पुणे : खराडी येथे झालेल्या रेव्ह पार्टी प्रकरणात पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना अटक केली आहे. पुणे पोलिसांच्या या कारवाईनंतर खडसे कुटुंब पुण्यात ठाण मांडून आहे. त्यातच आता रोहिणी खडसे यांनी आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे (SP) अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली आहे.
प्रांजल खेवलकर सध्या पोलिसांच्या ताब्यात असल्याने या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, रोहिणी खडसे यांनी ही भेट फक्त पक्षसंघटनेच्या कामासाठी होती असे स्पष्ट केले. ‘पक्षात काही नियुक्त्या करायच्या आहेत, त्यासाठीच मी शरद पवार यांना भेटले’, असे त्यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
प्रांजल खेवलकर सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. खडसे कुटुंबीयांनी अद्याप त्यांच्या जामिनासाठी अर्ज केलेला नाही. याबाबत विचारले असता रोहिणी खडसे म्हणाल्या, “आम्ही सगळे कुटुंबीय एकत्र मिळून याबाबत चर्चा करु आणि निर्णय घेऊ. त्यानंतर आम्ही जामिनासाठी अर्ज करु, असे रोहिणी खडसे म्हणाल्या आहेत.
सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे मी याबाबत न्यायालयाबाहेर बोलणं चूक आहे. आम्हाला जी काही बाजू मांडायची आहे, ती आम्ही वकिलांमार्फत कोर्टात मांडत आहोत. मलाही जी काही बाजू मांडायची असेल ती योग्य ठिकाणी आणि योग्यवेळी मी मांडेन. या प्रकरणाची चौकशी एनडीपीएस कलमांच्या माध्यमातून होणे अपेक्षित आहे, तसे झाले पाहिजे”, असं रोहिणी खडसे म्हणाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
-पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?
-पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
-पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी