Saturday, August 2, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

आता मनसेची ताकद मोहोळांच्या पाठीशी! मनसैनिक करणार पुण्यात प्रचार, ठाकरेंच्या भेटीत नेमकं काय ठरलं?

by News Desk
April 17, 2024
in Pune, पुणे शहर, राजकारण
आता मनसेची ताकद मोहोळांच्या पाठीशी! मनसैनिक करणार पुण्यात प्रचार, ठाकरेंच्या भेटीत नेमकं काय ठरलं?
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीला पाठिंबा देत असल्याची घोषणा गुढीपाडवा मेळाव्यात केली होती. देशामध्ये नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान बनवण्यासाठी आपण पाठिंबा देत असल्याचं त्यांनी जाहीर केलं होतं. या घोषणेनंतर महाराष्ट्रभरामध्ये महायुतीचे उमेदवार आणि मनसैनिकांची मने जुळवण्यासाठी बैठकांचे आयोजन केले जात आहे. आज पुण्यामध्ये भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी मनसे नेते अमित ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी शहरातील संघटन मोहोळ यांच्या पाठीशी उभे करणार असल्याचा विश्वास त्यांनी त्यांनी व्यक्त केला आहे.

मनसे नेते अमित ठाकरे पुणे दौऱ्यावर असताना पुणे शहर कार्यालयात महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आभार मानले. याप्रसंगी मोहोळ यांना शुभेच्छा देत अमित ठाकरे यांनीही मनसेची संपूर्ण पुणे शहर संघटना आपल्या प्रचारात सक्रिय असेल, असा विश्वास व्यक्त केला.

You might also like

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

भेटीनंतर माध्यमांशी बोलताना मोहोळ म्हणाले, ‘मनसेचे नेते अमितजी ठाकरे आज पुणे दौऱ्यावर असताना मी त्यांची सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी त्यांनी मनसेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते महायुतीचे मताधिक्य वाढवण्यास मोठा हातभार लावतील, असा शब्द दिला. त्यांच्याशी प्रचाराच्या रणनीतीबाबतही चर्चा झाली. त्यामुळे आमचा आत्मविश्वास अधिक वाढला आहे. मनसेच्या पाठिंब्यामुळे विजय आणखी सोपा झाला आहे. राज ठाकरेंना मानणारा एक मोठा वर्ग आणि मनसेची स्वतंत्र ताकद संपूर्ण पुणे शहरात आहे’.

दरम्यान, मनसे सरचिटणीस वागसकर म्हणाले, ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे यांनी नुकताच महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार आमचे नेते अमितजी ठाकरे सर्वच शहरांत जाऊन पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत आहेत. त्यांनी आज पुण्यातही आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांशी, सर्व संघटकांशी चर्चा केली. त्यांनी आम्हा सर्वांना सोबत घेऊन, सन्मानाने वागणूक देऊन महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा प्रचार करण्यास सांगितले आहे.

या वेळी मनसेचे नेते बाबू वागसकर, सरचिटणीस रणजीत शिरोळे, सरचिटणीस बाळा शेडगे, सरचिटणीस अजय शिंदे, शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्यासह भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, शहराध्यक्ष धीरज घाटे, कसबा निवडणूक प्रमुख हेमंत रासने आदी पदाधिकारी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या-

-‘दादांच्या राष्ट्रवादीतील पदाधिकारी, कार्यकर्ते आजही माझ्या संपर्कात मला भेटतात’; संजोग वाघेरेंच्या गौप्यस्फोटाने खळबळ

-‘त्यांना पंतप्रधान व्हायचंय, ते सोशल मीडियाच्या आहारी गेलेत’; अमित ठाकरेंचा वसंत मोरेंना टोमणा

-Shirur Lok Sabha | ‘हे तर दुसरे संजय राऊत’; आढळराव पाटलांचा अमोल कोल्हेंवर निशाणा

-“गेल्या १० वर्षात खासदार निधीतून बारामतीतील एकही काम झालं नाही”; सुप्रिया सुळे अजितदादांच्या निशाण्यावर

-‘तोपर्यंत तरी महायुती टिकून रहावी, ही प्रार्थना’; अजित पवार समर्थक आमदाराच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

Tags: Amit ThackerayLok Sabha ElectionMNSMurlidhar Moholpuneअमित ठाकरेपुणेमनसेमुरलीधर मोहोळलोकसभा निवडणूक
Previous Post

‘दादांच्या राष्ट्रवादीतील पदाधिकारी, कार्यकर्ते आजही माझ्या संपर्कात मला भेटतात’; संजोग वाघेरेंच्या गौप्यस्फोटाने खळबळ

Next Post

“४० वर्षानंतरही परकं मानलं जातं, तळपायाची आग मस्तकात जाणार नाही का?” अजित पवारांचा तिखट सवाल

News Desk

Related Posts

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक
Pune

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

by News Desk
August 2, 2025
ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?
Pune

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

by News Desk
August 2, 2025
विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

by News Desk
August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
Next Post
“४० वर्षानंतरही परकं मानलं जातं, तळपायाची आग मस्तकात जाणार नाही का?” अजित पवारांचा तिखट सवाल

"४० वर्षानंतरही परकं मानलं जातं, तळपायाची आग मस्तकात जाणार नाही का?" अजित पवारांचा तिखट सवाल

Recommended

पुण्यात महायुतीची महत्वाची आढावा बैठक; खोत, जानकरांना निमंत्रण नाही

पुण्यात महायुतीची महत्वाची आढावा बैठक; खोत, जानकरांना निमंत्रण नाही

March 4, 2024
Pune news

हळदीचा व्हायरल ट्रेंड: भूत-प्रेतांना घरी बोलावताय? ज्योतिष तज्ज्ञांनी नेमकं काय सांगितलं

June 25, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक
Pune

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

August 2, 2025
ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?
Pune

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

August 2, 2025
विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved