पुणे : सध्या पुणे शहरात गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अशातच आता वडगाव नवले पूलाजवळील चैतन्य बारमध्ये मध्यरात्री दारुच्या बीलावरुन वाद झाला. त्या वादातून बारमधील कामगाराने ग्राहक तरुणाला मारहाण करुन त्याच्या डोक्यात बिअरची बाटली फोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यावरुन आता ग्राहकाने तक्रार नोंदवली असून चैतन्य बारमधील ३ कामगारांवर गुन्हा दाखल झाला आहे.
नेमकं काय झालं?
८ जुलै रोजी मध्यरात्री एक ते दीड वाजण्याच्या सुमारास तुषार यशवंत सुतार (वय २७, रा. नर्हे) याचा चैतन्य बारमध्ये दारुच्या बिलातील १० रुपये कमी दिल्याने तेथिल कामागारांसोबत वाद झाला. या वादात बारमधील कामगाराने तुषारच्या डोक्यात बिअरची बाटली फोडली. या घटनेनंतर तुषार हा गावाला गेला होता. त्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ एकाने काढला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला. हाच व्हिडीओ त्याच्यापर्यंत पोहचल्यानंतर आता त्याने फिर्याद दिली आहे. तुषारने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन चैतन्य बारमधील ३ कामगारांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे दारु पिण्यासाठी चैतन्य बारमध्ये गेले होते. त्यांनी दारु पिऊन जेवण केले. त्यानंतर मध्यरात्री ते बिल देण्यास गेले. तेव्हा बिलाचे १० रुपये कमी दिल्याच्या कारणावरुन त्यांचा काऊंटरवरील कामगारांशी वाद झाला. तेव्हा तिघा जणांनी त्यांना हाताने बेदम मारहाण केली. त्यांच्या पैकी एकाने फिर्यादीच्या डोक्यात बिअरची बाटली मारुन जखमी केले. या घटनेनंतर ते गावाला गेले होते. त्यांना मारहाण होत असल्याचा कोणीतरी व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावर टाकला. तो व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यापर्यंत पोहचला. त्यानंतर ते आता गावावरुन परत आल्यावर त्यांनी फिर्याद दिली आहे. पोलीस हवालदार गिरी गोसावी याबाबतचा पुढील तपास करत आहेत.
महत्वाच्या बातम्या
-मुख्यमंत्री फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात ‘महारक्तदान शिबिर’; १०१४ युनिट रक्त संकलित
-अजितदादांच्या आमदाराच्या भावाचा प्रताप; पोलिसांनी आवळल्या मुसक्या, नेमकं काय प्रकरण?
-पत्नीला शेजारची सीट नाही दिली म्हणून भाजप पदाधिकाऱ्याने थेट केंद्रीय राज्यमंत्र्याकडे केली तक्रार
-आधी काचेचे तुकडे आता अंडाभुर्जीत झुरळ; गुडलक कॅफेतील आणखी एक धक्कादायक प्रकार