पुणे : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजवणारी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नाशिक दौऱ्यावर असलेल्या एका वरिष्ठ नेत्याने अनौपचारिक संभाषणात मोठा खुलासा केला आहे. त्यांच्या मते, राज्यातील सुमारे ७२ वरिष्ठ अधिकारी आणि काही माजी व आजी मंत्री हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकले असण्याची शक्यता आहे. यामध्ये नाशिकमधील एका प्रभावशाली अधिकाऱ्याचाही समावेश असल्याची चर्चा आहे. यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चांना उधाण आले आहे.
या नेत्याने पत्रकारांना सांगितले की, राज्यातील अनेक वरिष्ठ अधिकारी आणि काही नेते हनी ट्रॅपमध्ये अडकले आहेत. यामध्ये नाशिकमधील एका बड्या अधिकाऱ्याचाही समावेश आहे, आणि यासंबंधीचा एक व्हिडिओही समोर आला आहे. हा व्हिडिओ हनी ट्रॅपचा भाग आहे की अन्य काही राजकीय डावपेच, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. मात्र, या प्रकरणाने राजकीय आणि प्रशासकीय क्षेत्रात खळबळ माजवली आहे.
नाशिकमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हा प्रकार घडल्याचा दावा या नेत्याने केला आहे. यासंदर्भात एका महिलेने नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. मिळालेल्या माहितीनुसार, काही अधिकाऱ्यांचे आणि नेत्यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ उपलब्ध असल्याने कोणीही या विषयावर उघडपणे बोलण्यास तयार नाही. त्यामुळे हे प्रकरण सध्या गुप्त ठेवले गेले आहे.
या खुलाशामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, या प्रकरणात नाशिकसह मुंबई आणि पुणे येथील काही मोठ्या अधिकाऱ्यांचा सहभाग असण्याची शक्यता आहे. या हनी ट्रॅपमध्ये नेमके कोणते अधिकारी आणि नेते अडकले आहेत, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महत्वाच्या बातम्या
-तळजाई टेकडीवर पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना गावगुंडांकडून बेदम मारहाण
-पुणेकरांसाठी महत्वाची बातमी; गुरुवारी ‘या’ भागात पाणीपुरवठा राहणार बंद
-अजित पवारांचे कार्यकर्त्यांना संकेत, दादांनी सांगून टाकलं निडणुका कधी होणार?
-अजित पवारांनी बारामतीकरांना भरला दम; ‘त्यांना टायरात घालून मारा, तो माझा नातेवाईक का असेना?’
-काँग्रेसला मोठा धक्का: संजय जगताप भाजपच्या वाटेवर, पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरला!