Friday, August 1, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

दिल्लीच्या घटनेची पुण्यात पुनरावृत्ती, स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर बलात्कार, अंधाराचा फायदा घेत शिवशाही बसमध्ये…

by News Desk
February 26, 2025
in Pune, पुणे शहर
दिल्लीच्या घटनेची पुण्यात पुनरावृत्ती, स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर बलात्कार, अंधाराचा फायदा घेत शिवशाही बसमध्ये…
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुणे शहरात गुन्हेगारीचे प्रकार दररोज घडताना दिसत आहेत. विद्येचे माहेरघर, सांस्कृतिक वारसा लाभेल्या शहरामध्ये रोज खून, बलात्कार, चोऱ्या, लूट, दहशत, कोयता गँगचा राडा असे प्रकार पहायला मिळत आहेत. अशातच कुख्यात गुंड गजा मारणेच्या टोळीचा धूमाकूळ प्रकरण ताजे असतानाच आता स्वारगेट बसस्थानकावर आणखी एक धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. स्वारगेट बस स्थानकावर शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

दत्तात्रय रामदास गाडे (वय ३५, अंदाजे, रा. शिक्रापूर) असे बलात्कार करणाऱ्या नराधमाचे नाव आहे. फलटण येथे गावी जाणार्‍या महिलेला शिवशाही बसमध्ये जाण्यास सांगून तिच्यावर बसमध्येच बलात्कार करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना स्वारगेट बसस्थानकातील एका शिवशाही बसमध्ये बुधवारी पहाटे साडेपाच वाजता घडली. पोलिसांनी आरोपीचे नाव निष्पन्न केले असून त्याचा शोध घेण्यास पोलिसांची ८ पथके रवाना झाली आहेत. त्याच्याविरुद्ध जबरी चोरीचे दोन गुन्हे दाखल आहेत.

You might also like

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “एका २६ वर्षाची तरुणी आपल्या गावी फलटणला जाण्यासाठी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास स्वारगेट बसस्थानकावर आली. तिला एकाने फलटणला जाणारी गाडी इकडे लागत नाही़ तिकडे लागते, असे सांगितले. त्यावर या तरुणीने इकडेच फलाटावर लागत असल्याचे सांगितले. त्यावर त्याने तिच्याशी गोड बोलून तिला ‘मी १० वर्षे इथे आहे. तिकडे लागणारी बसच फलटणला जाते’, असे सांगून तिला आडबाजूला उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये नेले. बसमध्ये अंधार होता. तेव्हा त्याने दरवाजा उघडून आत जाण्यास सांगितले. तरुणी बसमध्ये गेली. तो तिच्या मागोमाग बसमध्ये गेला. त्याने बसचा दरवाजा लावून घेतला अन् तिच्यावर बलात्कार केला. या घटनेनंतर ही तरुणी फलटणला जाण्यास निघाली. अर्ध्या वाटेवरुन ती परत आली व तिने स्वारगेट पोलीस ठाण्यात घडला सगळा प्रकार सांगितला. या घटनेची माहिती मिळताच स्वारगेट पोलिसांनी तातडीने तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली. त्यामध्ये आरोपी निष्पन्न झाला आहे. त्याच्यावर पुणे ग्रामीण पोलिसांमध्ये जबरी चोरीचे दोन गुन्हे दाखल आहेत. पुणे पोलिसांची ८ पथके आरोपीचा शोध घेत आहेत”, असे पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या-

-अजितदादांच्या राष्ट्रवादी पदाधिकाऱ्याची मुजोरी, जन्मदात्या आईला केली मारहाण, नेमकं प्रकरण काय?

-गुंडगिरीला वैतागले कोथरुडकर; चौकाचौकात बॅनरबाजी, काय आहे बॅनरवर?

-पुण्यातील टोळीचा म्होरक्या, कुख्यात गुंड गजा मारणेनं गुन्हेगारीला सुरवात कशी केली?

-नीलम गोऱ्हेंविरोधात आंदोलन करणाऱ्या महिला शिंदेसेनेत जाणार! नेमकं कारण काय?

-“स्थायी समिती सदस्य होण्यासाठी माझ्याकडे राऊतांनी २५ लाखांची मागणी” शिंदेसेनेचा गंभीर आरोप

Tags: Dattatraya Ramdas GadeRape In Shivshahi BusSwargate ST Bus Stand
Previous Post

अजितदादांच्या राष्ट्रवादी पदाधिकाऱ्याची मुजोरी, जन्मदात्या आईला केली मारहाण, नेमकं प्रकरण काय?

Next Post

पुण्यात महिला खरंच सुरक्षित? पीएमपीलच्या डेपो मॅनेजरचे महिला कंडक्टरसोबत अश्लील कृत्य, तक्रार घेण्यास टाळाटाळ

News Desk

Related Posts

Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

by News Desk
July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

by News Desk
July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

by News Desk
July 28, 2025
Next Post
PMPL

पुण्यात महिला खरंच सुरक्षित? पीएमपीलच्या डेपो मॅनेजरचे महिला कंडक्टरसोबत अश्लील कृत्य, तक्रार घेण्यास टाळाटाळ

Recommended

पुण्याच्या विकासाला मोदी सरकारमुळेच गती, कामांच्या जोरावरच निवडणूक लढवणार: मोहोळ

पुण्याच्या विकासाला मोदी सरकारमुळेच गती, कामांच्या जोरावरच निवडणूक लढवणार: मोहोळ

March 22, 2024
Deepak Mankar

विविध घटकांच्या पाठिंब्याने राष्ट्रवादीला बळ; ऑल इंडिया जमात-ए-सलमानी समाजाचा अजित पवारांना देशभरात पाठिंबा

October 9, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

July 28, 2025
Pranjal Khewalkar
Pune

रेव्ह पार्टी प्रकरण: कोणी कोणी ड्रग्स घेतलं? ससूनच्या वैद्यकीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर

July 28, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved