पुणे : जम्मू काश्मीमधील पहलगाम येथे मंगळवारी पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यामध्ये आतापर्यंत २८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हल्ल्यात झालेल्या मृत्यूंमध्ये महाराष्ट्रातील ६ जणांचा समावेश झाला आहे. या हल्ल्यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. दहशतवाद्यांनी पर्यटकांना धर्म विचारले आणि जे मुस्लिम नाहीत त्यांच्यावर बेछूट गोळीबार केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
मंगळवारी रात्रीपर्यंत महाराष्ट्रातील ४ पर्यटकांचा मृत्यू झाल्याचे सांगितले होते. मात्र, आता जखमी असलेल्या आणखी दोन पर्यटकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील जगदाळे आणि गणबोटे कुटुंबातील पुरुषांना त्यांचा धर्म कोणता विचारला, त्यानंतर ते मुस्लिम नाही समजताच दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळ्या झाडल्या. या गोळीबारात संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे हे गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आता समोर आली आहे.
संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा मृतदेह संध्याकाळी पुण्यात आणणार असल्याची माहिती आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामध्ये निष्पापांना आपला जीव गमवावा लागला आहे. जम्मू काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या वैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी काल (मंगळवारी) पर्यटकांतर केलेल्या बेछूट गोळीबारात पर्यटकांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले. दहशतवादी पोलिसांच्या वेशात होते. त्यामुळे पर्यटकांना त्यांचा संशय आला नाही. या घटनेमध्ये पुण्यातील दोन जिवलग मित्रांचा कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
महत्वाच्या बातम्या
-युपीएससी २०२४चा निकाल जाहीर! पुण्याच्या अर्चित डोंगरेने पटकावला महाराष्ट्रात प्रथम क्रमांक
-भाजप मंडल अध्यक्ष व्हायचं असले तर DNA…; ‘त्या’ बॅनरची राज्यभर चर्चा
-राज-उद्धव ठाकरे बंधूंच्या परदेश दौऱ्याची चर्चा; महाराष्ट्रात येताच युतीची घोषणा करणार?
-पालिकेने EWS सदनिकांची दुरावस्था; कोट्यवधींची चोरी, पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
-‘आरटीई’ प्रवेशाची आज शेवटची संधी! आजच आपल्या मुलांचे अॅडमिशन फिक्स करा