Friday, August 1, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

‘मी पक्षाची शिस्तभंंग केली नाही, निलंबन तातडीने मागे घ्यावे’; आबा बागुलांची काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना पत्र

by News Desk
December 10, 2024
in Pune, पुणे शहर, राजकारण, विधानसभा
Aba Bagul
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : एकेकाळी काँग्रेस पक्षाचा बालेकिला असलेल्या पर्वती विधानसभा मतदारसंघात आघाडीच्या जागावाटपात काँग्रेसच्या अस्तित्वाचा प्रश्न गंभीर होत असल्याने नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणूक लढविणाऱ्या माजी उपमहापौर आबा बागुल यांच्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनाच उभारी मिळाली. शिवाय ‘काँग्रेस विचारधारेच्या मतदारांची ‘व्होट बँक’ही राखता आली. त्यामुळे कोणतेही पत्र न देता आणि म्हणणे ऐकून न घेता पक्षातून निलंबन केले असल्यास ते तातडीने मागे घ्यावे आणि काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरुद्ध मी निवडणूक लढवली नाही. त्यामुळे मी पक्षाची शिस्तभंग केलेली नाही. तरी या कारणामुळे माझे पक्षाने निलंबन केले असल्यास ते तातडीने मागे घेऊन मला काँग्रेस पक्षाचाच कार्यकर्ता असल्याचे पत्र द्यावे’, अशी मागणी माजी उपमहापौर आबा बागुल यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. यासंदर्भात आबा बागुल यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रशासन व संघटक उपाध्यक्ष नाना गावंडे यांच्यासह निरीक्षक रमेश चेन्निथला, प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्यासह सर्व नेत्यांना पत्र पाठवले आहे.

आबा बागुल पत्रात काय म्हणाले?

‘पर्वती मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे गेली १५ वर्षे आहे. मात्र त्या पक्षाचे अधिकृत उमेदवार सलग ३ वेळा मोठ्या मताधिक्याचे फरकाने पराभूत झालेले आहेत. यंदाच्या निवडणुकीतही पुन्हा त्याच पक्षाचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने पराभूत झालेले आहे. ही सर्व परिस्थिती पक्ष श्रेष्ठींकडे अनेक वेळा मी व इतरही पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिलेली होती. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आता हा मतदारसंघ काँग्रेस पक्षाकडे घेण्यासंबंधी प्रयत्न केल्याचेही कळविले होते. पण नेहमीप्रमाणे २१२ पर्वती विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे (शरद पवार गट) यांच्याकडे जागावाटपात राहीला. परिणामी गेली अनेक वर्षे पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता असूनही माझ्या उमेदवारी बाबत विचार केलाच गेला नाही.’

You might also like

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

‘गेल्या ३० वर्षांपासून या मतदारसंघात वॉर्ड असो किंवा प्रभाग सलग निवडून येणारा काँग्रेस पक्षाचा एकमेव नगरसेवक आहे. शिवाय वार्डामध्ये नाविन्यपूर्ण विकासकामे तर केली तसेच पुण्यातील अनेक भागांमध्ये चांगली विधायक कामे केलेली आहेत.त्याबद्दल पक्षांमधील सर्व ज्येष्ठ व सक्रिय नेत्यांनी तसेच महाविकास आघाडीमधील घटक पक्षांमधील नेत्यांनी माझी वेळोवेळी जाहीर प्रशंसा केलेली आहे. त्यामुळे यंदा पक्षातर्फे अधिकृत उमेदवारी मिळणे अत्यंत आवश्यक होते. परंतु दुर्दैवाने तसे काही झाले नाही व सलग चौथ्या वेळी म्हणजेच वीस वर्ष मला आमदारकीची उमेदवारीपासून डावलण्यात आले आहे. परिणामी गेली वीस वर्षे या मतदारसंघात काँग्रेस पक्ष कमी होत आहे. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या मतदारसंघात काँग्रेस पक्ष नावालाही राहणार नाही. या कारणामुळे केवळ नाईलाजाने काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते कायमस्वरूपी पक्षासमवेत राहावेत व काँग्रेसचे मतदार जपले जावेत या हेतूने मी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरलेला होता’, असे देखील आबा बागुल पत्रामध्ये म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-माय-लेकराच्या नात्याला काळिमा; थंडीच्या कडाक्यात नवजात बाळाला तोंडाला पिशवी बांधून रस्त्यावर फेकलं

-मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना: पिंपरी-चिंचवडमधील लाखो ‘लाडक्या बहिणीं’चे अर्ज बाद

-‘शिवसेनेच्या वटवृक्षाला लागलेली बांडगुळे हटवा’ शिवसैनिकांकडून पोस्टरबाजी, ‘तो’ नेता कोण?

-विजयानंतर हेमंत रासनेंनी मतदारांचे आगळ्यावेगळ्या पद्धतीने मानले आभार; ९० हजार नागरिकांना वाटले पेढे

-पुणेकरांनो, पाणी जपून वापरा! गुरुवारी पुण्यात पाणीबाणी, कोणत्या भागात कपात?

Tags: Aba BagulCongressNana PatoleParvatipuneRamesh Chennithalaआबा बागुलकाँग्रेसनाना पटोलेपर्वतीपुणेरमेश चेन्निथला
Previous Post

माय-लेकराच्या नात्याला काळिमा; थंडीच्या कडाक्यात नवजात बाळाला तोंडाला पिशवी बांधून रस्त्यावर फेकलं

Next Post

बांग्लादेशी रोहिंग्यानं पुण्यात घर घेऊन थाटला संसार; अवघ्या ५०० रुपयांत काढलं खोटं आधारकार्ड

News Desk

Related Posts

Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

by News Desk
July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

by News Desk
July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

by News Desk
July 28, 2025
Next Post
Bangladeshi in Pune

बांग्लादेशी रोहिंग्यानं पुण्यात घर घेऊन थाटला संसार; अवघ्या ५०० रुपयांत काढलं खोटं आधारकार्ड

Recommended

पुणे पोलीस आयुक्तांची बार, पब मालकांसोबत बैठक; हॉटेल्स पूर्वीप्रमाणेच रात्री दीड वाजेपर्यंत सुरु राहणार पण…

पुणे पोलीस आयुक्तांची बार, पब मालकांसोबत बैठक; हॉटेल्स पूर्वीप्रमाणेच रात्री दीड वाजेपर्यंत सुरु राहणार पण…

February 29, 2024
गे डेटींग ॲपवर ओळख, पहिल्याच भेटीत शरीरसंबध अन्…पुण्यात घडला धक्कादायक प्रकार

गे डेटींग ॲपवर ओळख, पहिल्याच भेटीत शरीरसंबध अन्…पुण्यात घडला धक्कादायक प्रकार

July 17, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

July 28, 2025
Pranjal Khewalkar
Pune

रेव्ह पार्टी प्रकरण: कोणी कोणी ड्रग्स घेतलं? ससूनच्या वैद्यकीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर

July 28, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved