Friday, August 1, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

पिंपरी-चिंचवड बालेकिल्ला पुन्हा ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात चढाओढ

by News Desk
February 27, 2024
in Pune, पिंपरी चिंचवड, पुणे शहर, राजकारण
पिंपरी-चिंचवड बालेकिल्ला पुन्हा ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात चढाओढ
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर राज्यातील अनेक लोकसभा मतदारसंघावर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटांमध्ये चुरस सुरु आहे. बारामतीनंतर पिंपरी-चिंचवड हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. याच पिंपरी-चिंचवडचा बालेकिल्ला पुन्हा ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट जोरदार तयारीला लागले आहेत. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी पिंपरी चिंचवड शहरावर लक्ष केंद्रित केल्याचे दिसत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि आमदार रोहित पवार यांच्यात कलगितुरा रंगला आहे. तटकरेंनी घरातच सर्व महत्त्वाची पदे दिल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला. तर, रोहित यांना नैराश्य आल्याचा आरोप करत तथाकथित ‘युवा नेतृत्व’ म्हणत तटकरेंनी रोहित पवारांची खिल्ली उडविली आहे.

You might also like

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

अनेक वर्षांपासून पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांचीच सत्ता होती. मात्र २०१७ नंतर दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे आणि माजी महापौर आझम पानसरे यांनी राष्ट्रवादीला रामराम करत भाजपची वाट धरली आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला उद्धवस्त केला.

अजित पवार शिवसेना-भाजपच्या सरकारमध्ये सत्तेत सहभागी झाल्यानंतर आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे आणि शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह कार्यकारिणीने अजित पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. आणि भाजपमधून पुन्हा राष्ट्रवादीत आलेले आझम पानसरे यांनी शरद पवार यांना साथ देण्याची भूमिका घेतली.

शरद पवार गटामध्ये पिंपरी-चिंचवड शहरातून कोणी बडा नेता किंवा पदाधिकारी नसल्याने शहरात आजही अजित पवारांचीच ताकद जास्त आहे. अजित पवार यांच्यामुळेच शहराचा सर्वांगीण विकास झाल्याचा दावा केला जातो. महापालिकेत पुन्हा राष्ट्रवादीची सत्ता आणण्याचे पवार यांचे स्वप्न आहे. त्याकरिता त्यांनी पुन्हा शहरात लक्ष घातले आहे.

प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नुकताच शहराचा दौरा केला. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनेतील पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच शरद पवार यांच्याकडून शहराची जबाबदारी असलेल्या आमदार रोहित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. यावर आता शरद पवार गटाकडून काय उत्तर मिळतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

-‘पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी संधी हवी’; शिवाजी मानकरांनी भाजपकडे मागितली उमेदवारी

-काँग्रेस कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुतळा जाळला; डेक्कन पोलिसांकडून गुन्हा दाखल

-शिरुरच्या जागेवरुन आढळराव पाटलांचा युटर्न; अजितदादांची मजबूत फिल्डींग

-लेकीसाठी बापानं कंबर कसली; अजित पवारांना शह देण्यासाठी बोलवली महत्वाची बैठक

-“मोदी जसे ‘चहा’ची स्टोरी सांगायचे आता तसं अजित पवार ‘अंडी विक्री’ची सांगतात”

Tags: ajit pawarAnna BansodechinchwadLaxman JagtapncpNCP Party Sharad Chandra PawarPimpriRohit Pawarsharad pawarSunil TatkareVilas Landeअजित पवारआण्णा बनसोडेचिंचवडपिंपरीराष्ट्रवादी काँग्रेसराष्ट्रवादी काँग्रेस पक्षरोहित पवारलक्ष्मण जगतापविलास लांडेशरद पवारसुनिल तटकरे
Previous Post

‘पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी संधी हवी’; शिवाजी मानकरांनी भाजपकडे मागितली उमेदवारी

Next Post

“छत्रपती शिवरायांनी औरंगजेबाला तहात २३ किल्ले दिले त्याला इथेच गाडलं, ठाकरे पवारांनी ४०-४० आमदार दिलेत”

News Desk

Related Posts

Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

by News Desk
July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

by News Desk
July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

by News Desk
July 28, 2025
Next Post
“छत्रपती शिवरायांनी औरंगजेबाला तहात २३ किल्ले दिले त्याला इथेच गाडलं, ठाकरे पवारांनी ४०-४० आमदार दिलेत”

"छत्रपती शिवरायांनी औरंगजेबाला तहात २३ किल्ले दिले त्याला इथेच गाडलं, ठाकरे पवारांनी ४०-४० आमदार दिलेत"

Recommended

Bavdhan Fire

बावधनमध्ये खासगी स्टुडिओला भीषण आग; आगीवर नियंत्रण पण स्टुडिओ जळून खाक

December 9, 2024
पुणे हिट अँड रन: आरोपीची आई शिवानी अग्रवालला अटक; बदलेले ब्लड सॅम्पल कोणाचे?

पुणे हिट अँड रन: आरोपीची आई शिवानी अग्रवालला अटक; बदलेले ब्लड सॅम्पल कोणाचे?

June 1, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

July 28, 2025
Pranjal Khewalkar
Pune

रेव्ह पार्टी प्रकरण: कोणी कोणी ड्रग्स घेतलं? ससूनच्या वैद्यकीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर

July 28, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved