी दिली आहे. हे गणित बघता पुन्हा लोकसभेसाठी सुनील देवधर यांना संधी दिली जाणार का, यावर मतमतांतरे दिसून येत आहेत. कॉँग्रेसकडून आमदार रवींद्र धंगेकर, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, शहराध्यक्ष अरविंद शिंदे आदी इच्छुक आहेत.

You might also like

फडणवीसांचा ताफा मॉडेल कॉलनीकडे वळला अन् कार्यकर्ते थेट आयुक्तांच्या दारात उभे राहिले; पण अखेर…

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

या इच्छुक उमेदवारांमध्ये विविध क्षेत्रातील पुणेकरांना वर सांगितल्याप्रमाणे अपेक्षित उमेदवार म्हणून पाहिल्यास या सर्वांमध्ये भाजपचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ हे सरस असल्याचे चित्र आहे. तीन वेळा नगरसेवक राहिलेल्या मोहोळ यांनी विविध विषय समित्या आणि स्थायी समिती अध्यक्ष, पीएमपीएलचे साडेतीन वर्षे संचालक आणि अडीच वर्षे महापौर पद भूषविले आहे. मुरलीधर मोहोळ हे अखिल भारतीय महापौर परिषदेचे उपाध्यक्ष ही होते.

या जबाबदाऱ्या पार पाडताना त्यांनी विविध उपक्रम आणि कार्यक्रम राबवत शिक्षणाचे माहेरघर आणि सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यामध्ये आपली एक मिनी खासदार अशी प्रतिमा निर्माण केली आहे. काही उपक्रम तर अनेक वर्षांपासून ते राबवत आहेत. त्यामध्ये इयत्ता १० वी, १२वीच्या गुणवंत विद्यार्थ्याचा सन्मान हा त्यांचा उपक्रम गेली २१ वर्षे अखंडपणे सुरू आहे तर भव्यदिव्य कोथरूड सांस्कृतिक महोत्सवही सलग १२ वर्षे सुरू आहे.

मोहोळ यांच्या कामाची आणि काम करण्याच्या पद्धतीची खरी ओळख झाली ती कोरोनाच्या काळात. या काळात ते महापौर होते. त्यांनाही कोरोनाने गाठले होते. मात्र, त्यातून बाहेर येत त्यांनी फेसबूकच्या माध्यमातून अखंडपणे जनसंवाद करत पुणेकरांना धीर दिला. त्यामुळे ‘कोरोनाला हरवणारा महापौर’ ते ‘कोरोनाग्रस्तांना आधार देणारा महापौर’ अशी प्रतिमा त्यांची जनमानसात झाली.
पुणे महापालिकेचे पहिले वैद्यकीय महाविद्यालय व्हावे यासाठी त्यांनी १९१७-१८ मध्ये स्थायी समितीचे अध्यक्ष असताना अर्थसंकल्पामध्ये केलेली आर्थिक तरतूद, त्यासाठी तातडीने ट्रस्ट स्थापन करून राज्य सरकारची मान्यता आणि केंद्र सरकारच्या एनएमसी अर्थात नॅशनल मेडिकल कमिशनची मान्यता मिळवण्यासाठी केलेला पाठपुरावा, त्याला आलेले यश यामुळे पुण्यनगरीच्या मुकूटावर आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला.

कर्वे रस्त्यावरील वाहतुकीची समस्या सोडविण्याच्या दृष्टीने कर्वे रस्त्यावरील पहिला दुमजली उड्डाणपुल असेल, पुणे शहराची सार्वजनिक वाहतुकीची आणि प्रदूषणाची समस्या लक्षात घेऊन केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून इलेक्ट्रिक बस पुणे शहरात आणल्या आणि अजूनही येत आहेत. त्यामुळे सध्या रस्त्यावर पीएमपीएलमध्ये एकही डिझेलवर चालणारी बस नाही. सार्वजनिक वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक बसचा वापर करणारे सर्वात मोठे सेंटर म्हणून पुणे शहर झाले आहे. या सर्वाचे श्रेय हे मोहोळ यांनाच जाते. याशिवाय नदी सुधार प्रकल्प, नदी पुनर्जीवन प्रकल्प, सार्वजनिक वाहतूक , २४/७ पाण्याची योजना यासाठी सातत्याने प्रयत्न केले आणि पुणे शहराच्या भविष्याचा विचार करून अनेक प्रकल्प पूर्णत्वास नेले.

कोरोनानंतर पुणे शहरात निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन आपला वाढदिवस साजरा न करता ‘रक्तदान महासंकल्पा’सारखे उपक्रम ते घेत आहेत त्या माध्यमातून १८ हजार रक्त पिशव्यांचे संकलन झाले. त्याबरोबरच आरोग्य शिबिर आणि विविध सामाजिक उपक्रम त्यांनी राबविले. पुणे महानगर पालिका आवारात स्वखर्चाने शिवाजी महाराजांचा पुतळा मोहोळ यांनी बसवला. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते भूमिपूजन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले.

या सर्व कार्याबरोबरच स्वत: पैलवानकी केलेल्या मोहोळ यांनी कोथरूडमध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धा, राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धा भरवल्या तसेच कीर्तन महोत्सवाचे आयोजन करून संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले.

अटल संस्कृती गौरव पुरस्कार आणि अयोध्येत रामलल्लाच्या मूर्तीची 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठापना झाली. त्यानिमिताने कुमार विश्वास यांच्या ‘अपने अपने राम’ कार्यक्रमाचे भव्यदिव्य आयोजन त्यांनी केले.

दुसरे इच्छुक जगदीश मुळीक यांनी पुणे शहर अध्यक्ष म्हणून काम करताना शहराच्या सर्व भागांत संपर्क केला. बागेश्वरधाम, जया किशोरी यांचे कार्यक्रम असोत की शहरात आयोजित केलेली मॅरेथॉन असो या निमित्ताने ते सतत पुणेकरांसमोर राहिले आहेत. सुनील देवधर यांनीही विविध कार्यक्रम आणि उपक्रमांच्या माध्यमातून जनसंपर्क वाढवला आहे. रवींद्र धंगेकर यांनी कसब्याची पोटनिवडणूक जिंकल्याने कॉँग्रेसकडून त्यांनाच उमेदवारी दिली जाते की आणखी कोणाला दिली जाते हे अद्याप निश्चित नाही.

वरील सर्व गोष्टींचा ऊहापोह केल्यानंतर पुण्याचा खासदार म्हणून विविध क्षेत्रातील लोकांना, मतदारांना अपेक्षित असलेला, सर्व क्षेत्रात आणि सर्व पातळ्यांवर सक्षमपणे काम करू शकणारा व मतदार संघावर पकड असणारा, पुणे शहराच्या विकासाच्या दृष्टीने व्हीजन असलेल्या उमेदवारांमध्ये मुरलीधर मोहोळ यांचेच नाव अग्रस्थानी येत आहे.

महत्वाच्या बातम्या-

-“त्यावेळी बाळासाहेबांमुळे सुप्रिया सुळे पहिल्यांदा राज्यसभेवर बिनविरोध निवडून आल्या होत्या”- शरद पवार

-पुणेकरांनो पाणी जपून वापरा! पाणीकपात टळली मात्र, या भागांत गुरुवारी पाणी पुरवठा बंद

-“छत्रपती शिवरायांनी औरंगजेबाला तहात २३ किल्ले दिले त्याला इथेच गाडलं, ठाकरे पवारांनी ४०-४० आमदार दिलेत”

-पिंपरी-चिंचवड बालेकिल्ला पुन्हा ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात चढाओढ

-‘पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी संधी हवी’; शिवाजी मानकरांनी भाजपकडे मागितली उमेदवारी

Tags: bjpDevendra FadnavisJagdish MulikLok Sabha ElectionMohan JoshiMuralidhar MoholNarendra ModipuneRavindra DhangekarShivaji MankarSunil DeodharYewlaजगदीश मुळीकदेवेंद्र फडणीवसनरेंद्र मोदीपुणेभाजपमुरलीधर मोहोळमोहन जोशीयेवलारविंद्र धंगेकरलोकसभा निवडणूकशिवाजी मानकरसुनील देवधर
Previous Post

“त्यावेळी बाळासाहेबांमुळे सुप्रिया सुळे पहिल्यांदा राज्यसभेवर बिनविरोध निवडून आल्या होत्या”- शरद पवार

Next Post

कसब्यातील प्रलंबित विकासकामे लवकर मार्गी लावा, हेमंत रासनेंनी घेतली पालिका आयुक्तांची भेट

News Desk

Related Posts

फडणवीस आज पुण्यातील मंत्री करणार फिक्स! कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ?
पुणे शहर

फडणवीसांचा ताफा मॉडेल कॉलनीकडे वळला अन् कार्यकर्ते थेट आयुक्तांच्या दारात उभे राहिले; पण अखेर…

by News Desk
August 2, 2025
पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक
Pune

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

by News Desk
August 2, 2025
ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?
Pune

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

by News Desk
August 2, 2025
विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

by News Desk
August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

by News Desk
July 31, 2025
Next Post
कसब्यातील प्रलंबित विकासकामे लवकर मार्गी लावा, हेमंत रासनेंनी घेतली पालिका आयुक्तांची भेट

कसब्यातील प्रलंबित विकासकामे लवकर मार्गी लावा, हेमंत रासनेंनी घेतली पालिका आयुक्तांची भेट

Recommended

Pune Traffic

Pune Traffic: दारु पिऊन गाडी चालवणं तरुणाला पडलं महागात; ५ दिवस जेल अन्…

February 9, 2025
डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटो खाली नाव,  आमदार महेश लांडगेंनी व्यक्त केली दिलगिरी

डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटो खाली नाव, आमदार महेश लांडगेंनी व्यक्त केली दिलगिरी

September 29, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

फडणवीस आज पुण्यातील मंत्री करणार फिक्स! कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ?
पुणे शहर

फडणवीसांचा ताफा मॉडेल कॉलनीकडे वळला अन् कार्यकर्ते थेट आयुक्तांच्या दारात उभे राहिले; पण अखेर…

August 2, 2025
पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक
Pune

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

August 2, 2025
ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?
Pune

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

August 2, 2025
विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved