Saturday, August 2, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

“पुणेकर माझ्या पाठिशी उभे राहणार, मी किमान ५५ हजारांच्या मताधिक्याने निवडून येईल”, उमेदवारीनंतर मोरेंची प्रतिक्रिया

by News Desk
April 3, 2024
in Pune, पुणे शहर, राजकारण
धंगेकरांना उमेदवारी, वसंत मोरेंचं व्हॉट्स अ‌ॅप स्टेटस चर्चेत; ‘एकदा ठरलं की ठरलं’
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : वसंत मोरे यांनी मनसे पक्षाला राजीनामा देऊन २० दिवस उलटले आहेत. लोकसभा निवडणुकीची उमेदवारी मिळण्यासाठी वसंत मोरे यांनी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्याच्या भेटी घेतल्या. मात्र पुणे लोकसभेची जागा ही महाविकास आघाडीने काँग्रेससाठी सोडली होती. त्यामुळे वसंत मोरे ऐवजी काँग्रेसचे कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी मिळाली. त्यानंतर वसंत मोरे यांंनी अपक्ष निवडणूक लढण्याची चर्चा सुरु झाली.

मराठा आंदोलन समितीच्या बैठकीतही मोरेंची उपस्थिती दिसली होती. त्यावरुनही मराठा आंदोलन समितीकडून लढण्याच्या चर्चा सुरु झाल्या. या दरम्यान मोरेंनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. त्यानंतर वंचितकडून वसंत मोरे यांची पुणे लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यावर आता वसंत मोरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

You might also like

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

वसंत मोरेंची प्रतिक्रिया

“मला उमेदवारी मिळावी याकरिता महाविकास आघाडीच्या नेत्यांना भेटलो. पण मला काही कारणास्तव उमेदवारी मिळाली नाही. मात्र आज वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर यांनी उमेदवारी देऊन मला काम करण्याची संधी दिली. याबद्दल मी त्यांचा आभारी असून प्रकाश आंबेडकर यांना समाजातील प्रत्येक घटक मानणारा आहे. त्यामुळे या निवडणुकीत मला अधिकाधिक फायदा होईल आणि मी किमान ५५ हजारांच्या मताधिक्याने निवडून येईल .”

“मागील २५ वर्षापासून राज ठाकरे यांच्यासोबत काम करत राहिलो. त्या कालावधीत पुणे महापालिकेमध्ये ३ वेळा नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि त्या संधीचं मी सोनं केलं. या १५ वर्षाच्या नगरसेवक पदाच्या काळात सत्तेमध्ये नसताना देखील कात्रज प्रभागाचा सर्वांगीण विकास केला आहे. कात्रज प्रभाग हा शहरासमोर रोल मॉडेल ठरलं आहे. माझ्याकडून प्रभागात सर्व विकास काम सुरू होती”, असंही वसंत मोरे म्हणाले आहेत.

“मुरलीधर मोहोळ आणि रविंद्र धंगेकर या दोघांसोबत मी पुणे महापालिकेमध्ये एकत्रित काम केले आहे. ते दोघे पण माझे चांगले मित्र आहेत. तसेच मी या निवडणुकीत वैयक्तिक टीका करणार नाही. तर त्यांच्या पक्षाच्या ध्येयधोरण आणि चुकीच्या कारभाराविरोधात सातत्याने भूमिका मांडत राहणार, त्याचबरोबर आजवरचं माझं काम पाहून पुणेकर नागरिक माझ्या पाठीशी उभे राहून मला विजयी करतील”, असा विश्वासही यावेळी वसंत मोरे यांनी व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-शिरुरमध्ये महायुती, महाविकास आघाडीविरोधात वंचितचा उमेदवार; आढळराव पाटील, कोल्हे आणि बांदल यांच्यात तिहेरी लढत

-Baramati Lok Sabha | राज्यात विरोध मात्र बारामतीत पाठिंबा; वंचितच्या भूमिकेवर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया

-‘विकासकामे करणे म्हणजे एक्टिंग करण्यासारखं नाही’; आढळराव पाटलांचा कोल्हेंवर निशाणा

-Pune Lok Sabha Election | पुण्यात वसंत मोरे तर बारामतीत सुप्रिया सुळेंना राहिल पाठिंबा

-Big Breaking: अखेर तात्यांना ‘वंचित’कडून पुणे लोकसभेची उमेदवारी; मोहोळ, धंगेकरांपुढे मोठं आव्हान?

Tags: bjpCongressMuralidhar MoholPrakash AmbedkarPune Lok Sabha ElectionRavindra DhangekarVanchit Bahujan AghadiVasant Moreकाँग्रेसपुणे लोकसभा निवडणूकप्रकाश आंबेडकरभाजपमुरलीधर मोहोळरवींद्र धंगेकरवंचित बहुजन आघाडीवसंत मोरे
Previous Post

शिरुरमध्ये महायुती, महाविकास आघाडीविरोधात वंचितचा उमेदवार; आढळराव पाटील, कोल्हे आणि बांदल यांच्यात तिहेरी लढत

Next Post

Health Update | तुम्हालाही जास्त घामाचा त्रास असेल तर पिण्याच्या पाण्यात मिसळा चिमूटभर मीठ

News Desk

Related Posts

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक
Pune

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

by News Desk
August 2, 2025
ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?
Pune

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

by News Desk
August 2, 2025
विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

by News Desk
August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
Next Post
Health Update | तुम्हालाही जास्त घामाचा त्रास असेल तर पिण्याच्या पाण्यात मिसळा चिमूटभर मीठ

Health Update | तुम्हालाही जास्त घामाचा त्रास असेल तर पिण्याच्या पाण्यात मिसळा चिमूटभर मीठ

Recommended

‘विरोध असताना उमेदवारीसाठी मी राष्ट्रवादीत जाणार नाही’; आढळराव पाटलांची स्पष्टोक्ती

“२० वर्ष धनुष्यबाणाशी प्रामाणिक आहे आणि राष्ट्रवादीत प्रवेश करेपर्यंत प्रामाणिक राहिलो”- आढळराव पाटील

March 26, 2024
मोहोळांनी गुलाल उधळला मात्र भाजपचे दोन आमदार ‘डेंजर झोन’मध्ये, गणित नेमकं कुठं फसलं?

मोहोळांनी गुलाल उधळला मात्र भाजपचे दोन आमदार ‘डेंजर झोन’मध्ये, गणित नेमकं कुठं फसलं?

June 5, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक
Pune

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

August 2, 2025
ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?
Pune

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

August 2, 2025
विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved