पुणे : पुणे शहरातील काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा नाराजीचा सूर उमटू लागल्याचे दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून शहराध्यक्ष बदलाच्या मुद्द्यावरून पक्षात गटबाजी तीव्र झाली होती. हा वाद काहीसा निवळत असताना, नव्याने जाहीर झालेल्या राज्य कार्यकारिणीत पुण्यातील आठ प्रमुख नेत्यांना स्थान न मिळाल्याने पुन्हा नाराजीचा सूर उमटत असल्याचे पहायला मिळत आहे. या निर्णयामुळे पक्षातील अंतर्गत तणाव वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. याचा परिणाम आगामी महापालिका निवडणुकीवर होण्याची शक्यता आहे.
पुणे शहरातील माजी प्रदेश सरचिटणीस रोहित टिळक, माजी नगरसेवक वीरेंद्र किराड, अजित आपटे, रफिक शेख, मुख्तार शेख, तसेच पूर्व प्रांतिक प्रतिनिधी रमेश अय्यर, चंदू कदम आणि राजेंद्र शिरसाठ यांना या कार्यकारिणीत स्थान मिळालेले नाही. या नेत्यांना डावलल्याने त्यांच्यात तीव्र नाराजी असल्याचे सांगितले जात आहे. ही नाराजी आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेससाठी डोकेदुखी ठरू शकते. या नेत्यांनी यापुढे कोणती भूमिका घ्यावी, याबाबत पक्षात चर्चा सुरू आहे.
आगामी काळात हे नेते काय पाऊल उचलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पक्ष नेतृत्वाला ही नाराजी दूर करण्याचे मोठे आव्हान आहे, अन्यथा याचा परिणाम पुण्यातील काँग्रेसच्या निवडणूक रणनीतीवर होऊ शकतो. माजी आमदार उल्हास पवार आणि बाळासाहेब शिवरकर यांना कार्यकारी समितीत, तर माजी आमदार मोहन जोशी आणि रमेश बागवे यांना वरिष्ठ उपाध्यक्षपदी नियुक्ती मिळाली आहे. कार्यकारिणीत एक खजिनदार, 16 वरिष्ठ उपाध्यक्ष, 38 उपाध्यक्ष, 5 प्रवक्ते, 108 सरचिटणीस, 95 चिटणीस आणि एक माध्यम समन्वयक यांचा समावेश आहे.
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा पराभव पत्करावा लागल्यानंतर पक्षात मोठ्या प्रमाणात संघटनात्मक बदल होतील, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा होती. मात्र, नव्या कार्यकारिणीत जुनेच चेहरे पाहायला मिळाल्याने अनेक कार्यकर्त्यांमध्ये निराशा पसरली आहे. काँग्रेसने हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली 264 नेत्यांची विस्तृत कार्यकारिणी जाहीर केली आहे. यात 87 सदस्यांची कार्यकारी समिती आणि 36 जणांची राजकीय कामकाज समिती आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हाताळणार आहे. पुण्यातील अॅड. अभय छाजेड यांना खजिनदारपदाची जबाबदारी मिळाली असून, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधून 15 नेत्यांना कार्यकारिणीत स्थान देण्यात आले आहे. यामध्ये माजी मंत्री, माजी आमदार आणि वरिष्ठ नेत्यांचा समावेश आहे.
महत्वाच्या बातम्य
-पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
-पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
-रेव्ह पार्टी प्रकरण: कोणी कोणी ड्रग्स घेतलं? ससूनच्या वैद्यकीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर
-पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा