Thursday, July 31, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

‘अनामत रक्कम घेण्याचा रुग्णालयांना अधिकार’; इंडियन मेडिकल असोसिएशनची बैठकीत भूमिका

by News Desk
April 9, 2025
in Pune, आरोग्य
Indian medical association
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : सध्या पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने एका गर्भवती महिलेला तात्काळ उचाराची गरज असताना देखील अनामत रक्कम मागितली नातेवाईकांकडे पैसे नसल्यामुळे ५ तासानंतर तिला दुसऱ्या रुग्णालयामध्ये दाखल केलं. २ चिमुकल्या मुलींना जन्म दिल्यानंतर अतिरक्तस्त्राव झाल्याने तिचा मृत्यू झाला. यानंतर रुग्णालय प्रशासनावर टीकेची झोड उठली. सर्व राजकीय पक्षांकडून आणि विविध संघटनांनी आंदोलने केली. त्यानंतर पुणे महापालिकेने शहरातील सर्व खाजगी रुग्णालयांना ‘रुग्णांकडून अनामत डिपॉझिट मागू नये, आधी उपचार आणि मगच पैसे मागावेत’, अशी नोटीस पाठवत आदेश दिले आहेत. मात्र, आता इंडियन मेडिकल असोसिएशन आणि हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडियाने त्याला विरोध केला आहे.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणी आणि महापालिकेने खासगी रुग्णालयांना दिलेला आदेश या पार्श्वभूमीवर खासगी रुग्णालयांची बैठक इंडियन मेडिकल असोसिएशनची पुणे शाखा आणि हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडियाच्या पुणे शाखेने घेतली. या बैठकीत अनामत रक्कम न घेण्याची कोणतीही कायदेशीर तरतूद नसून, अशी सक्ती करता येणार नाही, अशी भूमिका या संघटनांनी घेतली आहे. तसेच दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील आंदोलन आणि रुग्णालयाचे करण्यात आलेले नुकसान याबद्दल निषेध व्यक्त करण्यात आला. रुग्णालयाची चौकशी अद्याप पूर्ण झालेली असून, त्याआधी त्यांना दोषी ठरवू नये, अशी भूमिका बैठकीत मांडण्यात आली.

You might also like

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

दरम्यान, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवतीला पैशांअभावी उपचार केले नसल्याच्या दावा करण्यात आला आहे. याप्रकरणी गदारोळ सुरू आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्यप्रमुख डॉ. नीना बोराडे यांनी शहरातील सर्व खासगी रुग्णालये आणि नर्सिंग होमबाबत नुकताच अनामत रकमेबाबतचा आदेश काढला. त्यात रुग्णालयांनी रुग्णाशी सौजन्यपूर्ण व्यवहार करणे आणि आपत्कालीन उपचारांसाठी रुग्णाकडून अनामत रक्कम न घेणे, असे दोन प्रमुख मुद्दे होते.

चौकशी पूर्ण होण्याआधी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला दोषी ठरवू नये. डॉ. सुश्रुत घैसास यांची प्रथमदर्शनी चूक दिसत नाही. महापालिकेने कायदेशीर तरतुदीची चुकीचा अर्थ काढला. नियोजित शस्त्रक्रियेआधी खर्चाचा तपशील सांगणे रुग्णालयांसाठी बंधनकारक आहे, असे खासगी रुग्णालयांनी या बैठकीत भूमिका मांडली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-‘४० लाख रुपये भरा अन् मृतदेह घेवून जा’; २६ वर्षे रुग्णसेवा केलेल्या डॉक्टरसोबतही ‘दीनानाथ’ची वागणूक

-दीनानाथ रुग्णालयाला पालिकेचा कर भरावाच लागणार; पालिकेने बजावली वसुलीसाठी नोटीस

-दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरण: आरोग्य विभागानं ‘या’ बड्या अधिकाऱ्यावर केली मोठी कारवाई

-‘३५ वर्षांपूर्वी ‘दीनानाथ’ला जागा देऊन आम्ही चूक केली का?’ जागेचे मूळ मालक खिलारेंचा उद्विग्न सवाल

-‘रुग्णांकडून कोणतंही डिपॉझिट घेऊ नका’; पालिकेने धाडली सर्व खासगी रुग्णालयांना नोटीस

Tags: CorporationDinanath Mangeshka Hospitalpuneदीनानाथ मंगेशकर रुग्णालयपुणेपुणे महानगरपालिका
Previous Post

‘४० लाख रुपये भरा अन् मृतदेह घेवून जा’; २६ वर्षे रुग्णसेवा केलेल्या डॉक्टरसोबतही ‘दीनानाथ’ची वागणूक

Next Post

भाजप महिला कार्यकर्त्यांनी केलेल्या तोडफोडीवर मेधा कुलकर्णीं नाराज; चंद्रकांत पाटील, मोहोळांकडून पाठराखण

News Desk

Related Posts

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

by News Desk
July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

by News Desk
July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

by News Desk
July 28, 2025
Pranjal Khewalkar
Pune

रेव्ह पार्टी प्रकरण: कोणी कोणी ड्रग्स घेतलं? ससूनच्या वैद्यकीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर

by News Desk
July 28, 2025
Next Post
Pune BJP

भाजप महिला कार्यकर्त्यांनी केलेल्या तोडफोडीवर मेधा कुलकर्णीं नाराज; चंद्रकांत पाटील, मोहोळांकडून पाठराखण

Recommended

Pune Police

अजित पवारांच्या सूचनेनंतर पुणे पोलीस अ‌ॅक्शनमोडवर; स्वयंघोषित भाई, गुंडांची काढली धिंड अन्…

February 12, 2025
पिंपरी-चिंचवड बालेकिल्ला पुन्हा ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात चढाओढ

पिंपरी-चिंचवड बालेकिल्ला पुन्हा ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात चढाओढ

February 27, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

July 28, 2025
Pranjal Khewalkar
Pune

रेव्ह पार्टी प्रकरण: कोणी कोणी ड्रग्स घेतलं? ससूनच्या वैद्यकीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर

July 28, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा

July 28, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved