पुणे : पुणे शहरात येत्या गुरवारी (१७ जुलै) अनेक भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तसेच शुक्रवारी (१८जुलै) कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. पर्वती रॉ वॉटर येथील मुख्य Prestress Line मधील गळती थांबवण्यासाठी तसेच विविध देखभाल-दुरुस्तीच्या कामांसाठी शहरातील काही भागांचा पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार आहे.
या कामांमध्ये जुने पर्वती जलशुद्धीकरण केंद्र, पर्वती MLR, HLR व LLR टाकी परिसर, पर्वती टँकर पॉईंट आणि एस.एन.डी.टी. पंपिंग स्टेशन अंतर्गत फ्लोमीटर बसविण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे वारजे जलकेंद्र अखत्यारीतील पुढील भागांचा पूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
कोणत्या भागात पाणीपुरवठा राहणार बंद?
चांदणी चौक (चौकोनी) टाकी परिसर, गांधी भवन टाकी परिसर, पॅनकार्ड क्लब GSR टाकी परिसर, GSR टाकी परिसर, एस.एन.डी.टी. (HLR), एस.एन.डी.टी. (MLR), चतुःश्रृंगी टाकी परिसर, पाषाण पंपिंग, सुस गोल टाकी परिसर, जुने वारजे जलकेंद्र भाग या भागातील पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार असून शुक्रवारी कमी दाबाने सुरु होईल. त्यामुळे नागरिकांनी पाणी साठवून ठेवावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे, अशी विनंती करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
-अजित पवारांचे कार्यकर्त्यांना संकेत, दादांनी सांगून टाकलं निडणुका कधी होणार?
-अजित पवारांनी बारामतीकरांना भरला दम; ‘त्यांना टायरात घालून मारा, तो माझा नातेवाईक का असेना?’
-काँग्रेसला मोठा धक्का: संजय जगताप भाजपच्या वाटेवर, पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरला!
-ढोल-ताशा पथकांसाठी आनंदाची बातमी; पुणे पोलिसांनी जाहीर केला ‘हा’ मोठा निर्णय
-धक्कादायक! नवऱ्याला त्रिशूळ मारला पण लागला ११ महिन्यांच्या चिमुकल्याला, पोलिसांना वेगळाच संशय