पुणे : पुणे शहरामध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. शहरात एका इंजिनिअर तरुणाने आपल्या गर्भवती प्रेयसीला रबडीतून गर्भपाताच्या गोळ्या देत गर्भपात घडवून आणल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. आज पती-पत्नीच्या वादात पत्नीकडून पतीला त्रिशूळ फेकून मारताना तिच्याच पोटच्या ११ महिन्यांच्या डोक्यात घुसला आणि त्या चिमुरड्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे.
पत्नी आणि तिच्या मित्राकडून होत असलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून एका ३९ वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी मृताच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पत्नी आणि तिच्या मित्राविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे.
आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव अतुल मारुती कदम (वय ३९, नाना पेठ, पुणे) असे असून, आरोपी म्हणून पत्नी सोनाली अतुल कदम (वय ३१, हडपसर) आणि तिचा मित्र कृष्णा शिंदे (रा. हडपसर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मृत अतुलच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, अतुल आणि सोनाली यांचा विवाह २०१५ साली झाला होता. लग्नानंतर काही काळातच दोघांमध्ये घरगुती कारणांवरून वारंवार वाद व्हायला लागले. त्यातच सोनालीचे कृष्णा शिंदे या तरुणाशी अतिपरिचयाचे संबंध असल्याचा संशय अतुलला आला. त्यामुळे दोघांमधील मतभेद अधिक वाढत राहिले. अखेर सोनाली माहेरी राहायला निघून गेली.
सोनाली माहेरी निघून जाण्याआधीपासून आणि विभक्त राहिल्यानंतर तिचा मित्र कृष्णा या दोघांनी मिळून अतुलला सतत फोन करून धमक्या देणे, मानसिक त्रास देणे सुरूच ठेवले. यामुळे अतुलवर मानसिक ताण वाढत गेला. आणि याच तणावाखाली त्याने १५ जून रोजी आपले जीवन संपवले. या प्रकरणी मृताच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पत्नी आणि तिच्या मित्राविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे.
महत्वाच्या बातम्या
-ढोल-ताशा पथकांसाठी आनंदाची बातमी; पुणे पोलिसांनी जाहीर केला ‘हा’ मोठा निर्णय
-धक्कादायक! नवऱ्याला त्रिशूळ मारला पण लागला ११ महिन्यांच्या चिमुकल्याला, पोलिसांना वेगळाच संशय
-हिंजवडी आयटी पार्कच्या पायाभूत सुविधांसाठी सरकारचा ॲक्शन प्लॅन, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत काय ठरलं?
-पुणे महापालिकेतील कर्मचारी अधिकाऱ्यांना लागणार शिस्त; आयुक्तांनी जारी केलं नवं वेळापत्रक