Friday, August 1, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

Pune GBS: ‘त्या’ विहिरीतील पाण्याचा अहवाल आला; नेमकं काय म्हटलंय पालिकेच्या अहवालात?

by News Desk
January 24, 2025
in Pune, आरोग्य, पुणे शहर
Nanded Gaon

Pune GBS: 'त्या' विहिरीतील पाण्याचा अहवाल आला; नेमकं काय म्हटलंय पालिकेच्या अहवालात?

585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुणे शहरात गुइलेन बॅरी सिंड्रेम आजाराने थैमान घातले असून रुग्णसंख्या आता ६७ वर पोहचली आहे. या रुग्णांपैकी १३ रुग्ण व्हेंटिलेटरवर तर २४ रुग्णांवर आयसीयू (अतिदक्षता) मध्ये उपचार सुरु आहेत. महापालिकेमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या खडकवासला, किरकिटवाडी आणि धायरी, नांदोशी या गावांमधील नागरिकांमध्ये ‘जीबीएस’ आजार झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीतून खराब पाण्याचा पुरवठा झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. ज्या विहिरीतून गावांना पाणीपुरवठा केला जातो, त्या विहिरीची पाहणी महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी यांनी केली.

महापालिकेने या गावांतील पाण्याचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविले होते. ‘या पाण्यात  काही मोजक्या तक्रारी वगळता बहुतांश ठिकाणी पाण्यामध्ये क्लोरिनची मात्रा पुरेशी (रेसिड्युअल क्लोरिन टेस्ट) आढळली, असे पर्वती जलकेंद्राच्या रसायनशास्त्रज्ञांच्या अहवालात म्हटले आहे. तसेच ‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’चे संशयित रुग्ण आढळलेल्या सिंहगड रस्त्यावरील किरकिटवाडी, नांदोशी, बारंगणे मळा, धायरी, खडकवासला या गावांना शक्य तितक्या लवकर महापालिकेच्या जलशुद्धीकरणातून शुद्ध केलेले पाणी द्यायला हवे.’

You might also like

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

‘या भागातील विहिरी आणि जलस्रोतांमध्ये कोणतेही दूषित घटक आढळलेले नाहीत. मात्र, खबरदारी म्हणून क्लोरिनची दुप्पट मात्रा वापरण्याचा आदेश दिला आहे,’ असे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले. तसेच या विहीरीला संरक्षक जाळी तातडीने बसवून घेण्याच्या आणि पाण्याची नियमित तपासणी करण्याच्या सूचना डॉ. भोसले यांनी दिल्या आहेत.

पालिका आयुक्त डॉ. भोसले काय म्हणाले?

‘या गावातील विहिरी व जलस्रोतांमध्ये कोणतेही दूषित घटक आढळलेले नाहीत. मात्र, खबरदारी म्हणून क्लोरिनची दुप्पट मात्रा वापरण्याचा आदेश पाणीपुरवठा विभागाला दिला आहे. काही ठिकाणी जलवाहिन्यांशेजारी सांडपाणी साठत असल्याची स्थानिकांची तक्रार आहे. त्यामुळे येथे साचलेले पाणी काढून टाकून आवश्यक तेथे नव्या सांडपाणी वाहिन्या टाकण्याच्या सूचना दिल्या आहेत. आरोग्य विभागाची ८५ पथके या परिसरात सर्वेक्षण करत आहेत. फक्त ‘फिल्टर’ केलेले पाणी पिण्यासाठी योग्य नसल्याने बाधित रुग्ण आढळलेल्या परिसरातील नागरिकांनी सध्या पाणी उकळून थंड करून प्यावे, अशी सूचना करण्यात आली आहे. सविस्तर अहवाल लवकरच प्राप्त होईल’, असे पालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-दुचाकी चालकाला अरेरावी अन् मारण्याची धमकी? नेमकं काय घडलं, बागुलांनी स्पष्टचं सांगितलं

-पुण्यात ‘GBS’चं थैमान! २४ रुग्णांवर आयसीयूत उपचार, शहरात नेमकी रुग्णसंख्या किती?

-विमानतळ सल्लागार समितीत ५ जणांच्या नियुक्त्या; केंद्रीय मंत्री मोहोळांकडून विमानतळ प्राधिकरणाकडे ५ नावे सुपूर्द

-बिगारी कामगाराच्या झोपडीत ५ लाखांची रोकड जळून खाक; झोपडीत इतके पैसे आले कुठून?

-अजित पवार-शरद पवार एकत्र येणार?; दत्तात्रय भरणे म्हणाले…

Tags: GBSGuillain Barrie SyndromeMunicipal Commissioner Dr. Rajendra BhoslePune Municipalityगुइलेन बॅरी सिंड्रोमजीबीएसपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसलेपुणे महापालिका
Previous Post

दुचाकी चालकाला अरेरावी अन् मारण्याची धमकी? नेमकं काय घडलं, बागुलांनी स्पष्टचं सांगितलं

Next Post

धक्कादायक! माजी खासदाराच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

News Desk

Related Posts

Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

by News Desk
July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

by News Desk
July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

by News Desk
July 28, 2025
Next Post
Hanging

धक्कादायक! माजी खासदाराच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

Recommended

“अजितदादांच्या कामाचा आवाका अन् पद्धत संपूर्ण महाराष्ट्राला माहिती”- सुनेत्रा पवार

“अजितदादांच्या कामाचा आवाका अन् पद्धत संपूर्ण महाराष्ट्राला माहिती”- सुनेत्रा पवार

May 2, 2024
Nitin Bhujbal

“जनतेचं ठरलंय! वडगाव शेरीत मशालच…” ठाकरेंच्या शिलेदराचे झळकले बॅनर्स

September 22, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

July 28, 2025
Pranjal Khewalkar
Pune

रेव्ह पार्टी प्रकरण: कोणी कोणी ड्रग्स घेतलं? ससूनच्या वैद्यकीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर

July 28, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved