Saturday, August 2, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

‘ज्येष्ठांचा सन्मान हीच आमची संस्कृती’; १९० ज्येष्ठ नागरीक संघांचा मोहोळ यांना पाठिंबा

by News Desk
April 22, 2024
in Pune, पुणे शहर, राजकारण
‘ज्येष्ठांचा सन्मान हीच आमची संस्कृती’; १९० ज्येष्ठ नागरीक संघांचा मोहोळ यांना पाठिंबा
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : महायुतीचे पुणे लोकसभा निवडणुकीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांची ताकद दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. पुणे शहरातील १९० ज्येष्ठ नागरीक संघांचा मुरलीधर मोहोळ यांना पाठिंबा दिला आहे. ऑस्कॉप, फेसकॉम, भाजप ज्येष्ठ नागरिक आघाडी आणि पुणे शहरातील सर्व १९० अंगीकृत ज्येष्ठ नागरिक संघांनी मोहोळ यांना पाठिंबा जाहीर केला. या ज्येष्ठ नागरिक मेळाव्यात मोहोळ बोलत होते.

‘आपल्या वडिलांनी दिलेल्या वचनाची पूर्तता करण्यासाठी श्रीरामांनी आपल्या राज्याचा १४ वर्ष त्याग केला. माता शबरीची उष्टी बोरं खावून तिचा सन्मान केला. ज्येष्ठांचा आदर, सन्मान करा हाच धडा रामायणातून आपल्याला मिळतो. त्यामुळेच ज्येष्ठांचा सन्मान हीच आमची संस्कृती आहे. पुण्यातील ज्येष्ठ, वडिलधारे हेच माझे स्टार प्रचारक आहेत आणि त्यांच्यासाठी असणाऱ्या मोदी सरकारच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करु, असे महायुतीचे पुणे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले आहे.

You might also like

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

ज्येष्ठ नागरिकांच्या ॲस्कॉप संघटनेचे अध्यक्ष दिलीप पवार, कार्याध्यक्ष श्रीराम बेडकीहाळ, कोषाध्यक्ष अच्युत कुलकर्णी, सचिव ऊर्मिला शेजवलकर, तसेच उदय रेणूकर, अरुण रोडे, राजीव कुलकर्णी या पदाधिकाऱ्यांनी मेळावा आयोजनात मोलाची भूमिका बजावली. हेल्पेज इंडिया संघटनेचे वसंतराव दापोरकर, बंडोपंत फडके, अनिल कुलकर्णी, पद्माकर कुलकर्णी, सुरेखा पेंडसे, ऊषा जोईल, श्रद्धा चिटणीस आदीही उपस्थित होते.

आपल्या घरातील ज्येष्ठ किंवा वडिलधारे आपली ताकद असते असे सांगून मोहोळ म्हणाले, ‘आपल्याला कधी ना कधी तरी निराशा येते. त्यावेळी घरातील ज्येष्ठांशी संवाद साधल्यानंतर आपले नैराश्य दूर होते, हा माझा अनुभव आहे. अनेकदा मला गोंधळलेल्या मनस्थीतीत मला ज्येष्ठांच्या मार्गदर्शनातून त्यातून बाहेर पडणे शक्य झाले आहे. हे मी माझे अनुभव सांगतोय. भाजपने कायमच ज्येष्ठ नागरीकांची दखल घेतली आहे. कारण ज्येष्ठ नागरीक हे समाजातील अनुभवाची भांडारे आहेत. ज्येष्ठ, वडिलधारे माझ्यासाठी कायमच आदरणीय राहिले आहेत, पुढही रहातील. कोरोना काळात ज्येष्ठांची सेवा करण्याचे भाग्य मला मिळाले, त्यांच्या त्या आशिर्वादानेच मला या निवडणुकीत संधी मिळाली. त्यांचा आशीर्वाद माझ्यासाठी मोठा आहे. सर्वांशी कायमच गप्पा मारणारे, बोलणारे ज्येष्ठ नागरीक हेच खरे माझे स्टार प्रचारक आहेत.’

पुणे शहरातील बहुसंख्य ज्येष्ठ नागरिक पदाधिकाऱ्यांसह राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, महायुती समन्वयक संदीप खर्डेकर, शहर सरचिटणीस पुनीत जोशी, शिवसेनेचे उपशहरप्रमुख सचिन थोरात, महायुतीचे समन्वयक शाम देशपांडे, ज्येष्ठ नागरिक मेळाव्याचे समन्वयक बाळासाहेब टेमकर, कोथरूड दक्षिण मंडलचे अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला, कोथरूड उत्तर मंडलचे अध्यक्ष सचिन पाषाणकर, माजी नगरसेविका उर्मिला आपटे, माजी उपमहापौर नाना नाशिककर, अनुपमा लिमये, कोथरूड सरचिटणीस अनुराधा येडके, मंजूश्री खर्डेकर, मनसे विभाग अध्यक्ष सुधीर धावडे, रिपाइंचे कोथरूड अध्यक्ष बाळासाहेब खंकाळ, शिवसेनेचे कोथरूड विभाग प्रमुख मयूर पानसरे, दीपक पवार, गिरीश खत्री, शहर चिटणीस प्रशांत हरसुले, राहुल कोकाटे, कोथरूड उपाध्यक्ष दिनेश माझिरे, अजित जगताप आदी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या-

-‘२५ वर्षे रक्ताचं पाणी केलेल्या अजितदादांवर बोलून त्यांना मोठं व्हायचंय’; सुनील शेळकेंचा रोहित पवारांवर निशाणा

-गेल्या काही वर्षांत ‘खासदाराविना मतदारसंघ’ अशी शिरूरची ओळख, आढळराव पाटलांचा कोल्हेंवर हल्लाबोल

-‘५ वर्षापूर्वी माझी चूक झाली’ म्हणत शरद पवारांनी मागितली जाहीर माफी

-‘१ ते ७ मे हा कालावधी केवळ ‘बारामती’साठी राखीव ठेवा; अजित पवारांच्या महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना सूचना

-‘तू सर्वात बेस्ट सून आहेस,’ म्हणत नानासाहेब नवलेंकडून सुनेत्रा पवारांचे कौतुक

Tags: Lok Sabha ElectionMurlidhar Moholpuneपुणेमुरलीधर मोहोळलोकसभा निवडणूक
Previous Post

‘२५ वर्षे रक्ताचं पाणी केलेल्या अजितदादांवर बोलून त्यांना मोठं व्हायचंय’; सुनील शेळकेंचा रोहित पवारांवर निशाणा

Next Post

“वंदे मातरम्! Best Lucky आजोबा…” शहीद जवानाच्या चिमुकल्याच्या शुभेच्छा; आढळराव पाटील गहिवरले

News Desk

Related Posts

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

by News Desk
August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

by News Desk
July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

"वंदे मातरम्! Best Lucky आजोबा..." शहीद जवानाच्या चिमुकल्याच्या शुभेच्छा; आढळराव पाटील गहिवरले

Recommended

Sharad Pawar

बारामतीत AIच्या माध्यमातून ऊस शेती; सत्या नाडेलांकडून विशेष कौतुक

January 8, 2025
Ajit Pawar

अजितदादांच्या राष्ट्रवादीत राजीनामा सत्र सुरूच; आधी ६०० अन् आता किती पदाधिकाऱ्यांचे धडाधड राजीनामे?

October 18, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

July 28, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved