Saturday, August 2, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

धक्कादायक! पुण्यात तब्बल ४९ शाळा अनधिकृत; शिक्षण विभागाकडून कारवाई सुरु

by News Desk
July 12, 2024
in Pune, पिंपरी चिंचवड, पुणे शहर
धक्कादायक! पुण्यात तब्बल ४९ शाळा अनधिकृत; शिक्षण विभागाकडून कारवाई सुरु
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अनधिकृत शाळांचा प्रश्न आता आणखी गंभीर होत चालला आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक, माध्यमिक शिक्षण विभागाने पुणे, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील मिळून ४९ शाळा अनधिकृत असल्याचे जाहीर केले आहे. अनधिकृत शाळांवर शिक्षण विभागाकडून कारवाई सुरू करण्यात आली त्यामध्ये या जिल्ह्याच्या ग्रामीम भागातील ४९ शाळा अनधिकृत असल्याचे समोर आले आहे.

जिल्ह्यातील अनधिकृत शाळांचा शोध घेण्यासाठी पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे प्रशासकीय अधिकारी, जिल्ह्यातील सर्व गट शिक्षणाधिकाऱ्यांनी संयुक्त मोहीम राबविली होती. या मोहिमेमध्ये अनधिकृत आढळून आलेल्या शाळांची यादी जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय नाईकडे, माध्यमिक शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर यांनी जाहीर केली आहे.

You might also like

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

आरटीई कायद्यातील कलम १० नुसार शासन किंवा स्थानिक प्राधिकरणाच्या मान्यता, ना-हरकत प्रमाणपत्राशिवाय शाळा सुरू करता येत नाही. शासन, स्थानिक प्राधिकरणाच्या मान्यतेशिवाय शाळा चालवण्यात येत असल्यास किंवा शाळेची मान्यता काढून घेतल्यानंतरही शाळा चालवण्यात येत असल्यास संबंधितांना १ लाख रुपयांपर्यंत दंड, त्यानंतरही शाळा अनधिकृतरित्या सुरू राहिल्यास दररोज १० हजार रुपये दंड आकारण्याची तरतूद आहे.

पुणे, पिंपरी चिंचवडमधील अनधिकृत शाळांची यादी-

किड्जी स्कूल दौंड, जिजाऊ एज्युकेशन सोसायटीचे अभंग शिशू विकास कासुर्डी, ऑर्किड इंटरनॅशनल स्कूल उंड्री, नारायण ई टेक्नो स्कूल वाघोली, द गोल्डन इरा इंग्लिश मीडियम स्कूल हवेली, फ्लोरिंग फ्लोरा इंग्लिश मीडियम स्कूल मांजरी बु., इ. एम. एच. इंग्लिश मीडियम स्कूल फुरसुंगी, व्हीटीईएल इंग्लिश मीडियम स्कूल भेकराईनगर, द टायगर इज इंटरनॅशनल स्कूल कदमवाकवस्ती, रामदास सिटी स्कूल रामदरा, मारीगोल्ड इंटरनॅशनल स्कूल कदमवाकवस्ती, श्रीमती सुलोचनाबाई झेंडे बालविकास मंदिर व प्राथमिक विद्यालय कुंजीरवाडी, शिवसमर्थ इंग्लिश मीडियम स्कूल जांभुळवाडी,

भैरवनाथ इंग्लिश मीडियम स्कूल मोई, जिजस क्राइस्ट इंग्लिश मीडियम स्कूल कामशेत, श्रेयान इंटरनॅशनल स्कूल गहुंजे, व्यंकेश्वरा वर्ल्ड स्कूल नायगाव, किंग्ज वे पब्लिक स्कूल रायवूड लोणावळा, रुडिमेन्ट इंटरनॅशनल स्कूल माण, एंजल इंग्लिश मीडियम स्कूल नेरे, चाणक्य कनिष्ठ महाविद्यालय पिरंगुट, महिंद्रा युनायटेड इंटरनॅशनल स्कूल खुबवली, अंकुर इंग्लिश मीडियम स्कूल मुळशी, पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल पिरंगुट, ईलाइट इंटरनॅशनल स्कूल मुळशी, संस्कार प्रायमरी स्कूल इंग्लिश मीडियम मुळशी,

श्री विद्या भवन इंग्लिश मीडियम स्कूल घोटावडे फाटा, पोदार इंटरनॅशनल स्कूल ताथवडे, एलप्रो इंटरनॅशनल स्कूल हिंजवडी, माऊंट कासल इंग्लिश मीडियम स्कूल नेरे, सरस्वती विद्या मंदिर पिरंगुट, श्रीनाथ इंग्लिश मीडियम स्कूल वीर,

तकवा इस्लामिक स्कूल अँड मक्तब कोंढवा, लेगसी हायस्कूल कोंढवा, इमॅन्युअल पब्लिक स्कूल हडपसर, पिपल ट्री एज्युकेशन ट्रस्ट पिंपळे निलख, श्री चैतन्य इंग्लिश मीडियम स्कूल पिंपळे निलख, आयडियल इंग्लिश स्कूल पिंपळे गुरव, सपलिंग्स इंग्लिश मीडियम स्कूल चिंचवडेनगर, लिटिल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल चिंचवडेनगर, नवजित विद्यालय वाल्हेकरवाडी, किड्सजी स्कूल पिंपळे सौदागर, एम. एस. स्कूल फॉर किड्स सांगवी, क्रिस्टल मॉर्डन स्कूल चऱ्होली, माऊंट एव्हरेस्ट इंग्लिश स्कूल कासारवाडी, ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूल चिंचवड.

महत्वाच्या बातम्या-

-केंद्रीय मंत्री मोहोळ यांच्याकडून विमानतळावरील नव्या टर्मिनल व्यवस्थेची पाहणी; रविवारी पुणेकरांच्या सेवेसाठी सज्ज

-वादाच्या घेऱ्यात असलेल्या पूजा खेकरचे बारामती कनेक्शन उघड; अडचणीत होणार वाढ

-पर्वती काँग्रेसलाच हवा! कार्यकर्ते म्हणतात, ‘उमेदवारी कोणालाही द्या, आमदार करणारच’

-हातात पिस्तूल अन् शेतकऱ्यांवर दादागिरी; पूजा खेडकरांच्या आईचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

-लग्नाळू शेतकरी मुलांना लाखोंचा गंडा घालणारी टोळी जेरबंद; ८ महिन्यात ९ मुलांसोबत लग्न केलं अन् पळून निघाली होती पण..

Tags: chinchwadpimparipuneschool
Previous Post

केंद्रीय मंत्री मोहोळ यांच्याकडून विमानतळावरील नव्या टर्मिनल व्यवस्थेची पाहणी; रविवारी पुणेकरांच्या सेवेसाठी सज्ज

Next Post

मोठी बातमी! अक्षय कुमार कोरोना पॉझिटिव्ह; ‘सरफिरा’ सिनेमाच्या अनेक सदसस्यांनाही कोरोनाची लागण

News Desk

Related Posts

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक
Pune

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

by News Desk
August 2, 2025
ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?
Pune

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

by News Desk
August 2, 2025
विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

by News Desk
August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
Next Post
मोठी बातमी! अक्षय कुमार कोरोना पॉझिटिव्ह; ‘सरफिरा’ सिनेमाच्या अनेक सदसस्यांनाही कोरोनाची लागण

मोठी बातमी! अक्षय कुमार कोरोना पॉझिटिव्ह; 'सरफिरा' सिनेमाच्या अनेक सदसस्यांनाही कोरोनाची लागण

Recommended

Sharad Pawar And Ajit Pawar

लोकसभा, विधानसभा झाली तरीही पवार विरुद्ध पवार सामना सुरुच; बारामतीत नेमकं काय घडतंय?

December 11, 2024
Ajit Pawar

अजितदादांच्या आमदाराच्या भावाचा प्रताप; पोलिसांनी आवळल्या मुसक्या, नेमकं काय प्रकरण?

July 24, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक
Pune

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

August 2, 2025
ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?
Pune

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

August 2, 2025
विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved