Friday, August 1, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

भोरमध्ये यंदा थोपटेंचा ‘संग्राम’ रोखणार मुळशी पॅटर्न अन् अजितदादा बारामतीचा बदला घेणार?

by News Desk
August 9, 2024
in Pune, राजकारण
भोरमध्ये यंदा थोपटेंचा ‘संग्राम’ रोखणार मुळशी पॅटर्न अन् अजितदादा बारामतीचा बदला घेणार?
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

भोर विधानसभा : १९९९ साली राज्यामध्ये विधानसभा निवडणूक झाली. तेंव्हा सत्तेवर असणारे भाजप–शिवसेना युतीचे सरकार पडणार हे निश्चित मानल जात होतं. विरोधात असणाऱ्या काँग्रेसला सत्तेवर येण्याची संधी निर्माण झाली. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते असणारे अनंतराव थोपटे मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. निवडणूक झाली आणि काँग्रेस पक्ष विरोधात लढलेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेत सत्तेवर देखील आला. पण मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार असणाऱ्या अनंतराव थोपटेंचा इथे खरा गेम झाला. कारण भोर विधानसभा मतदारसंघात शरद पवारांनी थोपटेंच्या विरोधात रान उठवलं आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार काशीनाथराव खुटवड यांना निवडून आणले. १९९९चा हा पराभव अनंतराव थोपटे यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आणि तेव्हापासून पवारांसोबत राजकीय वैर सुरु झाले.

आता २० वर्षानंतर आपल्याच पुतण्याने बंड केल्याने बारामती लोकसभेत लेकीच्या विजयासाठी शरद पवार थेट थोपटे यांच्या घरी पोहचले. जुन्या कडू-गोड आठवणींना उजाळा देत झालं-गेलं विसरून अनंतराव थोपटे आणि शरद पवार एकत्र आले. लोकसभा निवडणुकीत भोर मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्यासाठी आमदार संग्राम थोपटे यांनी चांगलीच मेहनत घेतली. जवळपास ४३ हजारांचे मताधिक्य सुप्रिया सुळेंना मिळाले आणि सुळेंचा विजयी सुकर झाला. या सगळ्या इतिहासाची जोड आता होऊ घातलेली विधानसभा निवडणुकीलाही आहे.

You might also like

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

गेल्या ४ दशकांपासून थोपटे पिता-पुत्रांनी आपला बालेकिल्ला बनवलेला भोर मतदारसंघ काबीज करत बारामतीच्या पराभवाचा वचपा अजित पवारांना काढायचा आहे. तर थोपटेंचा ‘संग्राम’ रोखण्यासाठी एक ‘मुळशी पॅटर्न’ देखील येथे सक्रीय झाला आहे. त्यामुळे खरंच थोपटे यांचा पराभव होईल का? अजित पवारांना बारामतीच्या पराभवाचा बदला घेता येणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोपटेंचा बालेकिल्ला भोर मतदारसंघ 

भोर, वेल्हा आणि मुळशी तालुक्याचा भाग मिळून हा भोर मतदारसंघ तयार झाला आहे. बऱ्यापैकी ग्रामीण, दुर्गम, डोंगर दऱ्यांतील वस्ती, ७ मोठी धरणे, ऐतिहासिक गडकिल्ले आणि जंगल क्षेत्राची मोठी व्याप्ती असणारा हा मतदारंसघ आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांनी मतदारसंघाचे ६ वेळा नेतृत्व केले आहे. तर त्यांचे पुत्र संग्राम थोपटे हे सध्या भोरचे आमदार आहेत. काँग्रेसच्या या बालेकिल्यात ‘यंदा आपल्याच भागातला आमदार हवा’, हा नारा मुळशीकरांमध्ये चर्चिला जातो आहे. शिवसेनेला आजवर भोर मतदारसंघात ३ वेळा पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या ९० हजार मतांच्या जोरावर अजित पवारांकडून या मतदारसंघावर दावा केला जाणार हे निश्चित मानले जात आहे.

महायुतीकडून भोर विधानसभेसाठी कोण इच्छुक?

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी आमदार काशीनाथराव खुटवड यांचे पुत्र विक्रम खुटवड, स्थानिक स्वराज्य संस्थेत थोपटे यांना पराभूत करणारे रणजीत शिवतारे, पुणे जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे हे लढण्याची तयारी करता आहेत. तर भाजपमधून माजी नगरसेवक किरण दगडे पाटील यांच्या नावाचा जोर पहायला मिळतो आहे. लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेले आणि थोपटेंचे पारंपारिक विरोधक असणारे कुलदीप कोंडे हे देखील शिवसेनेकडून लढण्यासाठी आग्रही आहेत.

काही दिवसांपूर्वीच वेल्ह्याचे नामकरण ‘राजगड’ तालुका करण्याचा निर्णय महायुती सरकारकडून घेण्यात आला. या माध्यमातून येथील जनतेला आपलेसे करण्याचा प्रयत्न आहे. गेली अनेक वर्षे आमदार असताना देखील आजही अनेक भागामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न येथे कायम आहे. यासोबतच ऊसाची थकीत बिले, रखडलेला गुंजवणीचा प्रस्ताव, शहरी पट्ट्याकडे झालेले दुर्लक्ष यामुळे संग्राम थोपटे अडचणीत येऊ शकतात. एकंदरीत भोर मतदारसंघातील आजचे राजकीय चित्र पाहता संग्राम थोपटे पुन्हा आमदार होतील का? कि दुसऱ्या चेहऱ्याला संधी मिळणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

-राज्यात बोगस दिव्यांग प्रमाणपत्रे दाखवत मिळवली नोकरी; बच्चू कडूंच्या अभियाने फुटणार बिंग

-स्वातंत्र्यदिनापूर्वी दिल्ली पोलिसांकडून मोस्ट वाँटेड दहशतवादी रिझवानला अटक; पुण्याशी होता संबंध

-..अन् क्रेनमधून पडता पडता वाचले जयंत पाटील, अमोल कोल्हे; शिवस्वराज्य यात्रेच्या सुरवातीला नेमकं काय घडलं?

-‘….त्यामुळे तुम्ही महाराष्ट्राशी कसे वागले यात बदल होणार का?; धंगेकरांची अजितदादांच्या गुलाबी जॅकेटवरुन टीका

-बारणेंची खासदारकी धोक्यात; पराभूत झालेल्या शिलेदाराची मुंबई उच्च न्यायालयात धाव, नेमकं झालं तरी काय?

Tags: ajit pawarAssembly ElectionBhorCongressEknath ShindeLok Sabha ElectionSangram Thopatesharad pawarshivsenaSupriya Suleअजित पवारएकनाथ शिंदेकाँग्रेसभोरलोकसभा निवडणूकविधानसभा निवडणूकशरद पवारशिवसेनासंग्राम थोपटेसुप्रिया सुळे
Previous Post

राज्यात बोगस दिव्यांग प्रमाणपत्रे दाखवत मिळवली नोकरी; बच्चू कडूंच्या अभियाने फुटणार बिंग

Next Post

‘सरकार घाबरलंय त्यामुळे…’; विधानसभा निवडणूक कधी लागणार? जयंत पाटलांनी सांगितला मुहूर्त

News Desk

Related Posts

Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

by News Desk
July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

by News Desk
July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

by News Desk
July 28, 2025
Next Post
‘सरकार घाबरलंय त्यामुळे…’; विधानसभा निवडणूक कधी लागणार? जयंत पाटलांनी सांगितला मुहूर्त

'सरकार घाबरलंय त्यामुळे...'; विधानसभा निवडणूक कधी लागणार? जयंत पाटलांनी सांगितला मुहूर्त

Recommended

Suresh Dhas

अजितदादा तुमचं काय अडकलंय धनंजय मुंडेंपाशी? भर सभेत सुरेश धस यांचा सवाल

January 5, 2025
आरक्षणाचा तिढा सुटणार? ओमराजे निंबाळकरांनी सुचवला ‘हा’ मार्ग

आरक्षणाचा तिढा सुटणार? ओमराजे निंबाळकरांनी सुचवला ‘हा’ मार्ग

June 23, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

July 28, 2025
Pranjal Khewalkar
Pune

रेव्ह पार्टी प्रकरण: कोणी कोणी ड्रग्स घेतलं? ससूनच्या वैद्यकीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर

July 28, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved