Saturday, August 2, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

पुण्यात महाविकास आघाडीत वादाची ठिणगी! ठाकरे गटाने केली ‘ही’ मागणी; धंगेकरांचे टेन्शन वाढलं!

by News Desk
March 28, 2024
in Pune, पुणे शहर, राजकारण
पुण्यात महाविकास आघाडीत वादाची ठिणगी! ठाकरे गटाने केली ‘ही’ मागणी; धंगेकरांचे टेन्शन वाढलं!
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुणे लोकसभा मतदार संघात महायूतीकडून मुरलीधर मोहोळ आणि महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दोन्ही बाजूंनी वैयक्तिक भेटीगाठी, मेळावे घेत प्रचाराला सुरुवात केली आहे. दरम्यान, भाजपकडून नाराज असलेले सर्वजण सक्रिय झाल्याचे चित्र असताना महाविकास आघाडीमध्ये सुंदोपसुंदी पहायला मिळत आहे. लोकसभा निवडणूक नियोजनासंदर्भात महाविकास आघाडीच्या बैठकीत शिवसेना ठाकरे गटाची नाराजी स्पष्ट दिसून आली. अगोदर विधानसभा निवडणुकीच्या वेळी कसबा शिवसेनेच्या ठाकरे गटाला सोडला जाईल हे आधी जाहीर करा, तरच लोकसभेसाठी काम करू असा पवित्रा ठाकरे गटाने घेतल्याने धंगेकरांचे टेन्शन वाढले आहे.

भाजपचे मुरलीधर मोहोळ यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपमधून इच्छुक असलेले भाजपचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी खासदार संजय काकडे हे त्यांची नाराजी सोडून सक्रिय झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस(अजित पवार गट) शिवसेना(शिंदे गट) हेही मोहोळ यांच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र आहे.

You might also like

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

महाविकास आघाडीच्या शहर पातळीवरच्या नेत्यांची बैठक नुकतीच कॉँग्रेसभवन येथे पार पडली. बैठक सुरू असतानाच शिवसेना ठाकरे गटाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. कसबा विधानसभामध्ये यापूर्वी आम्ही भाजपची तळी उचलली, आता कॉँग्रेसची उचलत आहोत. प्रचारात सहभागी होऊ पण विधानसभा निवडणुकीमध्ये कसबा शिवसेना ठाकरे गटाला सोडणार असा शब्द द्या असा इशारा देतानाच आम्ही आयुष्यभर दुसऱ्यांच्याच तळ्या उचलायच्या का? असा प्रश्न उपस्थित केला. त्याचीच री ओढत राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडूनही विधानसभेसाठी कसब्यावर दावा करण्यात आला आहे.

धंगेकरांच्या अडचणीत वाढ

धंगेकरांच्या उमेदवारीला पक्षांतर्गत विरोध पहायला मिळत आहे. कॉँग्रेसचे माजी उपमहापौर आबा बागूल यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करत कॉँग्रेस भवनमध्ये मूक निदर्शने केली. ते या बैठकीला उपस्थित नव्हते. एकीकडे पक्षांतर्गत विरोध आणि आता महाविकास आघाडीतील घटक पक्षांची नाराजी यामुळे धंगेकरांचे टेन्शन वाढले आहे.

महत्वाच्या बातम्या-

-दादांचा बारामतीचा मार्ग मोकळा? ‘वर्षा’वर झालेल्या बैठकीत शिवतारे-अजितदादांचं मनोमिलन! शिवतारेंची माघार?

-Lok Sabha Election | “शिवसंस्कार हाच आमचा पिंड” म्हणत अमोल कोल्हे आढळराव पाटलांच्या पाया पडले

-अखेर अदिती राव आणि सिद्धार्थ अडकले विवाह बंधनात! तेलंगणामधील मंदिरात गुपचूप उरकला लग्नसोहळा

-वस्ताद काकांना धोबीपछाड देण्यासाठी अजितदादांची पैलवान बैठक, म्हणाले, “मी काही फक्त बारामती बारामती…”

-वसंत मोरे मराठा समाजाचे उमेदवार म्हणून राजकीय वर्तुळात चर्चा; मोरे बैठकीतून तडकाफडकी निघाले

Tags: Aba BagulbjpCongressLok Sabha ElectionsMahavikas AghadiMuralidhar MoholpuneRavindra DhangekarThackeray Groupआबा बागूलकाँग्रेसठाकरे गटपुणेभाजपमहाविकास आघाडीमुरलीधर मोहोळरविंद्र धंगेकरलोकसभा निवडणूक
Previous Post

दादांचा बारामतीचा मार्ग मोकळा? ‘वर्षा’वर झालेल्या बैठकीत शिवतारे-अजितदादांचं मनोमिलन! शिवतारेंची माघार?

Next Post

ओ ऽऽऽमोठ्ठया ताई… शिवतारेंचे बंड थंड होताच चित्रा वाघांनी सुळेंना डिवचलं

News Desk

Related Posts

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक
Pune

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

by News Desk
August 2, 2025
ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?
Pune

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

by News Desk
August 2, 2025
विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

by News Desk
August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
Next Post
ओ ऽऽऽमोठ्ठया ताई… शिवतारेंचे बंड थंड होताच चित्रा वाघांनी सुळेंना डिवचलं

ओ ऽऽऽमोठ्ठया ताई… शिवतारेंचे बंड थंड होताच चित्रा वाघांनी सुळेंना डिवचलं

Recommended

अजित पवारांच्या लाडकी बहिण योजनेबाबतच ‘ते’ वक्तव्य ठरु शकतं विधानसभेसाठी धोक्याचं!

अजित पवारांच्या लाडकी बहिण योजनेबाबतच ‘ते’ वक्तव्य ठरु शकतं विधानसभेसाठी धोक्याचं!

July 15, 2024
NCP Bannars

शरद पवारांच्या नेत्यांनी पोस्टर लावत घातली साद; चर्चा झाल्यानंतर काही तासांतच पोस्टर अचानक गायब

May 16, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक
Pune

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

August 2, 2025
ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?
Pune

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

August 2, 2025
विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved