पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उद्या (मंगळवार, १० जून) वर्धापनदिन साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज शरद पवार आणि अजित पवार पुण्यातील एका कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असल्याने या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या कार्यक्रमामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.
हा कार्यक्रम पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी शरद पवार आणि अजित पवार यांच्यासह सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आणि हसन मुश्रीफ उपस्थित राहणार आहेत. राज्यातील साखर कारखाने, सहकारी बँका आणि साखर उद्योगाशी संबंधित अधिकारीही या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे, ऊस उत्पादकता वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर यावर चर्चासत्र होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या २६ वर्षांच्या इतिहासात प्रथमच पुणे शहराला वर्धापनदिनाच्या यजमानपदाचा मान मिळाला आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्रेरणा आणि बळ देणारा ठरेल, असा विश्वास पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापनदिन समारंभही उद्या पुण्यातच साजरा होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
-पर्यटकांनो पावसाळ्यात पर्यटनस्थळी जाताना काळजी घ्या! भूशी डॅममध्ये दोघा मित्रांनी गमावला जीव
-सनी निम्हण आयोजित भव्य रक्तदान शिबिरातून मानवतेला मानवंदना; ११०४ रक्तदात्यांचे रक्तदान
-हिरोला लाजवेल अशी दिमाखात हेलिकॉप्टरनं एन्ट्री, व्यावसायिकानं खरेदी केलेली अलिशान कार एकदा पहाच
-‘मी आणि अजितदादा लहाणपणापासूनच…; मिटकरींच्या त्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
-पालिका निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये भूकंप होणार, माजी आमदारासह अनेक नगरसेवक पक्षाला सोडचिठ्ठी देणार