Thursday, July 31, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Business

मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची महत्वाची बैठक; फडणवीस, शिंदे अन् अजितदादांची नवा प्लान!

by News Desk
February 1, 2025
in Business, Pune, पिंपरी चिंचवड, पुणे शहर, राजकारण
Devendra Fadanavis Eknath Shinde and Ajit Pawar
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर आता काही महिन्यांवर येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तयारीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहे. महायुतीला विधानसभेत मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर महाविकास आघाडीतील अनेक नेते पदाधिकारी महायुतीमधील घटक पक्षांमध्ये प्रवेश करत आहेत. पक्ष वाढीसाठी संघटनात्मक बांधणी आणि पक्षप्रवेशाचा सपाटा राजकीय पक्षांकडून लावला जात आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी सध्या मोठी वेटींग लिस्ट आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या पक्षप्रवेशाबाबत महायुतीतील तिन्ही पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नुकतीच याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या तिघांमध्ये महत्वाची बैठक झाली. या बैठकीमध्ये पक्षप्रवेशाबाबत काही गोष्टी तिन्ही पक्षांनी पाळण्याबाबत या नेत्यांमध्ये एकमत झाल्याचे सांगितले जात आहे.

You might also like

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

एकनाथ शिंदेंकडून राज्यात ‘ऑपरेशन टायगर’ राबवले जात असल्याचे बोलले जात आहे. ‘ऑपरेशन टायगर’च्या माध्यमातून ठाकरे सेनेतील नेते आपल्याकडे वळणार असल्याचं मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं आहे. शिवसेनेप्रमाणेच भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील पक्षप्रवेशासाठी होण्याची शक्यता आहे.

मुंबईत फडणवीस, शिंदे आणि पवारांच्या झालेल्या बैठकीत आगामी काळात पक्ष प्रवेश देताना महायुतीतील मित्र पक्षांनी एकमेकांच्या पक्षातील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येत्या काळात महायुतीतील पक्षांच्या नेत्यांचे प्रवेश हे इतर मित्रपक्षांमध्ये होणार नसल्याचं पाहायला मिळणार आहे.

महाविकास आघाडीतील नेत्यांचा पक्षात प्रवेश केल्यास येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुती आणखी बळकट होईल. महायुती बळकट करण्यासाठी प्रवेश करुन घ्यायचे असतील तर विरोधी पक्षातील चांगल्या नेत्यांचे प्रवेश घडवून आणू अशी देखील चर्चा या बैठकीमध्ये झाल्याचे सांगितले जात आहे.

महत्वाच्या बातम्या-

-राऊतांसोबतच्या बैठकीतून बाहेर पडले अन् शिवसेनेत जाण्याची चर्चा; ठाकरेंच्या माजी आमदाराने स्पष्टच सांगितलं

-Budget 2025: आता १२ लाखापर्यंत उत्पन्न करमुक्त; केंद्रीय अर्थसंकल्पातून सामान्यांसाठी काय?

-केंद्रीय अर्थसंकल्पात मोदी सरकारने शेतकऱ्यासाठी काय घोषणा केल्या?

-पीएनजी ज्वेलर्सतर्फे दगडूशेठ गणपती चरणी १ किलोचा ‘कमळ हार’ अर्पण

-पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनलवरुन ८ फेब्रुवारीपासून ‘डिजीयात्रा’ सेवा!

Tags: ajit pawarDevendra FadnavisEknath ShindeMahavikas AghadimahayutiMeetingअजित पवारएकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीसबैठकमहायुतीमहाविकास आघाडीस्थानिक स्वराज्य संस्था
Previous Post

राऊतांसोबतच्या बैठकीतून बाहेर पडले अन् शिवसेनेत जाण्याची चर्चा; ठाकरेंच्या माजी आमदाराने स्पष्टच सांगितलं

Next Post

एलआयसी पॉलीसीच्या नावाखाली फ्रॉड, पण पुणे पोलिसांनी शेवटी ‘त्या’ टोळीला बेड्या ठोकल्याच

News Desk

Related Posts

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

by News Desk
July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

by News Desk
July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

by News Desk
July 28, 2025
Pranjal Khewalkar
Pune

रेव्ह पार्टी प्रकरण: कोणी कोणी ड्रग्स घेतलं? ससूनच्या वैद्यकीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर

by News Desk
July 28, 2025
Next Post
एलआयसी पॉलीसीच्या नावाखाली फ्रॉड, पण पुणे पोलिसांनी शेवटी ‘त्या’ टोळीला बेड्या ठोकल्याच

एलआयसी पॉलीसीच्या नावाखाली फ्रॉड, पण पुणे पोलिसांनी शेवटी 'त्या' टोळीला बेड्या ठोकल्याच

Recommended

Pune

पुणेकरांची गोष्टच भारी! दक्षिण आफ्रिकेत जगप्रसिद्ध मॅरेथॉनमध्ये उंचावली देशाची शान

June 12, 2025
“येणाऱ्या काळात अजित पवार एकटे पडतील, भाजप नेहमीच मित्रपक्षाला संपवतं”

“येणाऱ्या काळात अजित पवार एकटे पडतील, भाजप नेहमीच मित्रपक्षाला संपवतं”

February 21, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

July 28, 2025
Pranjal Khewalkar
Pune

रेव्ह पार्टी प्रकरण: कोणी कोणी ड्रग्स घेतलं? ससूनच्या वैद्यकीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर

July 28, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा

July 28, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved