Monday, June 16, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Lifestyle

तुम्हीही रोज दूध पिताय पण काहीच फायदा नाही, जाणून घ्या दूध पिण्याची योग्य वेळ; होतील ‘हे’ आरोग्यदायी फायदे

by News Desk
March 27, 2024
in Lifestyle
तुम्हीही रोज दूध पिताय पण काहीच फायदा नाही, जाणून घ्या दूध पिण्याची योग्य वेळ; होतील ‘हे’ आरोग्यदायी फायदे
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

Milk : शारिरीक स्वास्थ चांगले ठेवण्यासाठी रोजच्या आहारात दुधाचा समावेश असावा. दुधामध्ये असणारे व्हिटॅमिन डी आणि कॅल्शिअम आयुष्यभर हाडे मजबूत ठेवते. दुधामुळे आपल्या शरीराला उर्जा तर मिळतेच सोबतच अनेक आजारांपासून संरक्षणही करते. अशा असंख्य फायद्यांमुळे अनेक जण रोजच्या आहारात दुधाचा समावेश करतातच. दुधामुळे होणाऱ्या असंख्य फायद्यांमुळे अनेक नियमित दूध पितात. मात्र, नियमीत दूध पिले तरीही अनेक लोकांना फायदे मिळत नाहीत. चूकीच्या वेळी दूध पिल्याने दूधाचे फायदे होताना दिसून येत नाही.

मजबूत हाडे आणि दात: दूध हे कॅल्शियम आणि ‘व्हिटॅमिन डी’चा महत्वाचा आणि नैसर्गिक स्रोत आहे. म्हणून दूधाच्या नियमित सेवनाने आपली हाडे मजबूत होतात आणि दातांसाठी दुधाचा फायदा होतो.

You might also like

हिरोला लाजवेल अशी दिमाखात हेलिकॉप्टरनं एन्ट्री, व्यावसायिकानं खरेदी केलेली अलिशान कार एकदा पहाच

पुण्यात १ रुपयात ड्रेसची ऑफर महागात; महिलांनी लावली रांगच राग, दुकानदार गायब

तुमचेही केस कमी वयात पांढरे होतात का? जाणून घ्या नेमकी कारणं कोणती

रोगप्रतिकारक शक्ती वाढवते: आपल्या शरीराला आवश्यक असणारे जीवनसत्वे आणि खनिजे हे आपल्याला दुधापासून मिळतात. दुधामध्ये असणाऱ्या व्हिटॅमिन बी-१२ देखील असतं. जे आपल्या आपली निरोगी प्रतिकारशक्ती वाढवून आपल्याला आजारापासून आपल्या शरीराचे संरक्षण करते.

हायड्रेटेड करते: सध्या उन्हाळा प्रचंड जाणवत आहे. अशात आपण आपल्या शरिराला हायड्रेट ठेवणं गरजेचं आहे. शरिराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी आवश्यक द्रवपदार्थांच्या सेवनात दुधाची जोड दिल्याने पोषणासह हायड्रेटेड राहण्यास मोठी मदत होत असते.

स्नायूंसाठी पॉवरहाऊस: दुधामधील प्रथिनांचे प्रमाण स्नायूंच्या वाढीमध्ये आणि दुरुस्तीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. यामुळे दररोज एक ग्लास दुधाचे सेवन हे स्नायूंना बळकट करू शकते. व्यायाम करणाऱ्या किंवा स्नायूंचा आकार वाढवू इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी दूध फायदेशीर ठरू शकते.

नियमित दूधाचे सेवन केल्याने हाडे कमकुवत करणारी स्थिती (ऑस्टियोपोरोसिस) आणि हृदय तसेच रक्तवाहिन्यांसंबधी रोग दीर्घकालीन आजारांचा धोका कमी करण्यासाठी मदत होते.

दूध पिण्याची योग्य वेळ कोणती असावी?

दूध पिल्याने अनेक फायदे आहेत हे तर सर्वांनाच माहिती आहे. मात्र अनेकांनी दूध पिऊनही काही फायदा होत नसल्याचं सांगितलं. याचे मूळ कारण आहे ते म्हणजे दूध पिण्याची योग्य वेळ असते. वेळी अवेळी दूध पिले तर काही फायदा होत नाही. डाॅक्टर रात्री दूध पिण्याचा सल्ला देतात.

रात्री दूध प्यायल्याने चांगली झोप येण्यास मदत होते. त्यामुळे आपले शरीर हे दुधातून जास्तीत जास्त कॅल्शियम शोषून घेते. मात्र, दिवसभरातही दूध प्यायल्यास काहीही नुकसान होत नाही. फक्त फायदे जास्त होत नाहीत. ‘रिकाम्या पोटी दूध पिणे शक्यतो टाळावे. कारण रिकाम्या पोटी दूध प्यायल्याने बद्धकोष्ठता आणि गॅसच्या समस्या होऊ शकतो. पचनासंबंधी समस्या असणाऱ्यांनी याबाबत अधिक सावधगिरी बाळगली पाहिजे’, असे डॉक्टरांच्या मत आहे.

दूध पिल्याने होणारे फायदे आता आपण पाहिले मात्र सिंघवाल यांच्या माहितीनुसार काही विशिष्ट स्थितींमध्ये लोकांनी दूध पिण्याचे प्रमाण कमी ठेवायला हवे. कारण काही लोकांच्या शरीरात दुधात आढळणारी साखर पचवण्यासाठी आवश्यक असलेल्या लॅक्टेज एन्झाइमची कमतरता असते. यामुळे दूध प्यायल्याने पोट फुगणे, गॅस आणि अतिसार यांसारखे त्रास होऊ शकतात. त्यामुळे अशा लोकांनी दूध कमी प्रमाणात प्यावे.

काही लोकांना दुधातील प्रथिनांचे पचन कठीण होऊ शकते. ज्यामुळे पुरळ, अंगावर पित्ताच्या गाठी येणे असे त्रास होऊ शकतात. दुधाची अॅलर्जी होऊ शकते. दुधात सॅच्युरेटेड फॅट्स असतात, ज्या मुळात घातक नसल्या तरी जास्त प्रमाणात सेवन केल्याने हे फॅट्स हृदयविकारास कारणीभूत ठरू शकतात. ज्यांना अगोदरच हृदयविकारांचा त्रास आहे अशा लोकांनी किंवा उच्च कोलेस्ट्रॉल अतिप्रमाणात आहे अशा लोकांनी जास्त फॅट्स असणारे दूध पिणे शक्यतो टाळावेच.

महत्वाच्या बातम्या-

-अखेर अदिती राव आणि सिद्धार्थ अडकले विवाह बंधनात! तेलंगणामधील मंदिरात गुपचूप उरकला लग्नसोहळा

-वस्ताद काकांना धोबीपछाड देण्यासाठी अजितदादांची पैलवान बैठक, म्हणाले, “मी काही फक्त बारामती बारामती…”

-वसंत मोरे मराठा समाजाचे उमेदवार म्हणून राजकीय वर्तुळात चर्चा; मोरे बैठकीतून तडकाफडकी निघाले

-Pune Lok Sabha | मोहोळांची ताकद वाढली! मुरलीधर मोहोळांच्या पाठिशी आता संजय काकडेंचेही बळ

-बारामतीच्या राजकारणात मोठी घडामोड; सुप्रिया सुळे-सुनेत्रा पवार पुन्हा येणार एकत्र!

Tags: FitnessHealthMilkNightTimeआरोग्यदूधफिटनेसरात्रवेळ
Previous Post

अखेर अदिती राव आणि सिद्धार्थ अडकले विवाह बंधनात! तेलंगणामधील मंदिरात गुपचूप उरकला लग्नसोहळा

Next Post

Lok Sabha Election | “शिवसंस्कार हाच आमचा पिंड” म्हणत अमोल कोल्हे आढळराव पाटलांच्या पाया पडले

News Desk

Related Posts

हिरोला लाजवेल अशी दिमाखात हेलिकॉप्टरनं एन्ट्री, व्यावसायिकानं खरेदी केलेली अलिशान कार एकदा पहाच
Fashion

हिरोला लाजवेल अशी दिमाखात हेलिकॉप्टरनं एन्ट्री, व्यावसायिकानं खरेदी केलेली अलिशान कार एकदा पहाच

by News Desk
June 8, 2025
Pune
Fashion

पुण्यात १ रुपयात ड्रेसची ऑफर महागात; महिलांनी लावली रांगच राग, दुकानदार गायब

by News Desk
January 27, 2025
White Hairs
Lifestyle

तुमचेही केस कमी वयात पांढरे होतात का? जाणून घ्या नेमकी कारणं कोणती

by News Desk
December 20, 2024
Winter Skin Care
Lifestyle

हिवाळ्यात तुमची त्वचा कोरडी अन् काळी पडतेय? ‘हे’ केल्याने त्वचा होईल अगदी नितळ

by News Desk
December 11, 2024
Drugs
Lifestyle

पुणे, मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; नशेच्या गोळ्या, अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या ३ तरुणासह ड्रग्स डिलरला ठोकल्या बेड्या

by News Desk
December 5, 2024
Next Post
Lok Sabha Election | “शिवसंस्कार हाच आमचा पिंड” म्हणत अमोल कोल्हे आढळराव पाटलांच्या पाया पडले

Lok Sabha Election | "शिवसंस्कार हाच आमचा पिंड" म्हणत अमोल कोल्हे आढळराव पाटलांच्या पाया पडले

Recommended

Dry Eyes? सततच्या स्क्रीन वापरामुळे होणाऱ्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी फक्त ‘हा’ व्यायाम करा; लगेच मिळेल आराम

Dry Eyes? सततच्या स्क्रीन वापरामुळे होणाऱ्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी फक्त ‘हा’ व्यायाम करा; लगेच मिळेल आराम

May 26, 2024
पुण्यात कोणत्या पबला किती हप्ता? अंधारे अन् धंगेकरांनी यादीच वाचून दाखवली; नेमकं काय घडलं?

पुण्यात कोणत्या पबला किती हप्ता? अंधारे अन् धंगेकरांनी यादीच वाचून दाखवली; नेमकं काय घडलं?

May 27, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला
Pune

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला

June 14, 2025
अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?
Pune

अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?

June 14, 2025
पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?
Pune

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

June 14, 2025
Ajit Pawar
Pune

अजितदादा भाषणाला उठताच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घातला राडा; पोलिसांनी घेतलं ताब्यात

June 14, 2025
‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
Pune

‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

June 13, 2025
मुलाचा पदवीदान सोहळा आणि लेकीला सरप्राईज द्यायला निघाले होते, पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं
Pune

मुलाचा पदवीदान सोहळा आणि लेकीला सरप्राईज द्यायला निघाले होते, पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं

June 13, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved