Friday, August 1, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

“नुसते डायलॉग बोलत शिरुरच्या मतदारांना भुलवतोय”; शिरुरच्या सभेत अजित पवारांचा कोल्हेंवर हल्लबोल

by News Desk
May 9, 2024
in Pune, पुणे शहर, राजकारण
“तुम्हाला कार्यसम्राट खासदार पाहिजे की, नटसम्राट खासदार”; अजित पवारांचा अमोल कोल्हेंवर निशाणा

xr:d:DAF-LD6Uub8:1175,j:6159097304904237320,t:24041405

585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

शिरूर : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान पार पडल्यानंतर चौथ्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचाराला जोर आला आहे. चौथ्या टप्प्यातील मतदारसंघाच्या निवडणुकीतील सर्व मतदारसंघातील राजकीय वातावरण तापल्याचे दिसत आहे. त्यातच शिरूर लोकसभा मतदारसंघातील टाकळी हाजी येथे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत अजित पवार बोलत होते. शिरुर लोकसभा मतदारसंघातही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडीचे शिरुरचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर आगपाखड केली आहे.

“खासदारकीचा राजीनामा द्यायला निघालेल्या डॉ. अमोल कोल्हेंना मीच थांबविले आणि पाच वर्षे काम करा म्हटले. आणि आता हाच बाबा खासदारकीची मते मागत फिरतोय. याला नाटकाच्या कामातून वेळ मिळेना आणि आता नुसते डायलॉग बोलत शिरुरच्या मतदारांना भुलवतोय” अशी टीका अजित पवार यांनी अमोल कोल्हेंवर केली आहे.

You might also like

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

माजी आमदार पोपटराव गावडे  यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर, शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, भाजपच्या नेत्या जयश्री पलांडे, माजी सभापती सुनीता गावडे आदी उपस्थित होते.

🔰08-05-2024 🛣️ टाकळी हाजी, शिरूर
⏱️ शिरूर लोकसभा क्षेत्र | टाकळी हाजी, शिरूर येथील महायुतीच्या जाहीर सभेतून लाईव्ह
https://t.co/NgIVRtWCad

— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) May 8, 2024

“आम्ही राज्याचे राजकारण करता करता वयाच्या ६० वर्षाच्या जवळपास पोहचलो आहे. मात्र आता जेष्ठानी आम्हावर जबाबदारी टाकून मार्गदर्शन करायला हवे. अशी राष्ट्रवादीतील तब्बल ८० टक्के नेते पदाधिकाऱ्यांची इच्छा होती. मात्र जेष्ठ नेते शरद पवार हे असा कुठलाच निर्णय घ्यायला तयार नव्हते. पर्यायाने आम्ही धाडसाने हा निर्णय घेतला. आता विकासाच्या उच्च गतीने पुढे नेण्यासाठीचा आमचा प्रयत्न आहे. शिरूर  मतदारसंघात आम्ही काहीही कमी पडू देणार नाही”,  असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरुरच्या जनतेल्या दिले आहे.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्य सरकार ओबीसीच्या प्रश्नासाठी जागृत असुन, त्यांनी सर्व समाज घटकांना सामाजिक न्याय देण्याचे काम केले आहे. विकासासाठी महायुतीच्या उमेदवाराला विजयी करा”, असे महादेव जानकर म्हणाले. 

आढळराव पाटील काय म्हणाले?

मी पाच वर्षापूर्वी पराभूत झालो तरी सुद्धा जनतेची नाळ तुटू दिली नाही. मात्र विद्यमान खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी जनतेचा भ्रमनिरास केला.

माजी आमदार पोपटराव गावडे म्हणाले की, या भागातील विविध प्रश्नासाठी निधी उपलब्ध व्हावा म्हणून मी उपमुख्यमंत्री अजित पवार व सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना साथ देण्याचा निर्णय घेतला असुन त्यामुळे कोट्यावधी रुपयाचा निधी उपलब्ध झाला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-विकसित पुण्यासाठी मुरलीधर मोहोळांचे संकल्पपत्र! शहराच्या विकासासाठी मांडला रोडमॅप

-बारामती मतदान प्रक्रियेनंतर अजित पवारांचा मोर्चा शिरुरकडे; उरुळी कांचनमधील सभेतून अमोल कोल्हेंना फटकारे

-Latest Entertainment News: अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर यांचे दोन वर्षानंतर ब्रेकअप; कारण आले समोर…

-मतदारांसाठी मोहोळांकडून प्रभावी यंत्रणा; पुणेकरांनी घेतल्या दोन लाख ‘व्होटिंग स्लीप’

-दत्तात्रय भरणेंची मतदान केंद्रावर शिवीगाळ; व्हिडीओ व्हायरल, वाचा भरणे काय म्हणाले?

Tags: ajit pawarDr. Amol KolhencpShirurShivajirao Adhalrao Patilअजित पवारडॉ. अमोल कोल्हेराष्ट्रवादीशिरूरशिवाजीराव आढाळराव पाटील
Previous Post

विकसित पुण्यासाठी मुरलीधर मोहोळांचे संकल्पपत्र! शहराच्या विकासासाठी मांडला रोडमॅप

Next Post

“मला कोणी खोट्यात काढलं तर मी सहन नाही करणार, मी कोणाच्या ५ पैशात मिंदा नाही”

News Desk

Related Posts

Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

by News Desk
July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

by News Desk
July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

by News Desk
July 28, 2025
Next Post
“सगळं साहेबांनी केलं, मग मी काय…”, अजित पवारांकडून बारामतीत जोरदार हल्लाबोल

"मला कोणी खोट्यात काढलं तर मी सहन नाही करणार, मी कोणाच्या ५ पैशात मिंदा नाही"

Recommended

पुण्यात क्षणभर विश्रांतीनंतर पुन्हा पावसाला जोर; हवामान खात्याकडून अलर्ट जारी

पुण्यात क्षणभर विश्रांतीनंतर पुन्हा पावसाला जोर; हवामान खात्याकडून अलर्ट जारी

August 1, 2024
Sharad Pawar and Chhagan Bhujbal

शरद पवारांच्या राष्ट्रवादीत इनकमिंग सुरु; ओबीसीच्या ‘या’ बड्या नेत्यांने हाती घेतली ‘तुतारी’

September 20, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

July 28, 2025
Pranjal Khewalkar
Pune

रेव्ह पार्टी प्रकरण: कोणी कोणी ड्रग्स घेतलं? ससूनच्या वैद्यकीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर

July 28, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved