Monday, June 16, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

‘मोदी सरकारनेच देशाला पुनर्वैभव प्राप्त करून दिलं! नवे शैक्षणिक धोरण क्रांती घडवेल’ – सीतारामन

by News Desk
May 4, 2024
in Pune, पुणे शहर, राजकारण
‘मोदी सरकारनेच देशाला पुनर्वैभव प्राप्त करून दिलं! नवे शैक्षणिक धोरण क्रांती घडवेल’ – सीतारामन
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुणे जिल्ह्यातील डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठातर्फे पंतप्रधानांच्या विकसित भारत संकल्पनेमधील शिक्षण आणि शिक्षकांचे योगदान या विषयावरील व्याख्यानात त्या बोलत होत्या. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. प्रमोद पांडे आणि प्रा. कुलगुरू प्रसाद जोशी उपस्थित होते. ‘१९९१ साली आर्थिक सुधारणा घडवून देशाची अर्थव्यवस्था खुली केल्याचा दावा करणाऱ्या सरकारनेही आपल्याला पुनर्वैभवाच्या दिशेने नेण्यासाठी, आत्मविश्वास जागविण्यासाठी प्रयत्नच केले नाहीत. आपल्या पूर्वापार क्षमता, वैभवशाली वारसा, पराक्रमावर विश्वास ठेवून आपण पुन्हा महासत्ता बनू शकतो, हा विश्वासच त्यांना निर्माण करता आला नाही’, अशी टीका केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे.

‘भारतावरील आक्रमणांपूर्वी भारत केवळ शिक्षणातच नव्हे तर व्यापार, उद्योग आणि व्यवसायांमध्येही जागतिक आघाडीवर होता. परंतु, आक्रमणांनंतर आपण त्यात मागे पडलो. स्वातंत्र्यानंतर सत्तेवर आलेल्या सरकारनेही भारताला पुनर्वैभव प्राप्त व्हावे, यासाठी विशेष प्रयत्न केले नाहीत. मात्र, मोदी सरकारने २०१४ पासून उच्च शिक्षणावर विशेष भर दिला. त्यामुळे भारतात उच्चशिक्षणासाठी अनेक दर्जेदार पर्याय निर्माण होऊन शिक्षणासाठी परदेशात जाण्याचे प्रमाण घटले’, असे मत सीतारामन यांनी शनिवारी व्यक्त केले आहे.

You might also like

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला

अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर २०१४ पासून आतापर्यंत १९४७ ते २०१४ पर्यंत निर्माण झालेल्या संस्थांइतक्याच उच्चशिक्षण संस्था निर्माण झाल्या. यात आयआयटी, आयआयएम, एम्स आदी संस्थांचाही समावेश आहे. खासगी संस्थांनाही मोदी सरकारने प्रोत्साहन दिले. त्यांना त्यांचा अभ्यासक्रम निश्चित करण्याची मुभा दिली. परदेशी विद्यापीठांनाही भारतात येण्याची अनुमती देत गिफ्टसिटीमध्ये कोणत्याही सरकारी नियंत्रणाशिवाय अभ्यासक्रम सुरू करण्याची परवागी दिली. त्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांना भारतातच उच्च शिक्षणाचे अनेक पर्याय निर्माण झाले. परिणामी, भारतातून शिक्षणासाठी परदेशात जाण्याचे आणि तिथेच स्थायिक होण्याचे प्रमाण घटले, असे सीतारामन म्हणाल्या आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणलेले नवे शैक्षणिक धोरण भारतात नवी क्रांती घडवेल, असे सांगून निर्मला सीतारामन म्हणाल्या. नव्या धोरणामुळे शिक्षणात लवचिकता येईल. विद्यार्थ्यांना क्रेडिट बँक उपलब्ध होईल. त्यानुसार आपल्या शिक्षणामध्येच ते अन्य आवडीच्या विषयाचा अंतर्भाव करू शकतील. तंत्रशिक्षणासह सर्व प्रकारचे उच्चशिक्षण मातृभाषेतून उपलब्ध होईल. त्यामुळे इंग्रजीच्या दडपणामुळे उच्च अथवा तंत्रशिक्षणापासून दूर राहिलेल्यांनी दर्जेदार उच्चशिक्षण उपलब्ध होईल.

महत्वाच्या बातम्या-

-बारामतीत अजितदादांचं भाषण अन् मधेच बच्चू कडूंचा फोन; मग अजितदादा काय म्हणाले?

-मोदी-गांधींच्या सभेनंतर पुण्यात ओवैसींची तोफ धडाडणार! राजकीय वातावरण ढवळून निघणार

-“तुमच्यात जर धाडस असेल तर किरीट सोमय्यांना…”; रोहित पवारांचं अजितदादांना आव्हान

-“कार्यकर्त्यांनी निवडणूक हातात घेतलीय, आढळराव पाटील नक्की विजयी होतील” -आमदार तुपे

-‘मी कामाचा माणूस आहे, लवकरच बारामतीचं चित्र बदलून टाकेल’; अजित पवारांचा बारामतीकरांना शब्द

Tags: bjpIndiaNirmala SitharamanPrime Minister Narendra Modiनिर्मला सितारामनपंतप्रधान नरेंद्र मोदीभाजपभारत
Previous Post

बारामतीत अजितदादांचं भाषण अन् मधेच बच्चू कडूंचा फोन; मग अजितदादा काय म्हणाले?

Next Post

प्रियांकाचा पती निक जोनस गंभीर आजाराच्या विळख्यात; व्हिडिओ शेअर करत दिली माहिती..

News Desk

Related Posts

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला
Pune

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला

by News Desk
June 14, 2025
अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?
Pune

अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?

by News Desk
June 14, 2025
पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?
Pune

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

by News Desk
June 14, 2025
Ajit Pawar
Pune

अजितदादा भाषणाला उठताच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घातला राडा; पोलिसांनी घेतलं ताब्यात

by News Desk
June 14, 2025
‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
Pune

‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

by News Desk
June 13, 2025
Next Post
प्रियांकाचा पती निक जोनस गंभीर आजाराच्या विळख्यात; व्हिडिओ शेअर करत दिली माहिती..

प्रियांकाचा पती निक जोनस गंभीर आजाराच्या विळख्यात; व्हिडिओ शेअर करत दिली माहिती..

Recommended

मोशीनंतर आता पुणे-सोलापूर महामार्गावरही होर्डिंग कोसळले; एक घोडा जखमी

मोशीनंतर आता पुणे-सोलापूर महामार्गावरही होर्डिंग कोसळले; एक घोडा जखमी

May 18, 2024
Swargate

स्वारगेट डेपो प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर; महिला प्रवासी स्टँडमध्ये असताना मध्यरात्री अचानक…

March 12, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला
Pune

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला

June 14, 2025
अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?
Pune

अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?

June 14, 2025
पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?
Pune

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

June 14, 2025
Ajit Pawar
Pune

अजितदादा भाषणाला उठताच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घातला राडा; पोलिसांनी घेतलं ताब्यात

June 14, 2025
‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
Pune

‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

June 13, 2025
मुलाचा पदवीदान सोहळा आणि लेकीला सरप्राईज द्यायला निघाले होते, पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं
Pune

मुलाचा पदवीदान सोहळा आणि लेकीला सरप्राईज द्यायला निघाले होते, पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं

June 13, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved