Saturday, August 2, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

”ज्यांना आपण केलेली ५ कामेही सांगता येत नाहीत, त्यांची ‘कोल्हे कुई‘ आता…”; आढळराव पाटील- कोल्हेंच्या वादात दरेकरांची उडी

by News Desk
May 3, 2024
in Pune, पुणे शहर, राजकारण
”ज्यांना आपण केलेली ५ कामेही सांगता येत नाहीत, त्यांची ‘कोल्हे कुई‘ आता…”; आढळराव पाटील- कोल्हेंच्या वादात दरेकरांची उडी
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : राज्यातील सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या मतदारसंघांपैकी शिरुर मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्यात मुख्य लढत होतत आहे. अमोल कोल्हेंना आढळराव पाटलांनी खुलं आव्हान दिलंं होतं. त्यातच आता आढळराव पाटील आणि अमोल कोल्हेंच्या लढाईत आता भाजपचे नेते आमदार प्रवीण दरेकर यांनी उडी घेतली आहे. आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत प्रवीण दरेकर यांनी अमोल कोल्हेंवर टीकेची झोड उठवली आहे.

”ज्यांना आपण केलेली ५ कामेही सांगता येत नाहीत, त्यांची ‘ कोल्हे कुई‘ आपल्याला आता थांबवायची आहे” अशी टीका प्रवीण दरेकर यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर केली आहे. “खासदार हा जनतेसाठी हवा अन् जनतेला विकास हवा असतो. त्यामुळे जनतेला महायुती शिवाय पर्याय नाही. म्हणून नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी आपल्याला आपल्या भागातून त्यांच्या विचारांचा खासदार पाठवा, असे आवाहन प्रविण दरेकरांनी मतदारांना केले आहे.

You might also like

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

“प्रचाराच्या माध्यमातून येथील विरोधक फक्त डायलॉग बाजी करतात, जुनी उणीदुणी काढायचा प्रयत्न करतात. ते फक्त ‘ कोल्हे कुई ‘ करू शकतात. त्यांनी केलेली 5 कामे सुद्धा त्यांना सांगता येणार नाहीत. ही ‘कोल्हे कुई’ आपल्याला आता थांबवायची आहे. खासदार हा जनतेसाठी हवा अन् जनतेला विकास हवा असतो. त्यामुळे जनतेला महायुती शिवाय पर्याय नाही” असंही प्रवीण दरेकर म्हणाले आहेत.

आज केंद्रात नरेंद्र मोदी आणि राज्यात एकनाथ शिंदे हे भरभरून निधी देणारे नेतृत्व आहे. माढाचे खासदार रणजीत निंबाळकर यांनी तर केंद्रातून रेकॉर्ड ब्रेक निधी आणला आहे . आपल्या भागामध्ये विविध विकास कामे केली आहेत. हे तेव्हाच शक्य होतं, जेव्हा केंद्रामध्ये आपलं नेतृत्व असेल व राज्यामध्ये आपल्या नेतृत्वाचे सरकार असेल. त्यामुळे विरोधी विचारांच्या नेत्याला खासदार म्हणून निवडून देण्यात काय अर्थ आहे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, डॉ. अमोल कोल्हे यांचा हा शेवटचा प्रयोग आहे. नाटकात जसा शेवटचा अंक असतो. पुन्हा त्यांचं नाटक आपल्याकडे आता चालणार नाही. यासाठी प्रेक्षकांनी म्हणजेच जनतेने त्यांच्यावर बहिष्कार टाकायला हवा. त्यांनी ५ वर्ष राजकीय नाटक केले आणि आपला विकास थांबवला. यामुळे आता त्यांना त्यांच्या अभिनय क्षेत्रात परत पाठवण्याची वेळ आली आहे, असा सणसणीत टोलाही यावेळी प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-Baramati | “सासऱ्याचे दिवस राहत नाहीत, कधीतरी सुनेचे दिवस येतील”; अजितदादांचा काकांना टोला

-…म्हणून सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाने बजावली नोटीस

-अनर्थ टळला: सुषमा अंधारेंना घेण्यासाठी आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश; अंधारे आणि पायलट दोघंही सुखरुप

-“पुण्याचा इतिहास आणि वारसा जपण्यासाठी मोहोळांनी केलेले काम कौतुकास्पद” – रामदास आठवले

-कोव्हिशील्ड लसीमुळे मृत्यू अटळ? ऐका ‘या’ प्रसिद्ध डॉक्टरांचं म्हणणं…

Tags: Amol KolhebjpLoksabha ElectionncpPravin DarekarShirurShivajirao Adhalrao Patilअमोल कोल्हेप्रवीण दरेकरभाजपराष्ट्रवादीलोकसभा निवडणूकशिरूरशिवाजीराव आढाळराव पाटील
Previous Post

Baramati | “सासऱ्याचे दिवस राहत नाहीत, कधीतरी सुनेचे दिवस येतील”; अजितदादांचा काकांना टोला

Next Post

“कामं करायला पण हिंमत लागते धमक लागते, प्रशासनावर पकड पाहिजे”- अजित पवार

News Desk

Related Posts

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक
Pune

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

by News Desk
August 2, 2025
ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?
Pune

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

by News Desk
August 2, 2025
विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

by News Desk
August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
Next Post
“भोर वेल्ह्याचं ताट येऊ द्या हा वाढपी त्यात जास्तच टाकणार, अन् नाही टाकलं तर…” -अजित पवार

"कामं करायला पण हिंमत लागते धमक लागते, प्रशासनावर पकड पाहिजे"- अजित पवार

Recommended

‘अजित पवारांचा उर्मटपणा गेला नाही’ म्हणणारे शिवतारे आता म्हणतायत, ‘आम्ही सुनेत्रा वहिनींना बहुमताने निवडून आणू’

‘अजित पवारांचा उर्मटपणा गेला नाही’ म्हणणारे शिवतारे आता म्हणतायत, ‘आम्ही सुनेत्रा वहिनींना बहुमताने निवडून आणू’

March 30, 2024
Maval

मावळात शेळकेंची डोकेदुखी वाढली; बापू भेगडे अपक्ष निवडणूक लढणार, बाळा भेगडेंचा पाठिंबा कोणाला?

October 24, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक
Pune

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

August 2, 2025
ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?
Pune

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

August 2, 2025
विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved