पुणे : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रम आणि शौर्याचे प्रतीक असणाऱ्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाला आहे. पुण्यातील ऐतिहासिक लाल महालात या अभिमानास्पद घोषणेचा भाजपचे आमदार हेमंत रासने यांच्याकडून पेढे वाटत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आपल्या संस्कृतीचे प्रतीक असणारी पारंपारिक वेशभूषा तसेच भगवे फेटे घालून सर्वजण उपस्थित होते. एकमेकांचे पेढ्याने तोंड गोड करत फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करण्यात आली. ‘जय भवानी जय शिवाजी’च्या घोषणांनी यावेळी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
“छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेली दुर्गसंस्कृती ही मराठा साम्राज्याच्या असामान्य लष्करी ताकदीचे प्रतीक आहे. आज त्या गडकोटांना जागतिक मान्यता मिळणे ही प्रत्येक भारतीयासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. हा गौरव महाराष्ट्रासाठीच नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानासाठी अभिमानास्पद आहे. यामुळे राज्यातील पर्यटनाला मोठी चालना मिळेल, शिवाय आतापर्यंत जगाला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास माहिती होता, पण आता त्यांच्या किल्ल्यांची महतीही जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचणार आहे, असं हेमंत रासने यावेळी म्हणाले आहेत.
या ऐतिहासिक निर्णयाबद्दल त्यांनी विशेषत पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत व राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्यासह संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार मानले.
महत्वाच्या बातम्या
-अजित पवारांनी बारामतीकरांना भरला दम; ‘त्यांना टायरात घालून मारा, तो माझा नातेवाईक का असेना?’
-काँग्रेसला मोठा धक्का: संजय जगताप भाजपच्या वाटेवर, पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरला!
-ढोल-ताशा पथकांसाठी आनंदाची बातमी; पुणे पोलिसांनी जाहीर केला ‘हा’ मोठा निर्णय
-धक्कादायक! नवऱ्याला त्रिशूळ मारला पण लागला ११ महिन्यांच्या चिमुकल्याला, पोलिसांना वेगळाच संशय